एकाच माळेचे मणी

Primary tabs

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
14 May 2018 - 10:28 am

विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते.

पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले.

बाईनी फुले सोडून बऱ्यापैकी नेत्यांची (गोखले, आगरकर, गांधी वैगेरे) लायकी काढली. पुढे बाई साहित्यावर घसरल्या. पुलंच्या बटाट्यांच्या चाळीतल्या उपवासाचा आणि समाजाच्या भूखेचा संबध जोडला. अरेरे! पुलंचा विनोद त्यांना कळला नसेल असे मी समजून घेतले. पुढे बाई “हिरवेहिरवे गार गालिच्यावर घसरल्या ”, बालकवींची लायकी काढली, ही कविता शालेय अभ्यासक्रमात असू नये असे त्यांचे म्हणणे ; कारण मराठवाड्यात दुष्काळ आहे तर कोठून येणार हिरवे हिरवे गार गालिचे? अरे बाई मराठवाड्यातल्या लोकांना कमीत कमी कवितेत तरी गार गालिचे बघू देत कि असे मला म्हणावे वाटले. पुढे हे सर्व नको तर काय शिकवायला हवे ? नारायण सुर्वेंची, “भाकारीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली”, ही कविता शिकवायला हवी असे त्या म्हणाल्या . पण ती तर आधीच अभ्यासक्रमात आहे हे बहुधा त्या विसरल्यात.

पुढे १०+२ +३ वर आल्या.. नंतर बाई इतिहास, साहित्यावरून गणितावर आल्या... कशाला हवे म्हणे कॉस थीटा मायनस साईन थीटा... आता मात्र माझे टाळके सटकले , बाईंना काय माहित कॉस थीटा मायनस साईन थीटा कशाला वापरतात... बाईना काय माहित कोणता इंजिनिअर हे सर्व वापरतो, बाईना काय माहित मंगळावर यान कसे पोहचले, किती गणिते करावी लागली? अजून बाईना काय माहित कि मोठ्या मोठ्या मशीन्स कशा बनतात , त्यात ह्या कॉस साईन Tan चा काय उपयोग, कसा माहित असेल? बाई कायद्याच्या पदवीधर होत्या, एखादी सायन्स रिलेटेड केस बाई कशा काय सोडवणार, ते जावूदे पण ज्या समाजाला त्या उद्देशून बोलत होत्या त्या समाजाने फक्त कामगार म्हणूनच जगावे आणि भाकरी मिळवावी अशी त्यांची भाषा होती, इंजिनिअर वैगेरे असली स्वप्ने पहा, किंवा साहित्यातले दर्दी व्हा असे सांगत नव्हत्या.

असो, सांगण्याचा मुद्दा हा कि प्रत्यकाने अभ्यासून प्रकट व्हायला पाहिजे, जोरजोरात चुकीचे सांगू नये. समाज चुकीच्या दिशेला भरकटू शकतो. त्या रामतीर्थकर बाई काय किंवा ह्या बाई काय किंवा ते फक्त ईश्वर भक्तीत विलीन व्हा असे सांगणारे बुवा काय किंवा हाच एक पंथ बरोबर असे सांगणारे काय, किंवा आता श्रमदानावर टीका करणारे काय किंवा मोदी भक्त काय...सारेच एका माळेचे मणी.

आपल्याला एवढे लोक फोलो करतात तर किमान त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नये इतकाही विवेक लोक ठेवत नाहीत.
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?

विचारप्रतिसादप्रतिक्रियालेखमतसमाज

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

14 May 2018 - 2:26 pm | चांदणे संदीप

एक्झॅटली पर्फेक्ट!!

Sandy

विशुमित's picture

14 May 2018 - 4:05 pm | विशुमित

सारेच एका माळेचे मणी म्हटल्यावर विषयच संपतो.
तेवढी तुम्ही पाहिलेल्या विडियो ची लिंक दिली असती तर आमचे ही ज्ञानार्जन झाले असते.

मार्कस ऑरेलियस's picture

16 May 2018 - 9:18 pm | मार्कस ऑरेलियस

विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही द्या ना ! ओफिसात काम नसेल तेव्हा पाहीन म्हणतो , इथे युट्युब लिन्क ओपन होत नाही आणि घरी जाऊन स्वतःचा अमुल्य वेळ असल्या गोष्टींवर कशाला वाया घाल्वा !

असो. सर्वसाधारण आशय लक्षात आलाय लेखनाचा !

हां तर असले काही वाचले की भारी वाटते . आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे समाजाचे क्लस्टरींग झाले आहे ! आणि लोकं काय बोलतात ह्याव्रुन साधारण ते कोणत्या समाजचे , कोणत्या विचार्धारेचे असतील ह्याचा अंदाज यायला लागलाय ! बाईंनी ज्या ज्या लोकांची लाय्की काढली त्यावरुन बाई कोणत्या समाजाचा आहेत हयचा सर्वसाधार्ण आंदाज येत आहे ! हे लोकं स्वतःच्याच समाजाच्या लोकांची दिशाभुल करत आहेत , " इतर" समजाचाचा फायदाच होत आहे , तस्मात ही इष्टापत्तीच आहे इतर समाजच्या लोकांसाठी =))))

युटुबवर " अमुकतमुक समाजाची वाघीन - पहा भिडे गुरुजीला कसे ठणकावले असले किंव्वा अमुकतमुक समाजाच्या वाघ: निखिल वागळेंना विचारला जाब " असले व्हिडीओ पाहिले आहेत , २२-२४ वर्षाची पोरं पोरी . ना धड इतिहासाचा अभ्यास ना ना तत्त्वज्ञान , ना समाज्शास्त्र , ना साहित्य संगीत कला . युट्युब फेसबुक सारखा फोरम मिळाला म्हणुन काय वाट्तेल ते बरळायचं , अन लोकंही त्याला पहाताहेत लाख लाख व्हुव्ह्ज ! पोरं पोरी लगेच हवेत ! सगळाच आनंद ! मजा आहे ! स्वतःच्याच समाजाला अधोगतीला घेवुन जाणार असले नेते ! अन मग ना धड शिक्षण ना नोकर्‍या मग परत बेरोजगारी अन गरीबी ! दुनिया कुठे चाललीये , आपण काय बोलतोय कशाचा ताळमेळ नाही ! मग काय जे स्वाभाविक आहे तेच होणार !

