करोणागीत..

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
3 Apr 2020 - 6:45 pm

दहा दिशांनी, दहा मुखांनी. आता फोडिला टाहो,
आसवांत या भिजलेली कथा, श्रोते एका हो.....
सगळ्यांच्या आयुष्याची पार वाट लागली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

गंगेवानी गढुळला होता, असा एक देश
सुखी समाधानी नाही कोणी, करायचे द्वेष
विचित्र उद्योगांनी त्याची कीर्ती वाढली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

अशा देशाचा होता एक प्रधान पंत
कुणी शेठ म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्यांनी नवनवीन घोषणांची सवय लावली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

कोट्यवधी भारतीयांची चलबिचल झाली
आवाहनापायी घरातच थाळी आरती केली
विरोधक आणि भक्तांचीही सुडानेच पेटली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

पिसळलेल्या तब्लिगांनीही थयथयाट केला
बाहेर उंडारण्यासाठी सारा देश येडा झाला
त्यांनी लाज भीड नीती सारी सोडली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

जाब विचारया पोलिस गेले ,घातला कोणी घाव
दगडफेकीत डाॕक्टरच जखमी, कुणाचे घेऊ नाव
सगळ्या अर्थव्यवस्थेचीही तिरडी बांधली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

घरातल्या जीवा कळला नाही,बाहेरचा हा खेळ
भाजी आणू म्हणती कोणी कोण शोधे भेळ
दारू सिगरेटीपायी कुत्र्याची दशा आणली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

सगळ्यांची फसगत झाली तिचा हा तमाशा
विरुनिया गेली आता जगायची आशा
आता लाॕकडाऊननं वेडेपणाची वेळ आणली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

याची देही याची डोळा पाहतो इतर देशांचे मरण
चिन्यांनीच आणली वेळ, खाऊनी वटवाघळाचे मटण
भारताच्या नुकसानाची कशी नेमकी वेळ साधली
कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

आता मला वाटते भितीविडंबन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Apr 2020 - 9:16 pm | प्रचेतस

जबरी लिहिलीय मापं.

धर्मराजमुटके's picture

4 Apr 2020 - 8:40 pm | धर्मराजमुटके

तुम्हालाही एक 'छान' प्रतिसाद देऊन ठेवतो !
उगाच घाटपांडेजीका कोरोनागीत मेरे कोरोणागीत से बेहतर कैसा ? ऐसा प्रश्न मण मे णही आणा चाहिये इसलिए !