हे ठिकाण

याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
13 Jun 2024 - 11:54 am

इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले?

हे ठिकाणसंस्कृतीकलासमाजतंत्रबातमी

कथा

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
19 May 2024 - 10:27 pm

कथा

या विषयावरची चर्चा

आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो असतो . पुढे आपली तीच आवड कथेकडे वळते . पण असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही . तरीही आता तो भारतात चांगलाच रुजलाय . सदर चर्चा ही त्या संदर्भात आहे .

कथा अनेक प्रकारची असू शकते. ती अनेक प्रकारे मांडता येऊ शकते . काही कथा या कायम मनात घर करून राहतात .
मराठी मध्ये चारुतासागर यांची ' नागीण' ही कथा , हिंदी - उसने कहा था , इंग्लिश - द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिट्टी , अशा काही कथांचे संदर्भ नेहमी दिले जातात . आणि अशा अनेक कथा .

हे ठिकाणलेख

जाळं

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
17 May 2024 - 9:44 am

जाळं
----------------------------------------
रात्र झाली होती .मस्त गार वारं सुटलं होतं. दिवसभराची लग्नाची चाललेली धामधूम हळूहळू मंदावत चालली होती.
पण ते लोकांचं . बन्सीकिशनच्या डोक्यातली गडबड मात्र हळूहळू वाढत चालली होती .

गावाकडची मोकळी हवा . तो मित्रांबरोबर कडुनिंबाच्या झाडाखाली बसला होता. बाजेवर हवा खात . पलीकडे पोरंटोरं खेळत होती .
मित्र काहीबाही सांगत होते. वात्रट बोलत होते ,एकमेकांना टाळ्या देत होते.

बन्सीकिशन मात्र अवघडला होता. तो कसंनुसं हसत होता. तो वाट पाहत होता ... सुहागरातीची !

हे ठिकाणलेख

अत्तर

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
12 May 2024 - 10:21 pm

अत्तर
------------------------------------------------
संध्याकाळची वेळ होती . राजू घराबाहेर होता. पोरांशी खेळत .मुलांचा आरडाओरडा चालू होता. खेळ रंगात आला होता.

त्याचे वडील तालुक्याच्या गावाला गेले होते. ते आले. येताना त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यांच्या हातातली बंदाची पिशवी चांगलीच फुगलेली दिसत होती.

राजू तेरा- चौदा वर्षांचा होता . तो स्वतःला मोठा समजू लागला असला , तरी त्याचं पोरपण मध्येच उठून दिसायचं.वडिलांना येताना पाहून त्याने खेळणं सोडलं. तो पळत पळत त्यांच्या मागे आला.

हे ठिकाणलेख