वदनी कवळ.....
वदनी कवळ घेता
फोटो काढा प्लेटचे
सहज हवन होते
अपलोडता स्टेटसे
व्हायरलं न होता नेटवरी
अन्न हे अपूर्णब्रम्ह
खाण्याआधी पोस्टणे
जाणिजे आद्यकर्म
वदनी कवळ घेता
फोटो काढा प्लेटचे
सहज हवन होते
अपलोडता स्टेटसे
व्हायरलं न होता नेटवरी
अन्न हे अपूर्णब्रम्ह
खाण्याआधी पोस्टणे
जाणिजे आद्यकर्म
आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य!
(हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!)
(मनमेघ यांची क्षमा मागून)
स्वामि भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता
आतला मराठी माणूस माझ्या नित्य राहो जागता ।
लिहितो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी
एक ही साधी कसोटी नं आठवो लिहिताक्षणी
दुःख वाचका देउनी सुख नं लाभे लेखका।।
हासता यावे मला पाहून मिपाकरांना सुखी
भावना माझी नसो सहवेदनेला पारखी
या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।।
कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी
काय नाते या मिपाशी? हे असावे चिंतनी
आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।।
प्रेरना-प्रार्थना!
स्वामि धागे घेऊन (का) येतात
एकएक हट्टी जिलबी
जिद्दीने पाडून ठेवतात,
प्रत्येक जिलबीमध्ये
अनेक बिनबुडाचे मुद्दे
मनोरंजन म्हणून ठेवून जातात...
स्वामि धागे घेऊन येतात
अलंकारिक वाक्ये भिरकावून
केवळ डोकेदुखी देऊन
मिपाकरांच्या डोक्यात जातात
ट्रोलबाजी करून
मजा बघत अज्ञाताच्या अंधारात
गुडूप होतात......
(दुसऱ्या दिवशी परत) स्वामि धागे घेऊन येतात....
- हे काव्यपुष्प स्वामिचरणी अर्पण
प्रेरणा
माणसे इंजिनिअर होऊन येतात
एकएक हट्टी सेमिस्टरे
अटीतटीने लढवून ठेवतात,
दोन वर्षांमध्ये
एखादे ईयर डाऊन
विसावा म्हणून ठेवून जातात...
माणसे इंजिनिअर होऊन येतात
ज्ञानबिन भिरकावून
केवळ परीक्षार्थी होऊन
रात्रभर GT मारत बसतात
उजाडताना परत
सिगरेटच्या धूरात
गुडूप होतात......
माणसे इंजिनिअर होऊन येतात...
स्वामी चरणी समर्पित
...
डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला
वाचण्यातील साधेपणा संपू लागला
तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....
तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा
आशयाची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला हेतूच दिसेनासा झाला !
धागा काढल्यावर चर्चा होईलच
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा
उगाचच हसे होताना, होउ द्यावे
मुळातच धागा बदबदा काढू नये
वाचकांना कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर
आशाळभूत नजरेने.
किती बाहेर ?
मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर..
ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे...
समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे,
हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ...
देतील का ते मला सिंहासन मिळवून ???
पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे.
चुस्त, मस्त, व्यस्त ....
चतुर, धाडसी, जबरदस्त ...
नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत.
माणसे मित्र बनून येतात
सदैव गाती मैत्रीचे गोडवे
तोंडात जणू साखर ठेवतात,
काही महिन्यांमध्येच
एक जीवघेणी कळ देऊन
पाठीत वार करून जातात ...
माणसे मित्र बनून येतात
मनातलं बाहेर काढून
केवळ अर्थाचा अनर्थ घेऊन
दिवसभर कानाशी बसतात
आपली लागताना खोलून
मैत्रीच्या अंधारात
पुन्हा गुडूप होतात......
माणसे मित्र बनून येतात...
मूळ प्रेरणा: पाणी
इतक्या बियरचे पेग बनवताना
विचार करायचा भावा,
शरीराला इतके झोके देताना
उसंत घ्यायची भावा....
उसळून पुन्हा फेसाळते बियर
बर्फ द्यायचा भावा...
दोन पाय पुरत नाहीत
बॉडीचा भार पेलताना...
भावा, आता बार बंद करा
अन् पिण्यातून मुक्ती द्या....