डार्विनप्पा म्हणाले ते खरेच - सरव्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट !

असो . आपण त्या अमुकतमुक समाजाचे नाही, आपण अलिप्त राहुन मजा पाहु , आपल्या समजाच्या लोकांना आपण कोणाचाही द्वेष करायला नको शिकवुया : सावरकर वाचा पण आंबेडकरही वाचा , गांधी वाचा पण गोडसेही वाचा . भारताची आगतिक फाळणी वाचा अन अमेरिकेचे फाळणी टाळायला केलेले सिव्हिलवॉरही वाचा.
जगद्गुरु तुकाराम वाचा अन समर्थ रामदासही वाचा. साईन थीटा कॉस थीटा ही वाचा अन बिजनेस मॅनेजमेंटही वाचा !
आण्णि हो , जे वाचु नका म्हणत आहेत त्यांना शहाणे करायला जाऊ नका , ते तुम्हालाच चावायला येतील , त्यापेक्षा त्यांचे विडिओ पाहुन व्ह्युव्ह्ज वाढवा ते त्यात्चह खुष आहेत , त्यांना प्रोत्साहन द्या - है शाब्बास , जिकलस भावा , लढ तु , असे प्रतिसादही द्या वाटल्यास =)=))))

आपण आपले आपल्या पुरते पाहु: जे चांगले आहे ते घेवु , जे वाईट आहे ते टाकुन देऊ ! आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: !!

अभ्या..'s picture

16 May 2018 - 9:30 pm | अभ्या..

परफेक्ट रे मारक्या.
सध्याचे हे असले युट्युबावरचे व्हिडीओ पाहता केवळ हे आणि हेच करु शकतो. कीव, सहानुभूती, आदर,अभिमान असा कुठलाही भाव मनी न येता केवळ हेच वाटते.
मरु दे तिज्यायला.
अंबानीसारखे रोज दिड जीबी वाटताहेत. सुलभ हप्त्यावर स्मार्ट्फोनं धडाक्यात विकली जाताहेत. अगदी जोमात विष पेरले जातेय. विषाचेच पिक म्हनल्यावर ना किडीचा धोका ना उपटायची भिती.
मरु दे तिज्यायला.

मार्कस ऑरेलियस's picture

17 May 2018 - 8:59 am | मार्कस ऑरेलियस

आत्ता पाहिला बाईंचा व्हिडिओ !
एकच नंबर !
फॅनच झालो आपण मॅडमचा !
मॅडम तुम्ही अशीच भाषणे देत रहा तुमच्या समाजाला ! खरय , कशाला हवेत बालकवी अन केशवसुत ? कशाला हवे कॉस थीटा आणि साईन थीठा ? कशाला हवे आगरकर अन गोखले ? कशाला हव्यात एतद्देशीय भाषा अन संस्कृत फिंस्कृत ? तुम्ही तुम्हाला हवे ते शिका ! हे सगळे ब्राह्मणवाद्यांसाठी सोडुन द्या , त्यांचं त्यांना अभ्यासु द्या .

बेस्ट आहे भाषण , कित्ती लोकं ऐकताहेत भाषण . पाहुन कसं रिलॅक्स वाटल ! असं काही ऐकलं की पुढच्या पिढ्यांना कराव्या लागणार्‍या संघर्षा बद्दलची काळजी थोडी कमी होते :)
=))))

माहितगार's picture

17 May 2018 - 1:17 pm | माहितगार

युट्यूबवर एकच भाषण बहुधा तीन भागात दिले असावे . चुभूदेघे

पहिल्या भागाची लिंक वर आलीच आहे.

भाग दुसरा
भाग तिसरा

गामा पैलवान's picture

14 May 2018 - 4:59 pm | गामा पैलवान

जेडी,

“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?

अगदी, अगदी !! हे वैचारिक पशूच म्हंटले पाहिजेत. आहार, निद्र, भय, मैथुन सोडल्यास जास्त काही करायची यांची क्षमताच नाही. नाहीतरी, साम्यवादास अशीच गाढवं अभिप्रेत आहेत.

आ.न.,
-गा.पै.

जयंत कुलकर्णी's picture

14 May 2018 - 5:18 pm | जयंत कुलकर्णी

मुद्दा त्यांनी काय सांगावे हा नाही आणि लोकांनी ते ऐकावे की नाही हाही नाही. मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही जर त्या बाईंचे म्हणणे खोडून काढलेत तर तुम्हाला तेथेच मार पडेल. हे मी अनुभवले आहे, पाहिले आहे. त्यामुळे सुज्ञ "जाऊ दे मरु देत" अशी भूमिका पत्करतात. याच्यातच आपल्या समाजाच्या र्‍हासाची मुळे दडली आहेत... असे आपले मला वाटते...

खरयं, भक्त कुठल्या थराला जातील काही सांगता येणार नाही इतके त्यांचे ब्रेन वोशिन्ग केलेले असते ह्या नेते मंडळीनी....

शाली's picture

15 May 2018 - 9:07 am | शाली

काय बोलायचं?

जेडी's picture

15 May 2018 - 12:19 pm | जेडी

काहीच नाही

स्नेहांकिता's picture

15 May 2018 - 11:29 am | स्नेहांकिता

हॉरिबल बोलतात त्या बाई !
लोक कसं काय ऐकून घेतात नवल आहे !

लोकांनी अक्कल गहाण ठेवलीय....

स्नेहांकिता's picture

15 May 2018 - 12:45 pm | स्नेहांकिता

बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला ठेवली, तर त्यांचा मुद्दा, की शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये, हा बऱ्याच अंशी व्यवहार्य आहे.

तारस्वरातील आवाजाचा ऐकायला त्रास होत असल्यामुळे विडिओ तुकड्या तुकड्यात ऐकला. हा मुद्दा मला पण पटला.
====
बाकी वक्त्यां कडून जेवढे चांगले, फायद्याचे, उपयोगाचे आणि पौष्टिक घायचे असते. बाकी दुसरा कान दिला आहेच देवाने.
पारावरच्या गोष्टी सगळ्याच गोष्टी निरर्थक असतात असे नाही. त्यातून गावात काय चालले आहे हे पण समजते.

