(किती काळ तुडवायचे)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
27 May 2022 - 4:40 pm

पेरणा किती काळ झुलवायचे

http://misalpav.com/node/50291

किती काळ तुडवायचे

खरे सांग केव्हा तुझ्या बंद ओठी साथीदारांचे नाव केव्हा उमटायचे
किती घालायचे तुला टायरी अन किती वेळ पाण्यात बुडवायचे

तुला कोठडी लागली आवडायला आम्ही रिमांड कितीदा मागायचे
मळकट घोंगडे पुन्हा पांघरोनी तू मात्र बिनघोर झोपायचे

अरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती दिनभर नाचायचे
कोर्टातही तू अससी मुक्याने माXXXX जजनाही किती काळ झुलवायचे

कोपऱ्यात ढीग तुटक्या वेत छड्यांचा अजून किती काठ्यांना तोडायचे
कितीदा करावे रफू शर्टाला कितीदा पुन्हा तुला हाणताना उसवायचे

खुर्चीवर मी आडवे व्हावे जरासे तोच तु काही खोटे बरळायचे
खोट्या खायच्या तू शपथा गळ्याच्या आणि पुन्हा वेळ येताच पलटायचे

खोट्या आसवांची सवय झाली आम्हाला नाटक दुसरी कडे हे करायचे
नार्को टेस्टलाही फेल तुम्ही करायाचे अन आम्हाला साहेबांनी झोडपायचे

पैजारबुवा

अननसउकळीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडमनमेघकरुणइतिहासइंदुरीकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

27 May 2022 - 5:39 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... हा .... हा .... !
😂

एक नंबर जमलीय !

कर्नलतपस्वी's picture

27 May 2022 - 8:15 pm | कर्नलतपस्वी

मस्तच.

कुमार१'s picture

27 May 2022 - 8:21 pm | कुमार१

छान आहे

कल्पना चांगली पैजारबुवा! थोडे मीटर आणखी सांभाळले तर लज्जत तिप्पट होईल! :-)

पैजारबुवांची कथा अन फोलिसांची व्यथा.
कहर आहे माऊली. =))

चांदणे संदीप's picture

28 May 2022 - 11:16 am | चांदणे संदीप

पैजारबुवा, भारीच!

सं - दी - प

सस्नेह's picture

28 May 2022 - 12:27 pm | सस्नेह

=))

तुषार काळभोर's picture

28 May 2022 - 2:06 pm | तुषार काळभोर

असल्या विषयावरही काव्य स्फुरतं, याला पराकोटीची प्रतिभा हवी :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2022 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राव्हा...!

-दिलीप बिरुटे

चलत मुसाफिर's picture

29 May 2022 - 9:21 pm | चलत मुसाफिर

मूळ प्रेरणाकवींनी 'गुन्हा कबूल' अशि प्रतिक्रिया दिली असेल

अगदी वेगळ्याच विषयावर विडंबन!! छान आहे.
(कोठडीची तुम्हाला एकदम बारकाईने माहिती कशी? काही अनुभव आहे वाटते!)