आला रे आला कोरोना आला
आला रे आला कोरोना आला
कुठे राहिला तो आंदोलनवाला
दंगली साऱ्या हवेत विरल्या
देश आपसूक शांत झाला
यापूर्वी कधीही असा कुणी
घेतला नव्हता धसका
दंगेखोरांना कोरोनाने येऊन
दाखवलाय चांगलाच हिसका
रस्त्यावर उतरून साले
नाचत होते नंगानाच
कोरोनाच्या भीतीने ठेवलीय
त्यांच्या मानगुटीवर टाच
जीव घेणाऱ्याच्याच आता
पोटात गोळा आला
शांतप्रिय लोकांच्या मात्र
जीवात जीव आला
आला रे आला ,,कोरोना आला
कोरोनाच्या येण्याने मात्र भारत प्रकाशात आला