जेडी's picture

15 May 2018 - 7:16 pm | जेडी

त्या फक्त >>>"शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये"

विशुमित's picture

15 May 2018 - 7:20 pm | विशुमित

वक्त्याच्या सगळ्या गोष्टी शब्दशः घायचा नाहीत हा कान मंत्र आमच्या बॉस ने आम्हाला दिला होता.

विशुमित's picture

15 May 2018 - 12:59 pm | विशुमित

लोकं लय ७२ खोडींची असतात.

प्राची अश्विनी's picture

15 May 2018 - 12:25 pm | प्राची अश्विनी

ऐकताना संताप येतो पण जयंत सर म्हणतात त्याप्रमाणे काही बोलण्यात अर्थ नाही. स्वत:च्या वागण्यातून , प्रेमानेच मतपरिवर्तन होऊ शकतं.( ही संघाची शिकवण खरंतर .) यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

म्हणजे 'गोड बोलून गळा कापायचा' ही म्हण आठवली. (कृपया हलके घ्या)

रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण अभ्यासोनी प्रकट झाला असता तर बरे असे उगा वाटून गेले.
असो. सगळेच एका माळेचे मणी म्हणल्यावर काय...

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 May 2018 - 5:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

या रामतिर्थंकर बाईंसारखेच वेगळे विचार ऐकायचे असतील तर सुशमा अंधारे याची भाषणे ऐका.
या बाई पणं तुफान बोलतात
पैजारबुवा,

रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय...

>>>>>>>>>>>
रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण अभ्यासोनी प्रकट झाला असता तर बरे असे उगा वाटून गेले.

नकोच ह्या बाईचा अभ्यास...

अभ्या..'s picture

15 May 2018 - 5:23 pm | अभ्या..

ओके
मग वाहा विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी.
नो प्रॉब्लेम.

फक्त वाद घालायचा म्हणुन कमेंट करत आहात का?, तुम्ही मांडा त्यांच्याविषयीचा अभ्यास...

फक्त वादच घालायसाठी धागेही काढत नाही की कॉमेंट ही करत नाही. जे माहिती आहे तेवढेच लिहितो.
अपर्ण रामतीर्थकर बाईबद्दल माहीत नसेल तर तुमचा मिपाचा अभ्यास कमी पडतोय. बरेच सापडेल हुडकल्यावर. त्यानिमित्ताने तुमचाही अभ्यास होईल कोण वाद घालण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचा.
काय म्हणता?

निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला अभ्यास करायची गरज वाटत नाही कारण मी अशी चार लोकांसमोर माझे विचार पाजळत नाही

मी अशी चार लोकांसमोर माझे विचार पाजळत नाही

मग हा धागा म्हणजे काय आहे?

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 May 2018 - 10:12 am | हतोळकरांचा प्रसाद

रामतीर्थकर बाईंबद्दल खालील धाग्यावर अतिशय तिखट आणि बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली होती की अभ्यासेठ.
adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती
त्यांच्या भाषणांवर टीका करणारे लोक हे तथाकथित पुरोगामी दृष्टिकोनातून बघतात म्हणून त्यांना ती पटत नाहीत असे दिसते. सर्वसामन्य माणसांच्या मात्र ती हृदयाला भिडतात हे मी स्वतः अनुभवले आहे. उपस्थित लोकांच्या रोजच्या जीवनातल्या अडचणींना त्या चांगल्या प्रकारे मांडतात आणि प्रॅक्टिकली पॉसिबल उपाय सांगण्याचा प्रयत्न करतात. स्त्री सक्षमीकरणासाठी अमुक केले पाहिजे तमुक केले पाहिजे अशी पोकळ भाषणबाजी बरेच लोक करत असतात पण त्याने घरातली परिस्थिती बदलते असे दिसत नाही. काही बाबतीत त्यांची मते आत्यंतिक असली तरी ती सोडून बाकीचे ग्रहण करण्यास काय अडचण?

गामा पैलवान's picture

15 May 2018 - 5:51 pm | गामा पैलवान

जेडी,

रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय...

एके मुद्दे पाहूया :

१. मुलींनी जास्त शिकु नये : स्वत: रामतीर्थकर बाई उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे जास्त शिकू नये हा मुद्दा गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

२. लवकर लग्न करावे : लग्नाच्या बाजारात मुलीच्या नशिबी फक्त पदावनतीच असते. विशीचा साधा मुलगा तिशीचा पण कमावता झाला तर ती पदोन्नती असते. याउलट मुलीच्या बाबतीत ती कितीही कर्तृत्ववान असली तरी वीस ते तीस ही पदावनतीच असते. हे असं का ते मला माहित नाही. रा.ती.बाईंना पण माहित नसेल बहुतेक.

३. नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये.

४. लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात.

५. पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... : प्रमाणाबाहेर हा शब्द राहिलेला दिसतोय.

असो.

रामतीर्थकर बाई वकिली शिकल्या असून विवाहविच्छेद होऊ नये म्हणून सल्लागार आहेत. बाईंची मतांचा हेतू कुटुंब एकसंध राखणे हा आहे.

आ.न.,
-गा.पै.

स्नेहांकिता's picture

16 May 2018 - 12:28 pm | स्नेहांकिता

नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये.

कुणी लग्न करू नये ? स्त्रियांनी की पुरुषांनी ? किती पुरुष बायको हेच आपले आयुष्य मानतात ? जे मानत नाहीत त्यांनी लग्न का करावे ?

गामा पैलवान's picture

16 May 2018 - 8:05 pm | गामा पैलवान

स्नेहांकिता,

ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. (मग ही व्यक्ती स्त्री असो वा समलैंगिक पुरुष.)

