चौकस

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
14 Feb 2016 - 5:16 am

निवेदक : तेंव्हा मंडळी .............. अपराध पोटात घाला चुकलं माकलं माफ करा.
( एक लहान मुलगा हेल्मेट घालून स्टेजवर येतो.)
अरे हे कोण आले. ए बाळा काय हवय तुला. आणि इथं कसा आलास? ए बाळा...... अरे ए बाळा.
मुलगा : ( हेल्मेट काढतो ) काय म्हणालात ओ काका अज्जिबात ऐकू आलं नाही. हेल्मेटमुळे काही ऐकूच येत नाही
बघा.
निवेदक: अरे मी विचारले कोण आहेस तू. इथे काय करतोयेस? ते हेल्मेट का घातले आहेस.
मुलगा: ओ काका मी मीच आहे. माझी आई म्हणते की उगाच नसत्या चौकशा करणार्‍या चहाडबुचक्या माणसाना
अज्जिब्बात नाव सांगायचे नाही.
निवेदक: काय? नसत्या चौकशा करणार्‍या चहाडबुचक्या माणसाना अज्जिब्बात नाव सांगायचे नाही?

मुलगा: हो ना. त्यांच्याशी बोलायचे सुद्धा नाही. असं आई म्हणते. निवेदक: अरे पण मी तसा नाहिय्ये.
मुलगा : ते तुमी नाही ठरवायचे. मी ठरवायचे. आई म्हणते की लोक नुसत्या चौकशा करतात आणि मग स्थळ
नाकारतात. त्या बंड्या काकांने मावशीच्या स्थळाला नकार दिला तेंव्हापासून आई असेच म्हणते. की ते
चहाडबुचके आहेत. नुसते चहा पोहे हादडून गेले.लुब्रे मेले.
निवेदक: हो का.....असे बोलु नये बाळ. मोठ्या लोकांबद्दल आपण असे बोलू नये.
मुलगा: मग मोठ्ठे लोक तरी का असे बोलतात?
निवेदक: ते चुकतात.
मुलगा: म्हंजे मोठ्या लोकानी चुका केल्या तर चालतं. लहान मुलानी चुका करायच्या नाहीत.
निवेदक: बरं ते जाऊदे. मला सांग तुझे नाव काय?इथे काय करतो आहेस?
मुलगा: ओ काका तुम्ही नक्की चहाडबुचके नाही आहात ना?
निवेदक: नाही रे.
मुलगा: नक्की ना? खरं सांगताय ना तुम्ही? अगदी खरं?
निवेदक: हो रे अगदी खरं
मुलगा: बघा हं. आमाला काय ! खोटं बोललं तर तुमची प्यांट फाटेल. असं आई म्हणते.
निवेदक: बरं राहु देत ते. नाव नको सांगु. इथे काय करतो आहेस ते तरी सांग?
मुलगा: मी ना..... आमी ना. हिते आयपील बघायला आलोय.
निवेदक: काय आयपील? इथे? तुला रे काय माहीत आयपीएल म्हणजे काय असते ते?
मुलगा: आमाला माहीत आहे आयपील म्हणजे काय ते.
निवेदक: काय
मुलगा : आयपील म्हणजे ते .... मोठ्या मोठ्या ताया लहान मुलांचे कपडे घालून नाच करत असतात आणि
कधीकधी अधूनमधून लोक ब्याटबॉल पण खेळत असतात.
निवेदक:अरे बापरे.
मुलगा: ओ काका... एक विचारू का?
शानिवेदक: विचार विचार. लहान मुलानी शंका विचाराव्यात. त्यांचे कोणतेच कुतुहल दडपून ठेवू नये. मुले म्हणजे
देवाघरची फुले
मुलगा: आयपील असते तसे बाबापील का नसते हो?
निवेदक: काय?
मुलगा: आई आणि बाबा कसे असतात. नुसतंच आयपील खेळायचे म्हणजे मग बाबानी काय करायचे .
त्यांच्यावर हा अन्याय नाही का. आयपील आहे तसे बाबापील पण असायला पायजे .
निवेदक: ठेवू हा आपण ठेवू त्यांच्यासाठी बाबापील पण ठेवू. पण तू इथे का आला आहेस?
मुलगा: तुमी इथे कसला तरी खेळ करणार आहात ना?
निवेदक: हो . खेळ तर करायचाच आहे. त्याच्याच तयारीला लागलोय आम्ही. पण त्याचा आणि आयपीएल चा काय
संबन्ध
मुलगा: खेळ म्हणजे आयपील च असते. हल्ली सगळ्या खेळांना आयपील म्हणतात.
निवेदक:अरे आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमीयर लीग.
मुलगा: ती त्यांची आयपीएल इंडियन प्रीमियर लीग. आमची आयपील म्हणजे इथलीच प्रीमीयर लीग.
निवेदक: इथलीच प्रीमीयर लीग?
मुलगा: हो आमच्या टीम ची आज मॅच आहे. शेजारच्या वर्गा सोबत.
निवेदक: कसली मॅच.
मुलगा: वडापाव खायची. जी टीम जास्तीत जास्त वडापाव खाईल ती जिंकेल आणि जी टीम हारेल त्यानी जिंकलेल्या
टीममधल्या मुलांचा होमवर्क करायचा. मागच्या वेळेस आमी जिंकलो होतो. माझा आख्खा होमवर्क त्या टीम ने
केला
निवेदक: वा... याला म्हणायचे लहान वयातली प्रगल्भता
मुलगा: ओ काका.. मी तुमाला हेल्मेट का घातले ते साम्गायला विसरलोच.
निवेदक: त्यात काय तुझ्या बाबाम्ची स्कूटर असेल आणि ते वापरत अस्तील हेल्मेट
मुलगा: नै काही. त्यांच्याकडे स्कूटर बीटार आस नहिय्ये. पण हेल्मेट आहे. माझे बाबा त्याना लोकानी त्यानी
घेतलेले पैसे परत मागू नये म्हणून हेल्मेट घालून फिरतात. हेल्मेटमुळे लोकाना तुमचा चेहेरा दिसत नाही .
निवेदक: अरे वा. हेल्मेटचा हा फायदा सरकारने सांगायला हवा लोकाना. हेल्मेट सक्तीचा प्रश्नच येणार नाही.
पण तू का घातले आहेस हेल्मेट.
मुलगा: मला भौतीक शास्त्राच्या देश्मूख सरांपासून लपायचे आहे.
निवेदक: कारे
मुलगा: त्यानी माझे उत्तर बरोबर दिलेले असताना सुद्धा चूक दिले म्हणून मी त्याना चहाडबुचका म्हंटले.
निवेदक: कोणते उत्तर चूक दिले
मुलगा: न्यूटनचा तिसरा नियम समजावून सांगायचा होता.
निवेदक:तिसरा नियम म्हणजे तोच ना. अ‍ॅक्शन आणि रीअ‍ॅक्शन चा.
मुलगा : हो तोच नियम. क्रीया आणि प्रतिक्रीया या दोन्ही समान असतात तो नियम मी उदाहरण आणि
स्पष्टीकरण स्सोप्या शब्दात दिले होते .
निवेदक: काय दिले होते.
मुलगा: तुमने मारी एन्ट्री और दिलमे बजी घन्टी अरे टॅण्ण...... तुमने मारी एन्ट्री ही क्रीया आणि
दिलमे बजी घन्टी ही प्रतिक्रीया.
निवेदक: आणि त्या "अरे टॅण्ण" चे काय
मुलगा: ते "अरे टॅण्ण" सरानी माझ्या पाठीत वाजवले... ते जाऊ दे. काका इथे खेळ कधी सुरू होताहेत.
निवेदक: खेळ ना..आत्ता सुरु होतील. पण ते तू म्हणतो तसले खेळ नाहीत . इथे आम्ही इथे रंगमंचावरचा खेळ सुरू
करणार आहोत.
मुलगा: मला बघायला मिळेल.
निवेदक: बघायला? अरे तिकडे ते एक पेन्द्याकाका आहेत ना त्याना भेट .खेळायला सुद्धा मिळेल.
मुलगा: पेन्द्या काका? मी त्याना ओळखणार कसा?
निवेदक: ते बघ ते गोरे पान ,उंच , रुबाबदार आणि मजबूत बांध्याचे काका दिसताहेत ना!
मुलगा: ते पेन्द्या काका?
निवेदक: ते नाहीत रे त्यांच्या बाजुला उभे आहेत ते काळे , एकदम बारीक आहेत ते. पेन्द्या काका.
मुलगा: हो क्का.... मस्तच की. मग माझा होमवर्क करायला नवी टीम मिळेल चला जातो.
मुलगा (जातो:)
निवेदक: तर र्मंडळी काय म्हणत होतो मी. काही चुकलं माकलं असल तर........

