द अंडरटेकर रिटायर्स

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
4 Apr 2017 - 3:41 pm

आज सकाळी एकीकडे किशोरी ताईंच्या निधनाची बातमी वाचली आणि दुसरीकडे अंडरटेकर पुन्हा कधीच रिंगमधे येणार नसल्याची. किशोरी ताई निवर्तल्या, अंडरटेकर निवृत्त झाला. एकीकडे सूर, तर दुसरीकडे WWE मधला असुर. इकडे सम, तर तिकडे दम. दोनही गोष्टी 'आता पुन्हा नाहीत' हे मात्र साम्य होतं.

कदाचित बरेच जण रेस्लिंग किंवा WWE बघणारे नसतील, पण अंडरटेकर हे नाव तरीही त्यांनी ऐकलेलं असेल. कारण त्याचा करिश्माच तसा होता. या निमित्ताने अंडरटेकरच्या काही आठवणी.

एन्ट्री -

द डेडमॅन ! - चर्च च्या बेल्स च्या आवाजासरशी अरेनातले लाइट बंद, सगळीकडे धूर आणि गडद निळे स्पॉटलाइट्स, प्रवेशद्वारावरच्या स्क्रीनवर विजा, पडके वाडे इत्यादींची चित्र फ्लॅश होतायत आणि अंडरटेकर अचानक रिंगमधे ! या एन्ट्रीने जो अंगावर काटा यायचा त्याला तोड नाही. द डेडमॅन !

बिग ईव्हल - पुढे या डेडमॅनचं रूप, ढंग बदलण्याचेही प्रयोग झाले. 'तो' अंडरटेकरही आवडलाच होता. लिम्प बिझकिट च्या कीप रोलिन ! गाण्याच्या जोडीने अंडरटेकर वेगवेगळ्या चॉपर बाईक्स घेऊन एन्ट्री करायचा. लव्हली. कधीकधी डेडमॅन पेक्षाही हा आवडला. बिग ईव्हल!

द फीनॉम - पुढे पुन्हा मूळपदाकडे गाडी आली. त्याचा ताज्यातला ताजा एन्ट्रन्स असा होता.


सिग्नेचर मूव्ह्ज

प्रत्येक डब्ल्यू डब्ल्यू ई स्टार हे एक पात्र असतं, एक व्यक्तिरेखा असते. आणि प्रत्येकाची ओळख त्याच्या एन्ट्रीत, एन्ट्रीनंतरच्या अभिवादनातनं, डायलॉग्स मधून, आणि महत्वाचं म्हणजे सिग्नेचर मूव्हज मधून तयार केलेली. अशाप्रकारे या अंडरटेकरच्या काही एक से एक सिग्नेचर मूव्ह्ज, फिनिशिंग मूव्ह्ज होत्या. त्यांचे काही व्हिडियोज. माझी फेवरेट - टूंब्स्टोन पाईलड्रायव्हर.

१. चोकस्लॅम - हा माझ्यामते अंडरटेकर सारखा भारी कुणीच करत नाही. चोकस्लॅम केन, बिग शो सारखे इतरही रेसलर वापरतात. पण अंडरटेकर एक नंबर.

२. द लास्ट राईड - हे काहीसं पॉवरबाँब सारखंच. पण अंडरटेकर टच.

३. टूंबस्टोन पाईलड्रायव्हर - यानंतर जे तो जीभ बाहेर काढून प्रतिस्पर्ध्याला पिन करायचा, ते लहान असताना लई डेंजर वाटायचं.

४ हेल'स गेट - ही सब्मिशन मूव्ह होती. वर्णनापेक्षा बघाच.

अंडरटेकरबद्दल आणखी काही गोष्टी.
१ - लहान असल्यापासून डब्ल्यू डब्ल्यू एफ (आता ई) चं वेड होतं. आणि तेंव्हा अंडरटेकर हे 'भूत' आहे अशी फार चर्चा होती. आणि ते खरंही वाटायचं. म्हणजे त्याचं ते भयानक प्रकारे येणं, डोळे वर फिरवून पिन करणं इत्यादी गोष्टी जाम थ्रिलिंग आणि खर्‍या वाटायच्या.

