दाराआडचा बाबा

सोन्या बागलाणकर's picture
सोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...
5 Apr 2019 - 8:02 am

मूळ प्रेरणा (अर्थातच): दाराआडची मुलगी

एक बाबा दाराआडून बघतो आहे बाहेर
किती बाहेर?
स्वत:च्या बाहेर, लग्न मंडपाच्या पार
जिथे एक मुलगी बसली आहे नटून....
करत असेल का ती ही ताटातुटीचा विचार?
जाईल का ती ही
मुलाचा हात धरून , उंबऱ्याच्या पलीकडे?
बाबा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
उभा राहतो डोळ्यातली आसवे लपवत,
याची जाणीव नसलेली मुलगी
आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते....
मुलगी हरवलेला बाबा
गळ्यातला आवंढा आवळत बघत राहतो...
बघतच राहतो....

फ्री स्टाइलभावकवितामुक्त कविताविडम्बनकरुणविडंबन

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Apr 2019 - 9:41 am | ज्ञानोबाचे पैजार

वरील कविता वाचताना आपल्या लाडक्या खरवड कविंच्या खालील ओळी आठवल्या

सासुराला जाता जाता,ओला कार मधे
बाबाचा स्टेटस बघशील का फेसबुका मधे,

पैजारबुवा,

सोन्या बागलाणकर's picture

5 Apr 2019 - 9:43 am | सोन्या बागलाणकर

हाहाहा!
हा तर लईच भारी अँगल आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2019 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

पोरगी एक नेट्सॅव्वी तर बाबा दहा नेटसॅव्वी ! =)) =)) =))

दुर्गविहारी's picture

5 Apr 2019 - 10:13 am | दुर्गविहारी

छान लिहिले आहे.

सोन्या बागलाणकर's picture

5 Apr 2019 - 10:59 am | सोन्या बागलाणकर

धन्यवाद, दुर्गविहारी साहेब!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2019 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !