मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(किती काळ तुडवायचे)

ज्ञानोबाचे पैजार · · जे न देखे रवी...
पेरणा किती काळ झुलवायचे http://misalpav.com/node/50291

किती काळ तुडवायचे

खरे सांग केव्हा तुझ्या बंद ओठी साथीदारांचे नाव केव्हा उमटायचे किती घालायचे तुला टायरी अन किती वेळ पाण्यात बुडवायचे तुला कोठडी लागली आवडायला आम्ही रिमांड कितीदा मागायचे मळकट घोंगडे पुन्हा पांघरोनी तू मात्र बिनघोर झोपायचे अरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती दिनभर नाचायचे कोर्टातही तू अससी मुक्याने माXXXX जजनाही किती काळ झुलवायचे कोपऱ्यात ढीग तुटक्या वेत छड्यांचा अजून किती काठ्यांना तोडायचे कितीदा करावे रफू शर्टाला कितीदा पुन्हा तुला हाणताना उसवायचे खुर्चीवर मी आडवे व्हावे जरासे तोच तु काही खोटे बरळायचे खोट्या खायच्या तू शपथा गळ्याच्या आणि पुन्हा वेळ येताच पलटायचे खोट्या आसवांची सवय झाली आम्हाला नाटक दुसरी कडे हे करायचे नार्को टेस्टलाही फेल तुम्ही करायाचे अन आम्हाला साहेबांनी झोडपायचे पैजारबुवा

वाचन 6010 प्रतिक्रिया 0