विडंबन

प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बिचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
3 Sep 2017 - 8:52 pm

डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप ।
डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । मिपामंडळी ।।१।।

डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें ।
डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।।

मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग ।
जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।।

वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी ।
वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।।

सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे ।
आंजालोकी मिपालोकी उरावे । पिंकरूपें ।।५।।

कवितामुक्तकविडंबनजिलबीफ्री स्टाइल

माजलेल्या बाबाची कहाणी

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जे न देखे रवी...
30 Aug 2017 - 6:32 am

WA वर एक पोस्ट वाचली कि,
संदीप खरे यांना विनंती आहे कि, जेलमधे एकत्र आलेल्या बाबांसाठी "जमलेल्या बाबांची कहाणी" असं एखादं गाणं आहे का?
ती वाचून किडे वळवळले आणि जमलेल्या बाबांऐवजी "माजलेल्या बाबांची" असं विडंबन करण्याची इच्छा झाली. कृपया बदल सुचवा म्हणजे WA वर मित्रांवर शायनिंग मारता येईल.

चाल: "दमलेल्या बाबांची कहाणी"

कविताविडंबनरतीबाच्या कविता

वदनि पेग घेता ....

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
20 Aug 2017 - 3:52 am

सध्याच्या नवप्रथे प्रमाणे .....
© चामुंडराय, मिसळपाव.
(कृपया नशापाणी न करता, वारुणीला साथीला न घेता हे काव्य वाचू नये.
अतिबाल्य आणि अतिसंवेदनशील तसेच हे कंबख्त मैं पीता नही अश्या व्यक्तींनी हे काव्य वाचू नये.
विसू: Drink responsibly, Drive sober)
.
.

वदनि पेग घेता
चव घ्या चखण्याची ।

सहज किक बसते
मिळता पिण्या फुकाची ।

सातत्ये करि मैफिल
दारू हि झिंगब्रह्म ।

सुरापान नोहे
जाणिजे नशाकर्म ॥१॥

पेगवर पेग घेता
नाम घ्या साकियाचे |

पिताना स्मरण ठेवा
आम्हा बांधवांचे |

विडंबनअभंग

(तो मला खूप आवडतो)

रुपी's picture
रुपी in जे न देखे रवी...
12 Aug 2017 - 3:11 am

तो मला आवडतो

जेव्हा लाडिकपणे
अंगाशी झोंबतो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.

जेव्हा किरकोळ लागलं की
बँड-एड लावायला सांगतो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.

मी योगासने करताना
पोटावर येऊन बसतो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.

मी जरासं आवरून बाहेर जाताना
"आई... तू परी दिसतेस" म्हणतो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.

कधी घाईत चटका बसतो
कधी चुकून बोट कापतं,
तेव्हा पळत येऊन बघतो
तेव्हा तो मला खूप आवडतो.

कधी कधी माझ्या रागवण्यावर
रडवेला होऊन जातो,
तेव्हा तो मला खूप आवडतो.

कविताविडंबन

((तो मला आवडत नाही))

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
11 Aug 2017 - 11:34 pm

पेर्णा- निओ यांची कविता "ती मला आवडते"

जेव्हा तो त्याच्या पार्टीनंतर तर्राट होऊन
माझ्या अंगाशी कसाही झोंबतो
तेव्हा तो मला आवडत नाही

जेव्हा किरकोळ वादातून तो मला
हिंसकपणे Get out you bitch म्हणतो
तेव्हा तो मला आवडत नाही

माझ्या खरं बोलण्यावर, समजावल्यावर
मलाच लाथाबुक्क्याचा प्रसाद मिळतो
तेव्हा तो मला आवडत नाही

मी एकटीच आवरून बाहेर जाताना
तो एकटक संशयानं बघतो
तेव्हा तो मला आवडत नाही

कवितामुक्तकविडंबनअनर्थशास्त्रअभय-काव्यअभय-लेखनआता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताकरुण

भाग मिल्खा भाग!!

