(शीर्षक सुचले नाही )

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
3 Nov 2016 - 4:24 pm

माझ्या फाटक्या दारिद्र्याला
ठिगळ लावीत होतो,
ज्यांनी मज बहिष्क्रीत केले,
त्यांची थोरवी गाजवत होतो !!

त्यांनी माझ्या प्रेमाची
बहुत लावली बोली,
मी निस्सीम जगाचा प्रियकर,
फुकटच वाटत होतो !!

इथे प्रत्येकेचा हेतू,
प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे,
पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये,
तो रंग सोडवत सोडवीत होतो !!

किती देऊ परीक्षा खरा असण्याची,
दर वेळी पराभूत होतो,
मी या अजब दुनियेचा विद्यार्थी,
कधी ना मोठा होतो !!

बिभत्सकरुणसमाज

प्रतिक्रिया

पराभूत - हे शीर्षक चालेल का ते बघा.

कवि मानव's picture

3 Nov 2016 - 4:43 pm | कवि मानव

धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत..
एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

कवि मानव's picture

3 Nov 2016 - 4:43 pm | कवि मानव

धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत..
एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2016 - 4:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. लिहित राहा. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

कवि मानव's picture

3 Nov 2016 - 4:41 pm | कवि मानव

धन्यवाद ...प्रयत्न नक्कीच राहील!!

पाटीलभाऊ's picture

3 Nov 2016 - 4:39 pm | पाटीलभाऊ

अजून येऊ द्या.

एस's picture

3 Nov 2016 - 4:48 pm | एस

छान आहे.

कवि मानव's picture

3 Nov 2016 - 5:03 pm | कवि मानव

धन्यवाद !!

चांदणे संदीप's picture

3 Nov 2016 - 5:38 pm | चांदणे संदीप

अपयश लख्ख सोनेरी
पडद्याआड लपले नाही
उतवरवता ते कागदावर
मज, शीर्षक सुचले नाही!

आणि....

त्यांच्याच पटावर
सरळ माझी चाल
आदेशाबरहुकूम
राजास दिली ढाल
तरीही कळेना कारण
हरण्याचे आता!

या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :)
धन्यवाद!

पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल!

पुलेशु!

Sandy

कवि मानव's picture

3 Nov 2016 - 6:28 pm | कवि मानव

धन्यवाद...Sandy
आणि खरंच खूप छान ओळी लिहिल्या आहेस तू (औपचारिकता ना ठेवता)

आणि ही कविता वाचून तुला काही तरी सुचला याचा आनंद आहे !!

चांदणे संदीप's picture

3 Nov 2016 - 5:38 pm | चांदणे संदीप

अपयश लख्ख सोनेरी
पडद्याआड लपले नाही
उतवरवता ते कागदावर
मज, शीर्षक सुचले नाही!

आणि....

त्यांच्याच पटावर
सरळ माझी चाल
आदेशाबरहुकूम
राजास दिली ढाल
तरीही कळेना कारण
हरण्याचे आता!

या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :)
धन्यवाद!

पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल!

पुलेशु!

Sandy

Bhagyashri satish vasane's picture

3 Nov 2016 - 9:02 pm | Bhagyashri sati...

व्वा मस्त आहे कविता :)