एक वाचक कळफलकाबरोबर बघतो आहे मिपा
कसले मिपा ?
स्वत:च्या कक्षेत, जालजंजाळाच्या पार
जिथे हर एक लेखकू बसला आहे क्षुब्ध....
करत असेल का तो ही (कधीकधी)वाचकाचा विचार?
वाचत असेल का तो ही
इतरांचेही आहेर, विरोधाच्या (चष्म्या) पलीकडे?
वाचक त्याच्या वाचनदुनियेतून बाहेर येऊ शकत नाही...
मग तो त्याचे मूक प्रतिसाद पाठवतो,
ते प्रतिसाद डोक्यात (न)घेऊन
लेखक निवांतपणे मख्ख राहतो....
मिपा हरवलेला वाचक
जुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो,
पुन्हा पुन्हा चाचपडत राहतो...
वाचकांचीच पत्रेवाला नाखु
वाचने
4970
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
सुंदर मनोगत ! ;) :)
+१
समयोचित आणि प्रांजळ मनोगत.
+१
अप्रतिम !!
:-)
In reply to अप्रतिम !! by प्रसाद गोडबोले
एकेक खतरनाक कविता वाचतोय ,,
सर्व