राहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी
प्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती
आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे
राजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी
आणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी
रोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी
आले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे
दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना
मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना
नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना
आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे
भूतकाळची तोडून नाती तमाशे केले ज्यांनी
आता उभारती खोटे चित्र मित्रांचे जनीमनी
भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा
हातावरच्या हळदीवर ते ओतून कोमट पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे
प्रतिक्रिया
27 Jul 2020 - 5:28 pm | Gk
पाच वर्षे लोक टरबूज पोहे खात होते
आता शेजवान ट्रिपल पोहे मस्त लागत आहेत
27 Jul 2020 - 6:17 pm | mrcoolguynice
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,
क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट,
देह करी जे जे काही आत्मा नंतर होतो नष्ट,
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
.
27 Jul 2020 - 8:18 pm | सुखीमाणूस
चुर्चुरित कविता...
मज्जा येते आहे सध्याचा डोम्बार्याचा खेळ बघायला...
२ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती
27 Jul 2020 - 9:45 pm | यश राज
सद्यस्थितीवर कविता मस्त जमलीये.
खरंय.. पुढचे काही दिवस मनोरंजनाची हमखास गॅरंटी
बाकी मुलाखतीत तो स्टीअरींग चा उल्लेख करणे आणि आज नेमके उपमुख्यमंत्र्यांनी खालील ट्वीट करणे, सगळेच भन्नाट.
https://www.esakal.com/mumbai/dcm-ajit-pawar-wishes-cm-uddhav-thackeray-...
29 Jul 2020 - 9:02 am | ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा,
29 Jul 2020 - 11:38 am | मन्या ऽ
मस्त खुसखुशीत विडंबन!
दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना
मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना
नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना
आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे>>>>>>:-D :-D