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

हेच वाक्य " ज्या मुलाला किंवा मुलीला लग्न झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या घायच्या नसतील, त्यांनी लग्न करू नये". असं सांगितलं तर सगळ्यांनाच पटेल ना.
ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये.
मुलींनी या वाक्याचा विचार करण्याची खूप मोठी गरज आहे. कारण सर्वस्व ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी होऊ शकते. लग्नानंतर नवरा + त्याच्या घरचे यांच्या अपेक्षा काय आहेत हे नीट माहित करून द्या -घ्या. स्वतःच करियर, आई वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, यांचं स्वतःला काय जमणार आहे हे नीट सांगा आणि सगळं सगळ्यांना पटलं तरच लग्न करा.
"लग्नानंतर जोडीदाराला सर्वस्व मानायचा किंवा प्राधान्य द्यायच नसेल तर लग्न करू नका " हे वाक्य जास्त बरोबर नाहीये का?

स्नेहांकिता's picture

16 May 2018 - 12:29 pm | स्नेहांकिता

लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात.

का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ?
हां, आता एकमेकांकडे दुर्लक्ष करून आईवडिलांशी (दोघांच्याही) गप्पा मारू नये , असे म्हटले तर ठीके !

गामा पैलवान's picture

16 May 2018 - 8:08 pm | गामा पैलवान

स्नेहांकिता,

आई (मुलीची मैत्रीण असली तरी तिच्या)शी जास्त गप्पा मारू नयेत. या वाक्यांत जास्त हा शब्द महत्त्वाचा आहे. मात्र एकमेकांकडे दुर्लक्ष करण्याविषयीचे नियम वेगळे आहेत. मुलगी जर मुलाच्या घरी राहायला आली असेल तर तिने घराचे नियम पाळायला हवेत. दोघे वेगळे रहात असतील तर वेगळे नियम असतात.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

17 May 2018 - 10:10 am | माहितगार

...का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ?

हिचे किंवा त्याचे -नाती किंवा मैत्री- म्हणून नाही , एखाद्या संवादातून संसारांतर्गतची एखादी निर्णय प्रक्रीया प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभावित होउन ती जोडीदारावर लादली जाऊ लागते , तेव्हा त्याची सोडवणूक क्लेषकारक ठरु शकते ही काहीवेळा चिंतनीय समस्या -खरेतर वेगळा धागा काड्।ऊन चर्चेस घेण्या जोगी असू शकते असे वाटते

स्नेहांकिता's picture

17 May 2018 - 11:16 am | स्नेहांकिता

पण काही वेळाच !!
सरसकटीकरण करण्याची गरज नाही.
शिवाय 'जोडीदार' म्हणणे योग्य आहे. केवळ 'नवरा' नाही.

त्या बाई जे काय म्हणतात ते त्यांनी सगळ्यांना म्हटलं असतं तर त्यांना एवढे अनुयायी नक्की मिळाले नसते. कारण फक्त मुलींनाच बदलायला सांगणं आपल्या समाजात अजूनही जास्त प्रमाणात घडतं.

जर त्या म्हणाल्या कि लग्न झाल्यावर मुलींनी आई बरोबर जास्त बोलू नये आणि मुलांनी रोज कट्ट्या वर जाऊन मित्रांबरोबर चकाट्या पिटू नये, दोघांनीही नीट जबाबदारीने संसार करावा तर जास्त अनुयायी मिळणं शक्य नाहीये :P

गामा पैलवान's picture

16 May 2018 - 12:04 pm | गामा पैलवान

वीणा३,

तुमचं बरोबर आहे. रामतीर्थकर बाई स्वत: स्त्री असल्याने पुरुषांनी काय करावं याचा सल्ला त्या कशा काय देणार? त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत.

आ.न.,
-गा.पै.

स्नेहांकिता's picture

16 May 2018 - 12:30 pm | स्नेहांकिता

त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत.

यू सेड इट !
त्यांचा मगदूर तेवढाच आहे !!

गामा पैलवान's picture

16 May 2018 - 8:10 pm | गामा पैलवान

स्नेहांकिता,

अहो, अपर्णाबाईंचा मगदूर तोकडा आहे हेच तर केव्हापासून सांगताहेत त्या. तुम्हांस गरज नसेल तर त्यांच्याकडे आजिबात लक्ष देऊ नका.

आ.न.,
-गा.पै.

वरच्या लिंक मधला विडिओ अपर्णा रामतीर्थंकर बाईंचा नाहीये, दुसऱ्याच कोणीतरी आहेत. ह्या पण गमतीशीर आहेत.

मी माझ्या लेखात रामतीर्थकर बाईंचा उल्लेख केलाय म्हणुन त्यांच्यावरच चर्चा .

पिलीयन रायडर's picture

17 May 2018 - 12:32 am | पिलीयन रायडर

अंधारे बाई इतक्या टाकाऊ सुद्धा नाही आहेत. त्यांचा राग समजून घेऊ शकतो आपण. पिढया न पिढ्या अन्याय झालेले लोक ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्या बद्दल असेच बोलणार. त्यात नवल काय?

शिकण्याची मुभा मिळाल्या नन्तर, समोर जर ब्राह्मणी विनोद म्हणता येतील असे पुलंचे धडे आणि बालकवींच्या कविता येत असतील तर मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय?

हा राग सिलेक्टिव्ह असेलही, अगदी मोजके धडे निवडून त्यावर केलेलं भाष्य असेलही. पण मुख्यतः मजुरीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना मार्केट मध्ये उपयोगी शिक्षण मिळावे असे वाटले आणि ते हे नाही हे ही कळले बरोबर च आहे की. शिवाय शिक्षण क्षेत्रावर आणि पर्यायाने अभ्यासक्रमावर ब्राह्मणी छाप असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिरवे गार गालिचे किमान कवितेत तरी बघू द्या हे म्हणणं सुद्धा हास्यास्पद आहे. हे म्हणजे हेमलकसा इथल्या आदिवासी मुलांना शिकवताना अ अ अननसाचा असं शिकवू तरी द्या म्हणण्या सारखं आहे. ह्याच्याशी रिलेट होता येत नाहीये ते शिकताना त्यांना वैताग येऊ शकतो. सुर्वेंची कविता सुद्धा नव्हती असं म्हणत नाहीयेत त्या, उशिरा आली असं म्हणल्यात.

