(बार हो)
प्रेरणा : यारहो ...
दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है ....
ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो
शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो
ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली
पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो
मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी
कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो
ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो
एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ
नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो
कोण तो चु$@ भिकारी पेग अर्धा सांडतो
वाटते होईल ह्याचा आज युनुस वकार हो
माँक कुठला? कोण मल्ल्या? वाद भलते वाढले
पलटला टांगा नि झाले घोडं हि फरार हो
एकट्याने ठोसताना येइ ना आता मजा
अन् कधीही प्यायला संनावृताTM तैयार हो
---------------------------------------------------
पाडली आहे गज़ल कित्येक दिवसांनी पहा
शाल श्रीफळ देउनी ह्यांचा करा 'सत्कार' हो
ख्याक ख्याक ख्याक
तळटीपः
* : ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय असावी बरें ;)?
TM : व्हॉटसअॅपवरील एका कंपुचे नाव
$@ : मात्रा पुर्ण करण्यासाठी जागा भरा
मस्त...
हीच कविता ओरिजनल आहे..
लंबर एक
लंबर एक
लय भारी!
भारी 7 नंबरी
कहर!!
जब्बरदस्तच.
खिक्क!
जबरी हो पंत ! आमच्या सगळ्या
जबरी हो पंत ! आमच्या सगळ्या
खी खी खी
बारकरी
मस्त जमून आलीय कविता ....