याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
13 Jun 2024 - 11:54 am

इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले? मेदिहा हि गेल्या वर्षी आलेली एक डॉक्युमेंटरी

युरोमेरीकन बायबलदेव सेवी संस्थांनी त्यांना मदतीचा हात देऊ केला नही असे नाही, पण स्वतःचा देव जपुपाहणार्‍या याझिदींना या मदतीच्या हाता मागे त्यांना बायबलचाच देव खरा असल्याचे पटवण्याची संधी मिळवणे हा हेतु होता अगदी २०१५ मधले व्हॉईस ऑफ अमेरीकाचेच वृत्त उपलब्ध आहे. आता याची पुन्हा का आठवण यावी? तर बर्‍याचवर्षांनी आज गुगल न्यूज चाळताना "Pray Yazidis will encounter the God of the Bible through a dream or vision if they have no access to a believer who can tell them about Jesus." या गुगल बातम्यांच्या मथळ्यात आलेल्या दिसल्या. एकुण विवीध धर्मीय मिशनरींच्या सगळ्या जगाला शहाणे करण्याच्या चिकाटीचे कौतुक आणि गंमत दोन्ही वाटते. असो. (शेवटच्या वाक्यात सर्कॅझम अभिप्रेत हे वे सा न ल.)

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.

हे ठिकाणसंस्कृतीकलासमाजतंत्रबातमी

प्रतिक्रिया

उग्रसेन's picture

13 Jun 2024 - 1:12 pm | उग्रसेन

रामकृष्ण परमहंस मुत्युशय्येवर असतांना त्यांची पत्नी शारदा रडू लागली. तेव्हा डोळे उघडून रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' उगी राहा गं, रडतेस का ? मी कुठे जाणारही नाही आणि कुठून आलोही नाही. मी जिथे आहे तिथे राहणार आहे. '' शारदा म्हणाली, तुमचा देह गेल्यावर माझ्या बांगड्यांचे काय ?'' रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' मी मरणारच नाही, तर तू बांगड्या फोडण्याचा प्रश्न येतोच कुठे ? तू सधवा आहेत आणि सधवाच राहशील” त्या जमान्यात बंगालमधे नव-याच्या मृत्युनंतर बांगड्या न फोडणारी अशी एकमेव स्री म्हण शारदा माता. तिच्या दृष्टीने ते अमरच होते.

महमद पैंगबर म्हणतो, ''मरण्यापूर्वी एकदा मरा''. जर्मन तत्त्वज्ञ आंजेलिस सिलोसिअस म्हणतो, मृत्यूपूर्वी तुम्ही मरणाचा अनुभव घेतला नाही तर नष्ट होऊन जाल. बुनात त्सेनसी हा जर्मन तत्त्वज्ञ म्हणतो, ''While living, be a dead one'' एकून मिशनरीच्या आत्म्याच्या गोष्टी सोडा. सर्वच धर्मात जगाला शहाणे करण्याच्या गोष्टी आहेत.

* उत्तरदायित्वास नकार लागू.
* अटी लागू.

शशिकांत ओक's picture

18 Jun 2024 - 9:18 pm | शशिकांत ओक

नेमके काल या धाग्यातील उद्धृत याझिदी लोकांवर अन्याय होतात हे सांगायला बी बी सीवर आयसिसच्या मुख्य बगदादीची बायको बोलताना ती क्लिपमधे दिसली . 'झाले ते चांगले नव्हते.' असे मोघम एका याझिदी मुलीला समोर बसवून ही मुलाखत चालली होती. या शिवाय अनेक अन्य मुलींना गुलाम बनवून कसे वागवले ते सांगत असताना बगदादीची बायको तरी काय करणार असा सूर मुलाखतकार मांडत असेल असे वाटत राहते.
गरीब फिलिस्तीनी मुस्लिमांच्या भल्यासाठी दुवे मागणारे लोक नेटवरून पैशाची मागणी करत असतात...
याझिदी लोकांना कोण वाली आहे?