एखाद्या वक्त्याने जाहीर सभेत साइन thita चा काही उपयोगच नाही म्हणणं मात्र चुकीचं आहे. खासगी मध्ये मी वकील झाले, कशाला उगाच ते गणित शिकले म्हणणं ठिके. पण जाहीर सभेत हे बोलणं वेडेपणा आहे. शिवाय प्रमुख अजेंडा ब्राह्मणद्वेष धगधगता ठेवणं हाच असावा, त्यामुळे फायदा कुणाचाही होणार नाही हे स्पष्ट आहे. फक्त आपणही जातीयतेच्या चष्म्यातून बघत आहोत का हे तपासावे लागेल. कारण चुका झाल्या आहेतच. त्या मान्य करता येणं आवश्यक आहे. नुसतं पुलंचं नाव घेतलं म्हणून बिथरून चालणार नाही.

(ते संपूर्ण भाषण नसावं, मी सुद्धा थोडंच ऐकलं आहे. मला तरी त्यांचे काही मुद्दे पटले. )

गामा पैलवान's picture

17 May 2018 - 2:19 am | गामा पैलवान

पिराताई,

मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय?

एकदम मान्य. पण म्हणून संत ज्ञानेश्वर किंवा पुल यांची थेट लायकी काढायची गरज नाही. शिक्षण अनुचित असेल त्यात पुल किंवा ज्ञानेश्वर काय करणार. अंधारे बाईंचा शैक्षणिक क्षेत्राचा काही अभ्यास वगैरे आहे का? वक्तव्यावरनं दिसंत तरी नाही.

आ.न.,
-गा.पै.

पिलीयन रायडर's picture

17 May 2018 - 8:11 am | पिलीयन रायडर

मला त्या बाईंचं समर्थन अजिबात करायचं नाहीये. मलाही पुलं आणि संत ज्ञानेश्वर तितकेच प्रिय आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांचा राग स्वाभाविक आहे. की बाबा पार रेडा सुद्धा शिकू शकतो, पण आम्ही माणसं असून नाही शिकू शकलो. ह्यात रडार वर ज्ञानेश्वर नसून बहुदा त्यांचा समाज आहे. एकनाथ महाराजांचंही तसंच.

असो..

गामा पैलवान's picture

17 May 2018 - 12:27 pm | गामा पैलवान

पिराताई,

टीका रचनात्मक हवी ना? नाहीतर तिला बदनामीचा वास येतो.

रेड्याने नुसती पोपटपंची केली होती. इतकंही अंधारेबाईंना माहित नाही काय? त्या पशूला कोणीही काहीही शिकवायला गेला नव्हता, आणि तो पशू काहीही शिकला नाही. मग शिक्षणाच्या नावाने शंख कशासाठी? ब्राह्मणांच्या बदनामीसाठी म्हणून हा बनाव रचल्याचा संशय येणारंच ना?

सांगायचा मुद्दा काय की हेतू कितीही स्तुत्य असला तरी टीका रचनात्मकच हवी.

आ.न.,
-गा.पै.

पिलीयन रायडर's picture

17 May 2018 - 1:22 pm | पिलीयन रायडर

रचनात्मक हवी हे मान्यच. पण तुम्ही फार शब्दशः घेताय. ब्राह्मणांची बदनामी करत आहेत, द्वेष वाढवत आहेत असं वाटलं तरी त्यांना ह्याच सिस्टिमने वंचित ठेवलं हे सत्य आहे. ते सुद्धा मान्य करा. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने सत्य बदलत नाही. मला कळत नाही की इतकी वर्षे अन्याय झाल्यावर कुणी आपल्याबद्दल अदबीने बोलेल ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांचे हेतू चुकीचे असतील, पण मूळ मुद्दा हा अभ्यासक्रम रिलेटेबल न वाटणे हा असून,तो मला मान्य आहे. आता आमच्या सावित्री मावशीला शिकवायला गेलो तर तिला हिरवे गार गालिचे जवळचे वाटणार की भाकरीचा चन्द्र. तुम्हाला कविता, पद्य शिकवण्यात रस असेल तर तिला समजेल ते उदाहरण द्यायला हवे ना. समाजातल्या मोठ्या भागाला ते समजत नसेल तर ठिके. त्यांनी पुलंचा विनोद समजून घ्यावा कारण आमच्या लेखी ते ग्रेट होते असं नाही म्हणू शकत आपण. त्यांना ज्ञानेश्वर सुद्धा तितके ग्रेट वाटत नसतील, तो त्यांचा चॉईस झाला. शिवाय त्या ज्ञानेश्वरांना बोलत नसून, समाजव्यवस्थेवर बोलत आहेत असा माझा समज आहे. रेड्याने पोपटपंची तरी केली, इतरांना तो तरी हक्क होता का? सावलीचा विटाळ मानला जात होता, तिथे वेद कानावर पडू तरी दिले जात होते का?
तुम्ही एक सेकंद त्यांच्या बाजूने विचार करा ना. ब्राह्मणांना मिळालेला हेड स्टार्ट त्यांना नाहीच मिळालाय. सगळीकडचा उच्च वर्णीय प्रभाव त्यांना जास्त जाणवणार. तुम्हाला पुलं इतके खटकणार नाहीत. पण उपाशीपोटी झोपणाऱ्याला "उपास" हा धडा विनोदी वाटेल का?
असो, माझा काही तत्कालीन समाजव्यवस्था वगैरे टाईप चा सखोल अभ्यास नाही. मला फक्त "आपण" आणि "ते" अशी दरी आहे हे समजतं आणि आजही मी ब्राह्मण आहे म्हणून माझा कुणाला राग येत असेल तर तो का हे ही समजतं. म्हणून मला अंधारे बाईंची भाषणं इतकी टाकाऊ वाटली नाहीत इतकंच.

गामा पैलवान's picture

18 May 2018 - 1:31 am | गामा पैलवान

पिराताई,

हा वंचित म्हणजे नेमका काय प्रकार आहे? आणि त्यांचा संबंध वेदांशी व ब्राह्मणांशी का म्हणून लावला जातोय?

वेदपठण ही पोट भरायची विद्या नाही. मग वेद कुणी ऐकले काय अन न ऐकले काय, काय फरक पडतो? इंग्रजांनी जर कारकूनी नोकऱ्या निर्माण केल्या तर त्याचा दोष ब्राह्मणांकडे कसा काय?

