त्यांना हे जमत कसं..?
मिपावरचा माझा हा पहिला लेख. पण विषय कोणता निवडावा हा यक्षप्रश्न माझ्यासमोर आं वासून उभा होता. कारण मिपावर सर्व विषयांवर भरपूर प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. शेवटी विषय मिळालाच. ज्यांच्या कविता वाचून मी मोठा झालो, त्यांनाच निवडावं असं ठरवलं. यांच्या शिवाय मराठी साहित्य संस्कृती अपूर्ण आहे, असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्या म्हणजे "बहिणाबाई चौधरी". लिहायला सुरवात तर केली, पण शब्द मात्र ययातीतल्या अलका सारखे गट्टी फु करून बसलेत. माझं प्रत्येक वेळी असचं होतं, कोरा कागद समोर आला कि डोकं कसं अगदी बधिर होऊन जातं. आणि त्यांच्या बद्दल मी काय लिहावं. त्या म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहेत.