वरिज्नल प्रेर्ना क्र. १ https://www.misalpav.com/node/44410
प्रेर्ना क्र. २ https://www.misalpav.com/node/44413
प्रेर्ना क्र. ३ https://www.misalpav.com/node/44417
तू ट्रोल माझा
गुप्त, मास्क्ड, चोम्बडा
पिंक टाकण्या मज मागे उडणारा
उठवळ टोळ तू ....
करुनि ब्लॉक तुजला
असुरी आनंद मनी भरावा
दुर्लक्ष करावे मी एव्हढे
की नामशेष व्हावी टोळधाड तुझी....
प्रतिक्रिया
19 Apr 2019 - 7:27 am | चामुंडराय
वरच्या लिंका प्रेर्ना १, २ आणि ३ नावामध्ये एम्बेड करायच्या होत्या.
खूप प्रयत्न केले परंतु त्ये काय जल्ला जमला नाय. कोण डिक्रा सांगेन काय ?
19 Apr 2019 - 10:12 am | डॉ सुहास म्हात्रे
एडिट बॉक्सवरचे डावीकडून दुसरे बटण (Insert/Edit Link) वापरून तुम्हाला खालीलप्रमाणे परिणाम मिळेल...
वरिज्नल प्रेर्ना क्र. १
प्रेर्ना क्र. २
प्रेर्ना क्र. ३
20 Apr 2019 - 12:48 am | चामुंडराय
वरिज्नल प्रेर्ना क्र. १
प्रेर्ना क्र. २
प्रेर्ना क्र. ३
अरे व्वा, जम्या !!
तेथे मात्र दोन फिल्ड्स होते १. लिंक टेक्स्ट आणि २. लिंक टायटल. सुरवातीला गोंधळलो टेक्स्ट कि टायटल ? म्हणून दोन्ही टाकून पहिले तेव्हा कळले, टायटल मध्ये टाकले तर लिंक डायरेक्ट "विषय" मध्ये जाते. आणि लिंक पहिल्या ओळीवर ठेवली आणि "विषय" रिकामा ठेवला तरी देखील लिंक "विषय" मध्ये जाते.
दररोज काहींना काही नवीन शिकायला मिळते.
धन्स म्हात्रे साहेब.
19 Apr 2019 - 12:36 pm | खिलजि
छान झालंय इडंबन .. आवडलं
26 Apr 2019 - 8:26 am | नाखु
यातून तरी ट्रोलांनी बोध घ्यावा!!
नव्या संस्थळाचा शोध घ्यावा!!!
नाखुदास पाठवले
(आठवले तसे पाठवले या आरोळी संग्रहातून साभार)