२. पूर्वी त्याच्या बरोबर पॉल बेअरर नावाचा त्याचा मॅनेजर असायचा. तो एक कमंडलूसारखी बाटली सोबत घेऊन असायचा. अंडरटेकर्स अर्न असं त्या गोष्टीचं नाव. त्यात म्हणे अंडरटेकरचा आत्मा आहे. (हे लिहितानाही मजा येतेय) पण असाच आमचा विश्वास होता एकेकाळी.

३. त्याची स्ट्रीक. - रेसलमेनियातला त्याचा रेकॉर्ड २३-२ असा आहे. पंचवीस रेसलमेनियापैकी २ मधे तो हरला. १ ब्रॉक लेसनर आणि २ रोमन रेन्स (शेवटची मॅच)

हां, अंडरटेकर आणखी एक मॅच हरला. वाईट हरला. आणि त्याला हरवणारा एक भारतीय होता याचा सार्थ अभिमान आहे. तो दुसरा तिसरा कुणी नसून; नाही, रजनीकांत नाही. रजनीकांत फक्त ओव्हरटेक करतो, अंडरटेक नाही. तर तो होता आपला अक्षय कुमार !

४ इतर रेसलर्ससारखा अंडरटेकर काही जबरदस्त मस्क्युलर नाही. पण ७ फुटी उंची आणि रूंद बांधा यामुळे तो नेहमीच डॉमिनेटिंग वाटला.

५ केन हा त्याचा सावत्र भाऊ आहे, व त्यांचं वैर आहे अशा चर्चा होत्या. पुढे 'ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन' नावाने त्यांनी पार्टनरशिप केली व अनेक रंजक सामने प्रेक्षकांना बघायला मिळाले.

६ अनेकदा प्रतिस्पर्ध्याला अंडरटेकरने हरवल्यावर रिंगजवळ एक शवपेटी आणली जाई, व अंडरटेकर प्रतिस्पर्ध्याला त्यात ढकलून झाकण बंद करत असे. आणि घोगर्‍या आवाजात माईकवर 'रेस्ट... इन... पीस....' म्हणून एक्झिट घेत असे. जाम भारी वाटायचं ते.

डब्ल्यू डब्ल्यू ई पूर्वीपासून बघत आलोय. आजही बघतो वेळ मिळाला की. हे ठाऊक आहे की त्या कोरिओग्राफ्ड फाईट्स आहेत आणि प्रत्यक्षात असं कुणी कुणाला खरं मारलं तर मरायचीच लक्षणं आहेत. पण तरीही टीव्हीवर ते बघताना खरं वाटतं. मजा येते. काहीतरी संचारतं. थोडक्यात; मनोरंजन होतं. लहानपणी आमच्या शाळेतल्या, राहत्या भागातल्या काही मुलांनी डब्ल्यू डब्ल्यू ई सारख्या मारामार्‍या प्रत्यक्षात करायचे प्रयत्न करून आपल्याला व इतर कुणाला दुखापत करून घेतल्याचे किस्सेही झाले. आम्ही इतके सूज्ञ होतो किंवा घाबरट म्हणा, की खरं खुरं तसं मारायचा प्रकार कधी केला नाही. पण ट्रंप कार्ड्स मात्र खूप खेळलो. And with The Undertaker's card, we always knew we had a winner in our hands.

मार्क विलियम कॅलवे. जन्म २४ मार्च १९६५ आजचं वय ५२ वर्ष.
मिनिस्ट्री ऑफ डार्कनेस म्हणा, अमेरिकन बॅड अ‍ॅस म्हणा, बिग ईव्हल किंवा द अंडरटेकर. रेसलिंग रिंगमधे जरी हा अवलिया आता कुणाला 'हिट' करणार नसला तरी यूट्यूबवर त्याचे व्हिडियोज मात्र हिट्स मिळवत राहतील.

जाता जाता द अंडरटेकर ची काही अवतरणे. (स्त्रोत आंतरजाल असल्याने सत्यासत्यता पडताळलेली नाही. तरीही बरीचशी ऐकलेली आहेत यातली.)