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
7 Aug 2017 - 8:19 am

टेक-१,
वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग "द फ्लाईंग सिख" एखादया बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, रेस ट्रॅकवर त्याला फाळणीच्या वेळी दिसणारी पळापळ दिसते. 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. मिल्खा नुसता हरत नाही तर मनाने देखील खचतो. संपूर्ण देशामधे मिल्खाच्या हरण्याची चर्चा होते.

प्रकटनविडंबनविनोद

जेथे जातो तेथे....

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
4 Aug 2017 - 7:37 am

जेथे जातो तेथे तो माझा सांगाती
चालतो तयाला हाती धरुनिया

गेलो कोठेही तरी देतो आधार
दाखवितो मार्ग सदैव मजला

सगळे ते नम्बरं ठेवी ध्यानी नीट
कनेक्टेड रात्रंदिन केलो देवा

तयासी मी सदा खेळतो कौतूके
नेट वरी सुखे संचार अंतर्बाही

बॅटरी होता डाऊन जीव कासावीस
धाव घेतो सत्वर चार्जर कडे

इंग्रजी, मराठी टाईपतो वेगे
त्यानेची अंगठे बहाद्दर केलो देवा

जगात नेटवर्क्स विविध अनेक
ड्युएल सिमकार्ड वापरी प्रसंगी

बॅलन्स तो संपतो असा भरभर
रि-फिलचे बळ अंगी देई देवा

विडंबनमुक्त कविता

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
25 Jul 2017 - 1:35 pm

प्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे...

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

नम्मूचे विमान किती भारी... भारी
फिरतंय तेही दुनिया सारी... सारी
दुनियेचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

नम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा
आरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा
गोट्याचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

नृत्यनाट्यसंगीतबालगीतविडंबनडाळीचे पदार्थडावी बाजूदेशांतरअर्थकारणgholआता मला वाटते भिती

आला पावसाळा आला पावसाळा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
14 Jul 2017 - 12:47 am

(आदरणीय कवी कुसूमाग्रजांची क्षमा मागून)

|| आला पावसाळा आला पावसाळा ||

आला पावसाळा आला पावसाळा
प्रवाशांनो तुमची कंबर सांभाळा

मनपाचे रस्ते खड्डेरी
दुचाकी तयामध्ये घातली
चुकवित चालली पाणी गाळा

समोरून पहा कोण येतसे
त्याचीही अवस्था तशीच असे
उडविल पाणी; त्याला तुम्ही टाळा

चारचाकीवालाही सुरक्षित नसे
खड्डयात आदळता शिव्या देत असे
न जाणो मोठी खोक ये कपाळा

जनांच्या स्मृती गौरवे वंदुनी
पुढिल ऋतूची वाट पाहूनी
आरोग्यासी वित्त आपले जाळा

- पाषाणभेद

कविताविडंबनसमाजजीवनमानकाहीच्या काही कविता

ही कविता फॉरवर्ड करा

vcdatrange's picture
vcdatrange in जे न देखे रवी...
12 Jul 2017 - 6:53 pm

ही कविता फॉरवर्ड करा

ही कविता फॉरवर्ड करा,
नाही तर पाप येईल
रात्री झोपल्यानंतर,
तुमच्या घरात साप येईल

पाच जणांना फॉरवर्ड करा,
हरवलेली वस्तु सापडेल
नाही केली तर,
भुत तुमच्या कानाखाली झापडेल

दहा जणांना फॉरवर्ड करा,
सोन्याचा हार मिळेल
नाही केली तर,
पाठीवर मार बेसूमार मिळेल

पंचवीस जणांना फॉरवर्ड करा,
स्टॉक मार्केट चढेल,
नाही केली तर
कावळ्याचं शिट डोक्यावर पडेल

पन्नास जणांना फॉरवर्ड करा,
नोकरीत प्रमोशन होईल
नाही केली तर,
सकाळ संध्याकाळ लूज मोशन होईल

कलाकविताविडंबनशब्दक्रीडाविनोदडावी बाजूमौजमजा