प्रेरणा
माणसे इंजिनिअर होऊन येतात
एकएक हट्टी सेमिस्टरे
अटीतटीने लढवून ठेवतात,
दोन वर्षांमध्ये
एखादे ईयर डाऊन
विसावा म्हणून ठेवून जातात...
माणसे इंजिनिअर होऊन येतात
ज्ञानबिन भिरकावून
केवळ परीक्षार्थी होऊन
रात्रभर GT मारत बसतात
उजाडताना परत
सिगरेटच्या धूरात
गुडूप होतात......
माणसे इंजिनिअर होऊन येतात...
प्रतिक्रिया
8 May 2019 - 5:13 pm | चौथा कोनाडा
भारी !
+ १ जमलंय !
8 May 2019 - 11:38 pm | जालिम लोशन
+1
9 May 2019 - 10:16 am | ज्ञानोबाचे पैजार
शिर्षक वाचून मला वाटले.....
माणसे इंजियर होउन येतात
आणि बँकेत नोकरी करतात
अशी कविता असेल...
पैजारबुवा,
9 May 2019 - 6:21 pm | मराठी कथालेखक
'माणसे कविता होऊन येतात' आणि 'Level 2 इंजिनिअर म्हणून जॉब हवाय ' असे दोन धागे एकाखाली एक दिसलेत आणि त्यातूनच हे विडंबन एकदम अचानक सुचले.. :)