भिक - शशक
गणपती विसर्जनाचा दिवस. डीजेचा दणदणाट आसमंताला भिडलेला. एका मंडळापुढे पोरं तर्राट नाचत होती. एकजण खेळण्यातला हाडाचा सापळा घेऊन नाचत होता. बेभानपणे !
तशा गर्दीत एक लहान मुलगी घुसली. भिक मागायला. सापळावाला तिच्याकडे बघून हसला. त्याने तिला तो सापळा देऊन टाकला. भिक म्हणून . वारे औदार्य!
ती घाबरली ; पण ते एक खेळणंच तर होतं. तो घेऊन ती एका मांडवाच्या मागे गेली. आडोशाला. तिथे तिची आई होती. झोपलेली. तिने आईकडे पाहिलं. मग त्या सापळयाकडे पाहिलं. आणि तिला एकदम हुंदकाच फुटला. तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि तिने तो सापळा एकदम लांब फेकला.
तिची आई म्हणजे हाडाचा एक जिवंत सापळाच तर होती.
प्रतिक्रिया
10 Sep 2025 - 5:56 pm | सौंदाळा
खूप दिवसांनी शशक बोर्डावर आली आणि भिडली
10 Sep 2025 - 6:27 pm | श्वेता व्यास
+१
10 Sep 2025 - 6:32 pm | राजेंद्र मेहेंदळे
कोणासाठी खेळणे तर कोणासाठी नाईलाज किवा अपरिहार्यता
शशक आवडली
14 Sep 2025 - 9:35 pm | बिपीन सुरेश सांगळे
वाचक मंडळी खूप आभारी आहे