✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(श्रीगणेश लेखमाला २०२३ - आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता)

क — कर्नलतपस्वी, Wed, 09/27/2023 - 09:29
https://www.misalpav.com/node/51686पेर्णा पैजारबुवां.... माफी,माफी,माफी..... मुलगा शिकला विकास झाला आला लग्नाला... मुलगी शोधा विनवू लागला बाजीराव नानाला... काय अपेक्षा, कशी पाहीजे विचारले नानाने.... चाटगपटला विचारून सांगतो म्हंटले, (अर्ध्या) शहाण्याने.... आखूड शिंगी,बहुदूधी, पण काळी सावळी........ नाना विचारता झाला मॅच होत नाही रे भौ,ही तर जाफ्राबादी चाटगपट म्हणाला..... मुलगी शिकली प्रगती झाली आली लग्नाला... मुलगा शोधा विनवू लागली बाजीराव नानाला... काय अपेक्षा, कसा पाहीजे विचारले नानाने.... चाटगपटला विचारून सांगते कृ (मारी)....प्रज्ञाने. जाडा भरडा,अमीर गरीब कसाही असावा फक्त एव्हढे बघा की तो, आय टी वाला नसावा पाच आकडी पगार त्याला रोज घरीच असतो प्रश्न पडला,का असे म्हणून नाना विचारता झाला... काय सांगू नाना तुम्हांला... तर्‍हाच याची न्यारी हनिमूनला काय करावे ते ही............ चाटगपटला विचारते स्वारी (तंत्रज्ञान मागासवर्गीय कॅटेगरीतला अनारक्षित. )

प्रतिक्रिया द्या
3162 वाचन

💬 प्रतिसाद (5)

भारी आहे

मुक्त विहारि
Wed, 09/27/2023 - 09:45 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments

Wah..

MipaPremiYogesh
Wed, 09/27/2023 - 09:47 नवीन
वाह..मस्तच आहे...विडंबन...
  • Log in or register to post comments

जबराट

सौंदाळा
Wed, 09/27/2023 - 10:18 नवीन
जबराट
  • Log in or register to post comments

आवडली.

चौथा कोनाडा
Wed, 09/27/2023 - 17:43 नवीन
आवडली. रसग्रहण चाटगपट ला विचारून लिहितो.
  • Log in or register to post comments

भारी आहे. कविता वाचून चाट पण

भागो
गुरुवार, 09/28/2023 - 12:12 नवीन
भारी आहे. कविता वाचून चाट पण चाट पडला असणार!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा