सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी....

Primary tabs

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जे न देखे रवी...
12 Feb 2019 - 11:54 pm

कवी संजीव यांची क्षमा मागून
मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती

सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ ||

माया माहेराची बोफोर्स दलालीची...
'इकडून' घातली भर पाचशे कोटींची...
गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ ||

येता निवडणूक साडी नेसावी...
आई - भावासाठी मते मागावी...
चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया...
विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ ||

- यतिन भट

विडंबन

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

13 Feb 2019 - 12:54 am | रमेश आठवले

आता काळ्या मांजराकडून विरोधी भावगीत अपेक्षित आहे.

डँबिस००७'s picture

13 Feb 2019 - 1:32 am | डँबिस००७

जबरदस्त !! एक नंबर ओरिजीनल !!

Blackcat's picture

13 Feb 2019 - 7:34 am | Blackcat (not verified)

छान

ट्रम्प's picture

13 Feb 2019 - 10:59 am | ट्रम्प

तुमची परवानगी गृहित धरून व्हाट्सएप ला फॉरवर्ड करतो = )

स्पार्टाकस's picture

13 Feb 2019 - 11:00 am | स्पार्टाकस

बिनधास्त!

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Feb 2019 - 1:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

लै म्हणजे लै म्हणजे लैच आवडले
आता पुढचे कोणते गाणे येणार त्याची उत्सुकता लागली आहे
पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2019 - 1:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

यश राज's picture

13 Feb 2019 - 2:07 pm | यश राज

आवडले

किसन शिंदे's picture

13 Feb 2019 - 2:23 pm | किसन शिंदे

वाट लावली मिपाची तरी अजून समाधान होईना. हे दोन्हीकडच्या लोकांसाठी आहे. एकाने चिखल फेकला की, दुसर्‍याने शेणाचा गोळा उडवलाच पाहीजे.

खिलजि's picture

14 Feb 2019 - 11:53 am | खिलजि

बहोत खूब , बहोत खूब

खिलजी खुश हुआ

जबराव जबराव जबराव

हम जब खुश होते हय

जबराव जबराव बोलते हय