सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी....
कवी संजीव यांची क्षमा मागून
मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ ||
माया माहेराची बोफोर्स दलालीची...
'इकडून' घातली भर पाचशे कोटींची...
गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ ||
येता निवडणूक साडी नेसावी...
आई - भावासाठी मते मागावी...
चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया...
विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ ||