हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!
तिसरा: आणि..
फुरफुर: (हताश आवाजात पण कुतूहल मिश्रीत आवाजात): अजूनही काही सांगण्यासारखं आहे तुझ्याकडे? आता एका दमात सगळं सांगून टाक. माझ्या मनाची काहीही ऐकायची तयारी झाली आहे.
तिसरा: मिग२१ ला एका एफ१६ ने मिझाईल मारले. पण ते त्याला लागलेच नाही. मिग२१ ने ते चपळाईने चुकवले. त्यामुळे..
फुरफुर: अरे बोल ना
तिसरा: त्यामुळे ते...
फुरफुर: अरे बोल ना.
तिसरा: त्यामुळे ते भारताच्या हद्दीत जाऊन पडलंय.
फुरफुर: बापरे. ही तर महाभयंकर बातमी आहे.
भारताकडे आपल्याविरुद्ध भरभक्कम पुरावा जमा झालाय.
ते मिझाईल फक्त आणि फक्त एफ१६ वरूनच सोडता येत हे सगळ्यांना माहीत आहे.
आपण भारताविरुद्ध एफ१६ वापरलं हे आता कस नाकारणार आहोत?
अमेरिकेला तोंड कसे देणार आहोत?
काय वाट्टेल ते झाले तरी चालेल भारताच्या भूमीवर एफ१६ चा कोणताही भाग पडला नाही पाहिजे हे वारंवार बजावूनही हे अस घडतच कस?
तिसरा: तीच चौकशी मगाशी करत होतो.
फुरफुर: मग?
तिसरा: सराव कमी पडला.
फुरफुर: काय?
तिसरा: म्हणजे जमिनीवर असलेल्या एफ१६ मधून नेम धरण्याचा सराव खूप झाला होता.
पण चालत्या विमानातून नेम धरायचा सराव कमी पडला.
फुरफुर: ऑ.
तिसरा: विमानाला लागणारे पेट्रोल आपल्याकडे कमी आहे ना. त्यामुळे आपण विमान जमिनीवर असतानाच सराव करायचो. त्यामुळे हालणाऱ्या विमानातून नेम धरताना....
(परत एकदा सक्तीचा सन्नाटा)
फुरफुर: (अचानक आठवल्यासारखे करत): अरे मग ते मिग२१ कस पडलं?
तिसरा: इथेही त्याने आपले ब्रीद राखलं.
पहिला: म्हणजे?
तिसरा: ते आपलं आपणहूनच कोसळलं.
दुसरा: अरेरे. आपल्या हद्दीत आलेले शत्रूचे एकुलते एक विमानही आपण पाडू शकलो नाही.
फुरफुर: इच्छामरणाची सिद्धी काही लोकांना प्राप्त असते. ह्या मूडीने ती विमानांनाही शिकवली की काय?
तो हैवान आहे. त्याला निवडणूकीत पाडलंच पाहिजे.
(परत नेहमीच तेच ते.... सन्नाटा)
दुसरा: सर, आपण सांगितल्याप्रमाणे त्यांना कळवलंय.
फुरफुर: ऑ. सविस्तर सांग. काय कळवलंय? कोणाला कळवलंय? मला आत्ता काहीही आठवेनासं झालंय.
दुसरा: ते वैमानिक ताब्यात घ्यायचे निरोप दिले आहेत.
फुरफुर: बरं बरं. त्याच काय?
दुसरा: पहिला वैमानिक ताब्यात आलाय.
दुसराः (थोडं थांबून ): लोकांनी फारच मारलंय त्याला.
म्हणजे प्रत्येक वेळेस थोडंच मारलंय.
पण लोकांनी थांबून थांबून चढत्या श्रेणीने मारलंय.
फुरफुर: ऑ. तू काय बोलतो आहेस?
दुसरा (कसेबसे शब्द जुळवत): म्हणजे मला अस म्हणायचं आहे की...., लोकांनी त्याला पाच हप्त्यात मारलंय...., व प्रत्येक वेळेस अगोदरच्यापेक्षा जास्त जोरात मारलंय.
फुरफुर: थांबून थांबून ? चढत्या श्रेणीने ? आणि आता हप्ता? काय चाललंय काय?
दुसरा: अहो अस सगळं विचित्र विचित्र पहिल्यांदाच घडतंय ना त्यामुळे मलाही नीट सांगायला त्रास होतोय.
(परत एकदा थोडं थांबून व जरासं खाकरून)
दुसरा: पहिल्या हप्त्यात भारताचा वैमानिक म्हणून त्याला बडवलं
"मी पाकिस्तानी आहे" अस खोटं खोटं बोलतोय अस लोकांना वाटले त्यामुळे दुसऱ्या हप्त्यात आणखीनच जोरात बडवलं
मग लोकांना कळलं की तो खराच आपला वैमानिक आहे. मग त्यांना त्याची सहानुभूती वाटायला लागली. ते त्याला इस्पितळात घेऊन जायला लागले. तेवढ्यात त्यांना कळले की तो एफ१६ चालवत होता.
फुरफुरः?????
दुसरा:मग मात्र लोकांचा संताप अनावर झाला.
१९७४ पासून अणुबॉम्ब बनविण्यासाठी लोकं गवत खाताहेत आणि हा वैमानिक अणुबॉम्ब टाकू शकेल अस कोट्यावधी रुपये किमतीच एफ१६ मातीमोल करतोय म्हणाल्यावर दुसरं काय होणार?
तिसरा हप्ता सुरू झाला. हा दुसऱ्यापेक्षा जोरकस होता.
फुरफुर: आणि चौथा हप्ता कशासाठी? आता काय राहिलंय?
दुसरा: जेव्हा लोकांना कळलं की जुन्यापुराण्या मिग२१ कडून हे पडलं तेव्हातर लोक पेटलीच हो.
फुरफुर: ????
दुसरा: काय झालं सर?
फुरफुर: पाचवा हप्ता कशाचा असावा त्याचा विचार करत होतो पण लक्षात येत नाहीये.
दुसरा: शेवटी कोणीतरी बोललं की, एफ१६ मध्ये दोन वैमानिक असतात.
तर मिग२१ मध्ये एकच भारतीय वैमानिक होता.
असं असून सुद्धा त्या एकट्या वैमानिकाने या दोघांना पाडले.
एक पाकिस्तानी दहा भारतीयांना भारी असतो अस आपण १९४७ सालापासून शिकवत आलोय आणि इथे एकटा वैमानिक दोन वैमानिकांना भारी पडतोय, हे लोकांना अजिबात म्हणजे अजिबातच सहन झाले नाही.
मीही हेच शिकलोय.
मलाही सहन झाले नाही.
मी ही एक चापट मारली.
फुरफुर: कधी ? केव्हा? तू कधी गेला होतास?
दुसरा: इथूनच. मनातल्या मनात मारली.
फुरफुर: (स्वगत): या लोकांनी सहावा हप्ता शोधून काढला असता तर मला वेड लागलं असत.
क्रमशः
प्रतिक्रिया
6 Mar 2019 - 7:04 am | आनन्दा
खि खि
6 Mar 2019 - 8:06 am | चामुंडराय
.
6 Mar 2019 - 10:01 am | शाली
हेऽऽ हेऽऽ