The fear of death is far greater than the death itself. But the fear of the unknown is the greatest fear of all!
The Undertaker

There is no shame in going out fighting and getting your ass kicked, but there is no honor in not fighting at all.
The Undertaker

You can not kill that which is already dead.
The Undertaker

I may not dress like Satan anymore, but I’m still down with the Devil and I will go medieval on your ass.
The Undertaker

If the eyes are the windows to the soul, you're not going to like the view.
The Undertaker

You better give your soul to the Lord, because the rest of your scrawny ass, will belong to me!
The Undertaker

I don`t make mistakes. I bury them.
The Undertaker

Sometimes it's hell getting to heaven
The Undertaker

Evil comes in all shapes and sizes.
The Undertaker

UT

व्यक्तिचित्रक्रीडाप्रकटनविचारलेखबातमी

प्रतिक्रिया

आता खरोखर मोठे झालोय याचा भास होतोय साला .
wwe बघणे केव्हाच सोडून दिलं. पण अधून मधून युट्युब वर suggested मध्ये यायचा अंडरटेकर ..

जबरदस्त एंटरटेनर..

प्रफुल्ल's picture

4 Apr 2017 - 3:58 pm | प्रफुल्ल

पूर्वी त्याच्या बरोबर पॉल हेमन नावाचा त्याचा एजंट असायचा

पॉल बिअरर होता ना तो... wrestlemania madhey aahe na match roman reigns vs the undertaker

वेल्लाभट's picture

4 Apr 2017 - 4:18 pm | वेल्लाभट

बरोबर. मिस्टॅक झाली. सुधारतो.

आणि रेस्लमेनिया झालं कालच. कालचीच बातमी आहे ही.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2017 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा

आम्ही त्याला डबलडेकरअंडरटेकर म्हणायचो! ह्या ह्या ह्या!

पिलीयन रायडर's picture

4 Apr 2017 - 7:58 pm | पिलीयन रायडर

मला अजुनही कळालेलं नाही की ही मारामारी बघण्यात नक्की काय मजा आहे.. नवरा मात्र भक्त आहे. एकवेळ ते ही ठिकच.. पण हाईट म्हणजे माझ्या सासुबाईंना अंडरटेकर आवडायचा म्हणे.. आता बोला!

वेल्लाभट's picture

4 Apr 2017 - 8:25 pm | वेल्लाभट

हााहााहा

ज्याला आवडतं त्याला आवडतं!
सासूबाईंचं नवल आहे. आवडण्याबद्दल नाही तर मागील पिढीतलं असून आवडण्याबद्दल. She seems to be ahead of time here.

Ranapratap's picture

4 Apr 2017 - 9:01 pm | Ranapratap

अंडरटेकर ची मॅच पाहायला मजा येते. मी अजूनही wwe पाहतो. छान लेख आवडला.

रावसाहेब म्हणत्यात's picture

4 Apr 2017 - 9:59 pm | रावसाहेब म्हणत्यात

आमचा केबलवाला काही वायर इकडे-तिकडे करायला किंवा बिलं घ्यायला आला कि आम्ही ५-६ वर्षाचे त्याला सांगायचो, "ओ अंकल अंडरटेकर-योकोझुना फ़ाईट जास्ती लगावो". काय मज्जा यायची त्या जापानी जाड्या आणि त्या प्रेतासारख्या दिसणाऱ्या अंडरटेकरला बघायला.

सावत्या's picture

4 Apr 2017 - 11:32 pm | सावत्या

रेस्टलिंगचा प्रचंड फॅन अजूनही....
मला आठवतंय ९/१० वि च्या दरम्यान प्रचंड क्रेझ होती आमच्या शाळेत. मधल्या सुट्टीत वर्गाचा दरवाजा लावून रेस्टलिंगचा खेळ चालायचा. रॉयल रम्बल, स्मॅक डाउन,रॉ, रेस्टल मॅनिया आणि काय काय.... बरं ह्या मॅचेस दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपण कंटिन्यू व्हायच्या. रेस्टलिंग कार्ड्स गेम तर चालू तासालापण चालायचा.
ब्रेट हार्ट, त्याचा भाऊ ओवेन हार्ट, क्रश, डिझेल, टटॅन्का, योकोझुणा, लेक्स लुगर, केन, रेझर रेमोन, ट्रिपल एच आणि कितीतरी...
पण माझा सर्वात आवडता होता तो शॉन मायकल..... खुरटी दाढी, लांब सोनेरी केस, सतत चुईंग गम चंगळणारा ,सहजासहजी न हरणारा...
आणि दुसरा होता रॉक.. can you smell what the rock is cooking ...

