एक वाचक कळफलकाबरोबर बघतो आहे मिपा
कसले मिपा ?
स्वत:च्या कक्षेत, जालजंजाळाच्या पार
जिथे हर एक लेखकू बसला आहे क्षुब्ध....
करत असेल का तो ही (कधीकधी)वाचकाचा विचार?
वाचत असेल का तो ही
इतरांचेही आहेर, विरोधाच्या (चष्म्या) पलीकडे?
वाचक त्याच्या वाचनदुनियेतून बाहेर येऊ शकत नाही...
मग तो त्याचे मूक प्रतिसाद पाठवतो,
ते प्रतिसाद डोक्यात (न)घेऊन
लेखक निवांतपणे मख्ख राहतो....
मिपा हरवलेला वाचक
जुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो,
पुन्हा पुन्हा चाचपडत राहतो...
वाचकांचीच पत्रेवाला नाखु
प्रतिक्रिया
7 Apr 2019 - 2:28 pm | यशोधरा
+१
7 Apr 2019 - 2:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर मनोगत ! ;) :)
7 Apr 2019 - 3:44 pm | चौथा कोनाडा
+१ भारी, नाखुसाहेब !
7 Apr 2019 - 6:49 pm | चित्रगुप्त
समयोचित आणि प्रांजळ मनोगत.
.. अगदी असेच .
8 Apr 2019 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार
जबरा
हे व्हर्जनही आवाडले,
पैजारबुवा,
8 Apr 2019 - 1:49 pm | प्रसाद गोडबोले
अप्रतिम !!
बाकी मोदी समर्थक / विरोधक , आस्तिकनास्तिकवाप फेम चनावाला , माजघर कोनाडा , अति आणि सर्वत्र मीचीलाल संप्रदाय इत्यादी आतातायी लोकांनी मिपावरील खेळीमेळीच्या वातावरणाची वाट लावली असे आमचे स्पष्ट मत आहे .
असो.
इत्यलम !
8 Apr 2019 - 5:20 pm | चौथा कोनाडा
अप्बाप रे .... चक्क अम्चं नावं (कोनाडा ?)
10 Apr 2019 - 6:26 pm | खिलजि
एकेक खतरनाक कविता वाचतोय ,, असा बोनस भरपूर काळानंतर आला आहे ... कुणी मनातलं सांगतोय तर कुणी कुणाच्या भावना थेट वाचणाऱ्याच्या काळजात उतरवतोय...मस्तंय मस्तच
24 Apr 2019 - 2:30 pm | नाखु
वाचकांचे आणि अवाचकांचेही आभार