गदिमा आणि सुलोचना चव्हाणांची माफी मागून,
मूळ गीत - फड सांभाळ तुर्याला ग आला....
खेळ राजकारणी असा रंगला....
काका लागला काड्या घालायला || धृ ||
मूळ बारामतीचं बेणं....
हळूहळू यानं गिळलं पुणं....
धोका देण्यात अति प्रवीण....
घेतलं कडेवर जनता पार्टीला....
दिला धक्का वसंतदादांला....
बाईने हाकललं याच्या सरकारला....
परतून धरले राजीवच्या पायाला….
काका लागला काड्या घालायला || १ ||
पाळले कलानी आणि ठाकूर....
खाल्ले मुद्रांक तेलगीबरोबर....
पोरगी - पुतण्या आणले वर....
गोवारींवर काठ्या बरसल्या....
करुन विरोध गोर्या बाईला....
काढला पक्ष दुकान चालवायला....
परी सरकारी जोडीने नांदला….
काका लागला काड्या घालायला || २ ||
दिला जीव हो शेतकर्यांनी....
उभे केले लवासा यानी....
पैसे हादडण्याविना काही चैन पडत नाही....
खेळही सोडला नाही लुटायला....
आरक्षणापायी मराठा पेटवला....
ब्रिगेडी पिलावळीचा दादला....
पगडीचाबी खेळ करुन पाहिला....
पुन्हा बांधून बाशिंग गुडघ्याला….
काका लागला काड्या घालायला || ३ ||
- यतिन भट
प्रतिक्रिया
14 Feb 2019 - 11:33 am | ज्ञानोबाचे पैजार
लै भारी
पप्पु झाला, पप्पी झाली,
काका झाला, आता मुतन्या सॉरी पुतन्या होउन जाउदे
पैजारबुवा,
14 Feb 2019 - 11:54 am | खिलजि
बहोत खूब , बहोत खूब
खिलजी खुश हुआ
जबराव जबराव जबराव
हम जब खुश होते हय
जबराव जबराव बोलते हय
14 Feb 2019 - 12:59 pm | खिलजि
स्पार्टाकस साहेब , फुल्ल्टू फट्याक धम्माल आणताय राव .. तो रोहित प्रधान आता आठवेनासा झालाय नाहीतर तुमचं नाव वाचाल कि रोहित प्रधान डोळ्यासमोर उभा राहायचा . पण या सर्व कविताही भारी जमल्यात बरं का .. पुलेशु
14 Feb 2019 - 5:48 pm | Blackcat (not verified)
पक्ष सांभाळ इलेक्शन आल्या
तुझ्या मतदारा लागल काका