मस्त लेख.... परत त्या दिवसांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद......

प्रसन्न३००१'s picture

5 Apr 2017 - 12:33 pm | प्रसन्न३००१

can you smell what the rock is cooking

IF YOUUUU SMEEELLLLL , WHAT THE ROCK IS COOOKING !!!!

असं आहे ते ;)

वेल्लाभट's picture

5 Apr 2017 - 12:42 pm | वेल्लाभट

रॉकचे तर आपण एक नंबर पंखे हं!

त्याच्यावर कुणाचाच नंबर येत नाय. कधीच येणार नाय.

जगप्रवासी's picture

5 Apr 2017 - 3:53 pm | जगप्रवासी

लहानपणापासून रॉकच्या दंडावर असणाऱ्या टॅटूच आकर्षण होत आणि मोठं होऊन कमावत झाल्यावर तो माझ्या दंडावर देखील कोरला गेला.

अंडरटेकर बद्दल नेहमीच भीती वाटायची. लहानपणीच्या आठवणी जाग्या केलात.

भटक्या चिनु's picture

5 Apr 2017 - 12:18 am | भटक्या चिनु

वेल्लाभाऊ,

लेख जबरीच. दोन्ही घटना खूप खेदजनक. एकीकडे शास्त्रीय संगीताचा सूर हरपला तर दुसरीकडे आपले बालपण. अंडरटेकरचे खरे नाव Mark William Colaway. त्याच्याएवढी प्रसिद्धी व लोकांचे प्रेम क्वचितच काहींना मिळाले असणार. एका अ-मृत युगाचा अस्त. आता फार काही मजा नाही Wrestlemania बघण्यात.

वेल्लाभट's picture

5 Apr 2017 - 12:41 pm | वेल्लाभट

एका अ-मृत युगाचा अस्त

वाह काय लिहिलंयत !

अप्पा जोगळेकर's picture

5 Apr 2017 - 10:41 am | अप्पा जोगळेकर

हे सामने स्क्रिप्टेड असतात ना.
मग अक्षय कुमारने त्याला हरवले म्हणजे काय ?
का ती मॅच खरीखुरी होती ?

अभिजीत अवलिया's picture

5 Apr 2017 - 10:47 am | अभिजीत अवलिया

हो स्क्रिप्टेड असतात ह्या मॅचेस. काहीही खरे नसते.
लेखाने जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लहान असताना केवळ अंडरटेकर ह्या व्यक्तीमुळे WWE ची गोडी लागली. ह्या फाईट खऱ्या असतात असेच तेव्हा वाटायचे. तो भूत होता, त्या बाटलीत त्याचा आत्मा होता, तो तीनवेळा मरून जिवंत झाला आहे अशा बऱ्याच गोष्टी तेव्हा खऱ्या वाटायच्या.

वेल्लाभट's picture

5 Apr 2017 - 10:59 am | वेल्लाभट

स्क्रिप्टेडच. कोरिएग्राफ्ड.

अक्शयकुमारची मॅच तर खिलाडियोंका / इंटरनॅशनल खिलाडी मधली होती. बॅालिवुड. म्हणजे more than scripted.

प्रसन्न३००१'s picture

5 Apr 2017 - 12:24 pm | प्रसन्न३००१

तो खरा अंडरटेकर न्हवताच.. त्याच्यासारखा दिसणारा कोणीतरी दुसराच रेसलर होता.

रेसलमानिया ३० मध्ये ब्रॉक लेसनरने २१-० स्ट्रिक मोडल्यावर जेवढे दुःख झाले न्हवते तेवढे या वर्षीची रेसलमानिया बघून झालं. मॅच हरल्यानंतर कोणताही गाजा-वाजा न करता रेसलिंग गिअर्स काढून रिंग मध्ये ठेवायचा क्षण तर एकदम भारीच. WWE च्या क्रिएटिव्ह टीम ला सलाम...

पण वेळीच निवृत्त झाला, तसं पण रेसलमानिया ३० पासूनच वाघ आता म्हातारा झालाय हे जाणवत होतंच. त्यात त्याला काँकशन झालेलं, त्यामुळे शरीरावर अजून काही परिणाम व्हायच्या आधी निवृत्त झाला हे चांगलंच झालं.

