गुरुदेवांना श्रध्दान्जली
त्याचा अस्त जणू
माझ्या आठवणींचा उदय
मी आणि माझ्या आठवणी
रंगत जाते महफील नूरानी
घेर वाढता अंधाराचा
हळूच येते अश्रू घेऊनि
कैक आठवणी ताज्या अजुनी
पुन्हा परतती नव्या होऊनि
वेळेचा मग मी माग काढतो
आठवणींवर स्वार होऊनि
पुन्हा निराशा हाती येते
अश्रुंचे बहू मोल देउनी
कधी तिमिर मज सखा भासतो
तरीही स्वतःशी एकटा हसतो
नेहेमीप्रमाणे तो पुन्हा उगवतो
आठणींचा पुन्हा अस्त होतो