या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत अशी अपेक्षा नाही. किंबहुना हे असे प्रश्न तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडंत नाहीत. म्हणून अंधारेबाईंसारख्या लोकांचं फावतं. वंचितांच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष जोपासता येतो.

धनगर मागास जाती होती ना? आजूनही ती मागासच आहे. विशेषत: महाराष्ट्रातले धनगर मागास धरले जातात. मग अहिल्याबाई होळकर कुठनं उत्पन्न झाल्या? हे रचनात्मक जाती उत्थान का लोकांसमोर मांडलं जायला हवं. (मुघल भारतीय धरले तर,) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान मल्हारराव होळकर होते ना?

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

18 May 2018 - 8:12 am | माहितगार

सुषमा अंधारेंचे भाषण सोईस्कर राजकीय भाषण आहे , ते त्यांची मतपेटी बळकट करून घेणारी राजकीय भूमिका म्हणून बघावे लागेल . त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली तर त्या काँग्रेस किंवा भाजपात जाणार नाहीत अशी शक्यता कमी वाटते .

१) वेद असो वा इतर धर्मग्रंथ त्यातील जन्माधारे न बांधली जाणारी समानसंधी महत्वाची होती आहे आणि राहील. फक्त अर्थार्जन नाही म्हणून समान संधीचे तत्व नाकारता येत नाही , आणि अगदी पुरोहित शाही पर्यंत तुम्ही समान संधी देता नाही तो पर्यंत टीकेला सामोरे जाण्या शिवाय पर्याय नाही कारण टीकेत सामान संधी नाकारली गेल्याचे तथ्य शिल्लक राहाते

२) केवळ धार्मीक अभ्यासाच्या संधी नाकारल्या गेल्या नाहीत तर अप्रत्यक्षपणे त्याही पेक्षा महत्वाची असलेली साक्षरतेची संधी आणि तेही बहुसंख्य जनतेस नाकारली गेली , ज्यामुळे शिक्षणाच्या विविध शाखा विस्तार होणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे यास मर्यादा पडल्या

३) चातुर्वर्ण्याने व्यापाराचा विचार केला पण उत्पादकांचा विचार केलाच नाही दुसरी कडे कष्टकऱ्यास फारच तुच्छ लेखले गेले . बरे हा कष्टकरीच बहुसंख्य पायदळाचे क्षत्रियत्वाचेही काम करणार आहे हे लक्षातच घेतले गेले नाही .

४) देश आणि धर्माचे संरक्षण करणाऱ्या क्षत्रियांचाही आदर ठेवला नाही

५) मोक्ष तत्वाला अवास्तव महत्व दिल्याने अंधश्रद्धा बोकाळल्या जाऊन विज्ञानाची मर्यादित क्षेत्रे सोडली तर उत्पादन निगडित विज्ञान विकासावर भर देता आला नाही , ‘अर्थ ‘ या तत्वांकडे ज्यांच्या कडे ज्ञान होते त्यांचेच दुर्लक्ष होत होते .

एकूण देशाचा विचार केला तर परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहू इतपत अर्थ व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था बळकट होण्यात अडचणी आलेल्या आहेत . परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहाता येत नाही तर संस्कृतीच्या सुरक्षेचा प्रश्न दूरच राहातो .

एकूण चातृवर्ण्य हे स्वतः:च्याच देशाची संस्कृती अर्थ आणि संरक्षण व्यवस्था खिळखिळी करणारे तत्वज्ञानात रूपांतरित झाले होते असे म्हणता येते का ? त्यामुळे संस्कृतीत जन्माधारित विषमता पाळणारे अपतत्वज्ञान शिरणे शेखचिल्ली प्रमाणे स्वकीयांचे नुकसान करणारे होते . असो .

विशुमित's picture

18 May 2018 - 9:13 am | विशुमित

प्रतिसाद आवडला.

विशुमित's picture

17 May 2018 - 12:10 pm | विशुमित

संयत प्रतिसाद..!!

माहितगार's picture

17 May 2018 - 10:01 am | माहितगार

मी माझ्या पाल्यांची मराठी भाषेची पुस्तके गेली दहा वर्षे चाळतो आहे -त्यातही अभ्यासपूर्ण सुधारणांची गरज असू शकते, पण केवळ 'ब्र' समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव अभ्यासक्रमावर असण्याचा काळ बर्‍या पैकी मागे पडला असावा - अर्थात हे एक ढोबळ विधान असल्या मुळे चुभूदेघे- सुषमा अंधारे अद्यापही त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणीत गुंतलेल्या असतील तर ते ही समजण्या सारखे असावे.

कपिलमुनी's picture

17 May 2018 - 12:43 pm | कपिलमुनी

अंधारे किंवा तत्सम वक्त्यांचा पोटपाणी द्वेषावर अवलंबून आहे.
त्याचा इतिहास किंवा समाज प्रबोधनाशी काडीमात्र संबंध नाही.

माहितगार's picture

17 May 2018 - 1:55 pm | माहितगार

अ‍ॅ . सुषमा अंधारे भाषणात उल्लेख करत असलेली ; म.गांधी, गोखले, आगरकर यांनी एकत्र बोलवलेली आणि संस्कृत भाषेची भलावण केलेली भाषा निती विषयक नेमकी सभा कोणती असावी ? १९१४ च्या आधी म.गांधी भारतीय राजकारणात फारसे सक्रीय नसावेत आणि आगरकरांचा देहांत १८९५ मध्ये झालेला दिसतोय. (चुभूदेघे)

माहितगार's picture

17 May 2018 - 2:03 pm | माहितगार

त्यांचे पुढचे वाक्य म्हणते म.फुल्यांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही . म. फुल्यांचे निधन १८९० मध्ये झाले म्हणजे अशी काही सभा व्हायची तर १८९० च्या आधी व्हावयास हवी आणि १८९१ च्या आधी त्यांची वकीलीची डिग्री शिकून गांधी भारतात वापस सुद्धा आलेले नव्हते .

इतर कुणाची अशी एखादी सभा झाली असेल पण सहसा पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्यांची नावे जोडण्या पुर्वी तथ्यांसाठी अंधारे मॅडमनी संदर्भ नमूद करावयास हवेत कारण खास करुन स्पर्धापरिक्षांसाठीचे त्या क्लासेस घेतात म्हटल्यावर अधिक नेमकेपणा असावयास हरकत नसावी असे वाटते.