माझं बालपण मात्र संपलं आता. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी

#ThankYouTaker #Phenom #Legend

वेल्लाभट's picture

5 Apr 2017 - 12:40 pm | वेल्लाभट

तो खरा अंडरटेकर न्हवताच.. त्याच्यासारखा दिसणारा कोणीतरी दुसराच रेसलर होता.

अर्थातच ! पण वाटला ना? बास :)

हो तो म्हातारा झालाच होता. डब्ल्यू डब्ल्यू ई च्या क्रिएटिव टीमला खरंच सलाम.

काँकशन बद्दल माहिती नव्हतं. तुमचा प्रतिसाद वाचून तेही शोधलं गूगलवर. नवीन माहिती कळली.

#मिसयूटेकर फॉर शुअर.
देअर विल बी ओनली वन अंडरटेकर. ओनली वन.

प्रसन्न३००१'s picture

5 Apr 2017 - 12:50 pm | प्रसन्न३००१

खिलाडीओं का खिलाडी मधली अंडरटेकर - अक्षय कुमार फाईट बघताना तेव्हा अजून एक गोष्ट जाणवायची कि

शॉन माइकल्स हा एका साईड ने अक्षय कुमार सारखा दिसतो :D

वेल्लाभट's picture

5 Apr 2017 - 1:10 pm | वेल्लाभट

हो ! हे लक्षातच नव्हतं आलं.

पण शॉन मायकल्स चं ट्रिब्यूट चं गाणं जाम आवडतं. काटा आणतं बा अंगावर ऐकताना.

टेल मी अ लाय, से दॅट यू वोन्ट गो. जरूर ऐका.

"Tell Me A Lie (Hbk Tribute)" Lyrics
WWF Superstars

I've known you all my life
At least thats how it seems
Never known my own way
Livin' out of dreams
Now I know you're leaving me
And I'll never understand
Before I let you walk away
I have one last demand

Tell me a lie, and say that you wont go
Look in my eyes, and hold me even though
I realize you have to walk away
No more yesterday...

You always were my angel
Flying high above
Always lookin out for me
Angel that I love
Now my dreams are fading
Like age-old photographs
They hurt too much to look at now
Reminds Me Of Our Past

Tell me a lie, and say that you wont go
Look in my eyes, and hold me even though
I realize you have to walk away
No more yesterday...

Maybe we could stay together
Maybe it could last forever
Maybe if you'd just tell me a lie
Maybe then we'll never say goodbye

जाऊदे. हार्ट ब्रेक किड वर एक धागा लिहिणं आलं आता. :(

प्रसन्न३००१'s picture

5 Apr 2017 - 2:04 pm | प्रसन्न३००१

येउद्या

प्रसन्न३००१'s picture

5 Apr 2017 - 2:40 pm | प्रसन्न३००१

चांगलं आहे ट्रिब्युट सॉंग... पण हे फॅन-मेड आहे का WWE चं ऑफिशिअल ट्रिब्यूट व्हिडीओ आहे. १९९९ मध्ये दुखापतींना, नशेबाजी मुळे आणि त्यातून आलेल्या नैराश्याला कंटाळून शॉन ने निवृत्ती घेतली होती, तेव्हाचा हा व्हिडीओ वाटतोय.

Shawn Michaels Tribute Video हा ट्रिब्यूट व्हिडीओ बघा, मस्त आहे :)

वेल्लाभट's picture

5 Apr 2017 - 2:48 pm | वेल्लाभट

हा फॅन व्हिडियो आहे. अनेक मिळतात यूट्यूब वर. छान आहे तुम्ही दिलेला पण

मदनबाण's picture

5 Apr 2017 - 12:01 pm | मदनबाण

मिस यू अंडरटेकर !

{ एके काळचा डब्लू डब्लू एफ प्रेमी }
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dragon embrace will prove costly for India

किसन शिंदे's picture

5 Apr 2017 - 2:24 pm | किसन शिंदे

डब्लू डब्लू एफच्या फाईट्स त्या केवळ हल्क हॉगन आणि हिटमॅनमुळे पाहायला सुरुवात केल्या होत्या. यथावकाश अंडरटेकर, बिग शो, द रॉक, रे मिस्टेरियो ही मंडळीही आवडली होतीच.