हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.
एक ढू आय डी द्या मज आणून
शिंपीन तो मी स्व प्रतिसादाने
खोडून काढीन सारी वचने
सार्या धाग्यांची वाट मी लावीन
टिका टिप्पणी,चाले चौफेर लेखणी
बृहस्पती,वाचस्पती,बाजीसम या रणी
सारे ज्ञात मज,स्व प्रज्ञेचा मी धणी
भल्या भल्यांची वाट लावतो, क्षणोक्षणी
सभ्यासभ्य समासम, मर्यादा मीच रेखतो
मी टंकतो तोच पुरावा,मीच खरे बोलतो
अल्पमती सारे तुम्ही,मज मानावे हेच बरे
अन्यथा,धाग्याचे मग काश्मिर होणार खरें
भय नसे मम कुणाचे, मी चिरंजीव, मी बाहुबली,
वारंवार अवतरेन मी,वारंवार मिटवाल जरी
मी पुन्हा येईन....
मी पुन्हा येईन....
मी पुन्हा येईन....
प्रतिक्रिया
17 May 2025 - 6:12 am | अमरेंद्र बाहुबली
हाहाहा! मस्त!
17 May 2025 - 7:51 am | Bhakti
लईच भारी!!
19 May 2025 - 1:38 am | nutanm
वा वा , बहोत खूब लगते हो, लेकिन वास्तवमे नही हो !!