आसतेस घरी तू जेव्हा
कोंड्याचे होती मांडे
कळत नाही कसे ते
भरती दुधा दह्यांचे हांडे
नसतेस घरी तू जेव्हा
वाहती दुधाचे पाट
अवतार घराचा होतो
जसा आठवडी बाजार हाट
आसतेस घरी तू जेव्हा
कधी रणभूमी सम घर वाटे
दामिनी कडाडे वाजे
हतप्रभ होती सारी शस्त्रे
जेव्हां ब्रह्मास्त्र जलंधारांचे गाजे
नसतेस घरी तू जेव्हा
अन्न वस्त्रांचे होती वांधे
धुणे भांडी करूनी
दुखतात किती ते सांधे
आसतेस घरी तू जेव्हा
चिंता नसे कशाची
साम्राज्य आपुले म्हणूनी
मिरवतो मीजा़स फुकाची
नसतेस घरी तू जेव्हा
युद्धभू निशब्द ,नी शातं
अभिमन्यू मी चक्रव्यूहातला
आत्मबोध होतो मजला
खरी अबला आहे कोण
येतेस फिरूनी जेव्हां
ऩवी नव्हाळी येते
निश्वास सुटे सुटकेचा
मन फुलपाखरू होऊनी उडते
कसरत
२३-१०-२०२१