स्पर्धापरिक्षांसाठीचे क्लास.... अवघड आहे... कसे होणार त्या पोरांचे?

विशुमित's picture

17 May 2018 - 3:27 pm | विशुमित

पुण्यात एक बहाद्दराने क्लासच्या बोर्डवर आपल्या नावाखाली FICWAI अशी डिग्री टाकली होती. वाटले टी"चर"(जर) Fellow मेंबर असेल इकवाय, पण परीक्षेच्या वेळेस पोरांच्या वर्गातच त्याचा नंबर आल्यावर कळले ते Fail मेंबर ऑफ ICWAI आहे.
अजून पास होतंय.!
====
चाणक्य वाल्या पोरांचं तरी काय होत असतंय, स्वतःलाच नीट करावा लागतो अभ्यास.

माहितगार's picture

17 May 2018 - 2:26 pm | माहितगार

शिक्षण रोजगाराभिमूख न रहाणे आणि वाढत्या खाजगी करणाबद्दल त्यांच्या शंका रास्त आहेत -पण जिथे पर्याय उपलब्ध आहेत तेथेही लोक रोजगाराभिमूख शिक्षणाचे पर्याय दूर ठेऊन १०+२+३ च्या मागेच धावताना दिसतात त्यास केवळ शासनास कसा दोष देता येईल कदाचित कुठे तरी खापर फोडणे मॅडमसाठी आवश्यक असावे , शिवाय बेरोगारीस वाढत्या लोकसंख्येचे परिणामही आहे आणि इतर सर्व नेत्यांप्रमाणे लोक्संख्येचे परिमाण त्या लक्षात घेताना दिसत नाहीत.

माहितगार's picture

17 May 2018 - 2:34 pm | माहितगार

उद्योग धंद्याचे शिक्षण द्यावे असे सांगणारी १९४८ च्या म . गांधींच्या दिग्दर्शनाचा हवाला देऊन लगेच खापर फोडण्याचे कारण लक्षात येत नाही.

जेडी's picture

17 May 2018 - 2:34 pm | जेडी

+३ किती लोक शिकतात?

मी ही पोष्ट जातीवादावर घसरण्यावर टाकलेली नाही... इतक्या समुदायासमोर चुकीचे सांगु नये ह्यासाठी टाकलेली आहे...

विशुमित's picture

17 May 2018 - 3:39 pm | विशुमित

भारतात सभा, कीर्तने, सत्संग, भाषणं आणि तत्सम कार्यक्रमांवरती बंदी आणायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.
सगळी माहिती डिजिटलाईज होत चालल्या आहेत. तयामुळे लोकांनी कोणत्याही विषयाचे ज्ञान स्वतः अधिकृत शिक्षण संस्थेत जाऊन अभ्यास करून घेतले पाहिजे. मग स्वतःचे मत बनवले पाहिजे.
कोणी काही सांगते आणि बावळे तेच खरे मानून ढोल पिटत बसतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे.

माहितगार's picture

17 May 2018 - 3:53 pm | माहितगार

बंदी पेक्षा पिअर रिव्ह्यू / क्रिटिसिझम सोबत जोडणे आवश्यक करण्याची जरुरी असावी.

तो पर्यंत युट्यूब वरच्या तथ्य अथवा तर्काबद्दलची मतांतरेसुद्धा नीट संशोधन पूर्वक युट्यूबवर उपलब्ध करुन द्यावयास हवी. ईन एनी केस वाचक आणि श्रोत्यांनाही वेगवेगळ्या बाबी जाणवत असतात.

या युट्यूबच्या तिन्ही भागात ( दुव्यांमध्ये) स्टेजवर बसलेल्या श्रीयूत आणि श्रीमती यांची शारिरीक हालचाली (बॉडी लँग्वेज) मध्ये होत गेलेले बदल अभ्यासणे कमी वेळ असल्यास तिसर्‍या भागातील शेवट बघणे रोचक असावे.

जेडी's picture

17 May 2018 - 10:28 pm | जेडी

एक्दम बरोबर

माहितगार's picture

17 May 2018 - 3:59 pm | माहितगार

राष्ट्रगीताचा मुद्दा

या विषयावर अशातच माझी अजोंशी मिपाच्या कोणत्याशा धाग्यावर चर्चा झाली होती . ( दुवा सापडल्यास पहातो) एनी वे राष्ट्रगीतात मराठा हा शब्द महाराष्ट्रीय या अर्थाने आणि द्रविड मध्ये उर्वरीत दक्षिण भारत कव्हर होत असताना विंध्य पर्वत रांगांच्या उल्लेखाची सुषमा आंधारेंना जाणावणारी आवश्यकता नीटशी उमगली नाही.

काश्मिरचा काही भाग पाक व्याप्त असला तरी भारताचा दावा आहे आणि त्यातून सिंधू नदी वहाते तो पर्यंत सिंध शब्द काढण्याचा आग्रह केला पाहीजे का माहित नाही.

माहितगार's picture

17 May 2018 - 5:02 pm | माहितगार

राष्ट्रगीतातील 'जन गण मन अधिनायक' हा उल्लेख ब्रिटीश सम्राटासाठी मूळीच नव्हता असा स्पष्ट उल्लेख स्वतः रविंद्र नाथ टागोरांनी करुन ठेवलेला आहे . खालील परिच्छेद इंग्रजी विकिपीडियावरील जन गण मन लेखास भेट दिली तरी सुषमाजी अंधारेंना दिसला असता शिवाय रविंद्र नाथ टागोरांनी सर ही पदवी इंग्रज सरकारला वापस केल्याचे दिसले असते.

On 10 November 1937 Tagore wrote a letter to Mr Pulin Bihari Sen about the controversy. That letter in Bengali can be found in Tagore's biography Ravindrajivani, volume II page 339 by Prabhatkumar Mukherjee.

"A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Bidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense."

इथे मिपावर अरुण जोशींशी माझी झालेली उपचर्चा फॉर रेकॉर्ड संकलीत स्वरुपात देऊन ठेवतो.