संस्कृतीप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

14 Feb 2016 - 10:12 am | जव्हेरगंज

भारी!!

:-D

बोका-ए-आझम's picture

14 Feb 2016 - 10:36 am | बोका-ए-आझम

मुलगा: तुमने मारी एन्ट्री और दिलमे बजी घन्टी अरे टॅण्ण...... तुमने मारी एन्ट्री ही क्रीया आणि
दिलमे बजी घन्टी ही प्रतिक्रीया.
निवेदक: आणि त्या "अरे टॅण्ण" चे काय
मुलगा: ते "अरे टॅण्ण" सरानी माझ्या पाठीत वाजवले...

लोल!

एस's picture

14 Feb 2016 - 10:44 am | एस

हाहाहा!

नाना स्कॉच's picture

14 Feb 2016 - 11:07 am | नाना स्कॉच

क्या बात है!!! क्रिस्प अन फ्रेश प्रवेश वाटला! :D

टवाळ कार्टा's picture

14 Feb 2016 - 1:43 pm | टवाळ कार्टा

खि खि खि....मस्तय

तिमा's picture

14 Feb 2016 - 2:51 pm | तिमा

'विजुभाऊ' या नांवाला साजेसे नाही वाटले. खरं सांगतोय नाहीतर माझी पँट फाटेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Feb 2016 - 3:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलं. अजून रंग भरता आला असता.

-दिलीप बिरुटे