आपल्या राष्ट्रगीतात सिंध असं लिहिलं आहे. आणि ईशान्येतलं मात्र एकही राज्य नाही.

टागोरांना काव्यरचनेत प्रत्येक नाव बसवता आलेच असेल असे नाही , म्हणून भारतातील कोणत्याही भागाचा गौरव कमी होत नाही. या बद्दल सहमत.

जन गण मन ची रचना हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीच्या बरीच आधीची म्हणजे १९११ च्या आसपासची आहे, तर पुर्वाश्रमीच्या एकत्रीत पंजाबातील हिमालयीन टेकड्या वेगळ्या करून त्यांना हिमाचल प्रदेश हे नामकरण १९४८ म्हणजे बर्‍याच वर्षांनतर झालेले . म्हणून राष्ट्रगीतातील हिमाचल हा उल्लेख केवळ हिमाचल प्रदेशाबद्दलचा सिमीत नाही सबंध हिमालया बद्दलचा आहे त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते सरहद सर्वच पर्वतीय प्रदेशांचा उल्लेख / गौरवीकरण त्यात सामावले जात असावे. चुभूदेघे.

मेक्स सेन्स. असंच असावं.
=================
यात आसाम नि दक्षिणेची राज्ये येतील का? तिथे हिमालय दक्षिणेकडे वळला आहे खरा, पण अत्यंत खुजा आहे नि स्थानिकांत 'हिमालयवासी' अशी काहीच भावना नाही.

टागोरांनी अख्खी दक्षिण 'द्राविड' या एका शब्दात घेतली आहे. पण तुम्ही म्हणता तसे बिहार आसाम ह्या राज्यांचे उल्लेख राहून जातात. पण काही गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात.

*पहिले काँग्रेस आणि नंतर भारत देश ' जन गण मन ' हेच गीत मुख्य राष्ट्रगीत म्हणून स्विकारेल ह्याची रविंद्र नाथ टागोरांनाही कल्पना असेल असे नाही. ( ब्रिटीश सम्राटाच्या सन्मानार्थ लिहिले होते का हा वाद टागोरांच्या हयातीतच झाला तो वेगळा विषय) .

* दुसरे केवळ शब्द नव्हे काव्याचा ओघही कविला सांभाळावा लागतो, आणि देशातील प्रत्येक गाव शहरांची प्रांतांची प्रत्येक नदीची नावे त्यात समावेष प्रॅक्टीकल होईल असे नव्हे . ( वंदे मातरम बद्दल टाळण्या जोगे वाद झाले नाहीतर, वंदे मातरमची लोकप्रीयता स्वातंत्र्य सेनानीत अधिक असावी . वंदे मातरमच्या रचनेत प्रत्येक गाव - शहराचे नाव देण्याची आवश्यकता नाही, )

* किमान ब्रिटीशांनी बिहार आणि आसाम बंगाल पासून वेगळे करे पर्यंत ते बंगालचे अल्पकाळतरी भाग राहीले असावेत , (आसाम प्रांत बंगाल पासून १८७४ मध्ये ब्रिटीशांनी वेगळा केला तर बिहार आणि ओरीसा प्रांत तर जन गण मनच्या च्या लेखना नंतर वर्षाभराने म्हणजे १९१२ मध्ये बंगाल पासून वेगळे प्रांत म्हणून ब्रिटीशांनी मान्यता दिली) त्यामुळे मानसिक स्तरावर बंग या शब्दात आसाम आणि बिहार हा भाग टागोरांनी गृहीत धरला असू शकेल ?

* अजून एक म्हणजे आपण आताच्या आसामचा उल्लेख करतो पण आताची उर्वरीत इशान्य भारतिय राज्ये पुर्वी आसामचाच भाग समजली जात होती त्यामुळेही कदाचित हिमाचल या शब्दात आसामचा भाग गृहीत धरला गेला असावा अशी शक्यता ही राहते.

असो

आपण दिलेल्या स्पष्टीकरणाच्या संदर्भाने जेव्हा लिहिलं तेव्हा ते गीत अत्यंत चपलख बसे नि त्याची व्याप्ति हवी तितकी होती असं सिद्ध होतं.
===================
माझा रोख सध्या गात असलेल्या गीताकडे आहे. ते गीत आता योग्य नसलं तरी आपण तशास तसे गातो असं काहीसं मला अभिप्रेत होतं.

हो प्रांतांचे विशीष्स्ट नावा निशी उल्लेख असल्या नंतर काळाच्या ओघात अशी समस्या येणे स्वाभाविकच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हरीयाणा , छत्तिसगढ, झारखंड, गोवा, दिल्ली इत्यादीना राज्यांचा दर्जा मिळाला . शिवाय आंदमान निकोबार, लक्षद्वीप अशा बेटांचा उल्लेखही सध्याच्या गीतातून सुटतो. (समजा हो ना हो आकाश गंगेची वाटणी होऊन काही ग्रह भारताच्या सार्वभौमत्वात आले तर त्यांचे नाव सुटण्या चाही धोका आहे ; ह. घ्या.)

जन गण मन च्या शब्दांमध्ये सुधारणेच्या गरजेची अथवा तशा मागणीची तसेच वस्तुतः वंदेमातरमची लोकप्रीयता राष्ट्र्गीत म्हणून अधिक असल्याची जाणीव नेहरुंनाही असावी. आसामच्या लोकांनी सिन्ध हा शब्दाच्या जागी आसामाचे जुने नाव काम रूप घ्यावे अशी मागणी झाली होती, प.बंगालची स्वतःची मागणी वंदेमातरम हेच राष्ट्रगीत असावे अशी होती, पण उघडपणे केवळ तत्कालीन मध्यप्रांताने जन गण मन साठी कल कळवणे टाळले बाकी (राजकीय) पब्लिक नेहरूंच्या अप्रत्यक्ष दिशादर्शनाच्या बाजूने झुकल. नेहरुंनी राष्ट्रगीताची ट्यून म्हणून जनगण मनची ट्यून अधिक शोभते असे काहीसे कारण तेव्हा दिले देऊन धकवले असे दिसते. ( संदर्भ :Statement by Prime Minister Jawaharlal Nehru in the Constituent Assembly, August 25, 1948