(सहज..)
आत्मुदांची मापी मागून :)
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29887
------------------------------------------------------------------------
कोळ्यांनी विणले जाळे
वाळवीने करामत केली.
मी कचरा केला नाही
अन्,तरीही अडगळ झाली.
आत्मुदांची मापी मागून :)
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29887
------------------------------------------------------------------------
कोळ्यांनी विणले जाळे
वाळवीने करामत केली.
मी कचरा केला नाही
अन्,तरीही अडगळ झाली.
त्या लीलाधराची मापी मागून :)
पेर्णा - http://www.misalpav.com/node/19709
-------------------------------------------------------------------------
तो.....
तो आहे नाना, तो आहे स्टिंकर,
तो ना"ही" तैश अन् तो नाही माइ,
पण तरीही त्याची मिपावर असते मात्र जिल्बी..... :D
अशी हि तुम्हा आम्हा सर्वांना पिडणारी
भंगार डबा बाटली..............
आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29862
मूळ कवीची क्षमा मागून
--------------------------------------------------------
कसं जमतं तुला, डुआयडी काढणं?
किती सहज, हे तुझ असं वावरणं?
प्रतिसाद द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीतरी लेखांवर प्रतिसादांच्या जिल्ब्या पाडणं
(संपादकांच्या) गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय तुला?
लिहिताना तटस्थ प्रतिसाद कंटाळला जीव आमचा
(तरीही) तुच थट्टेचा, सगळ्यांसाठी विषय ठरला?
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29834
वर्जीनल कवीची मापी मागून :)
------------------------------------------------------------------------
ये जरा "बसायला", घे बाटलीतले तीर्थ इथे
गाठी शेवया मागाया, काय सांग जाते तुझे ll १ ll
अट्टल पिणारे लाजतील, येता (बाटली) तुझ्या हातावरी
अंगावरल्या समस्त वस्त्रांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll
या शर्ट-प्यांटवरील, पुसती जरी साऱ्या खुणा
ती अशी खमकी असता, गालावरचा रंग सजे ll ३ ll
आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;)
आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809
-------------------------------------------------------------------------------
जगने न तुज्य(कृपे)विना ,
का रडवतो तू मला,
गेला कोंडून तू मजला,
जणू श्वास माझा गेला,
सोडा नसला तरी चालेल ,
पण संध्याकाळी एक चपटी असावी !
एकही चुनाडबी नसली तर चालेल ,
पण खिशात एक तंबाखूची पुडी असावी !
लॉलीपॉप- तंदूरीची सर कोणालाच नाही ,
पण चखण्यात एक चकली तरी असावी !
हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली ,
पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी !
क्रेट संपवायला गँग आहेच ,
पण शेवटी मारायला एक चिल्ड असावीच !
पाण्याशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण किक बसायला एक ऑन द रॉक असावी'च्च' !!!
-पिणार
____________________________________________
पहिले ठिगळ मि.का. च्या कवितेला.
वरिगिनल कविता <a href="http://www.misalpav.com/node/17298" title="प्रलय">प्रलय</a>
शंख करत माझ्या नावाचा
बाप धावतो मागे मागे
गुणपत्रक ते बघता बघता
नेत्र तिसरा उघडु लागे
अकडा मोठा बॅकलॉगचा
तरी भटकतो मित्रांसंगे
लेक्चर बुडवुन कट्ट्या वरती
रात्रं दिन करीतसे दंगे
निर्लज्ज हात पुढे पसरतो
पॉकेटमनी संपताच तो
छळायस जन्मला कारटा
हताश बाबा करवदतो
मग
आज भेटायचे ठरले होतेना आपले किनार्यावर ? :(
कितीतरीच उशिर केलास :-/
कितीवेळ एकटीच उभी होते
.
तुझी वाट बघता बघता वरच्या आळीतला नाम्याच आला :(
एकटीला बघुन चल थोडं ओल्यागार रेतीत चालु म्हणाला :P
इतक्यात तुला... दुरुन येताना बघितलं
.
मनाशिच म्हटलं
यु आर लेट.. यु फुल ! :-/
.
पुन्हा शोधावी का तिला ?
किती सहज उकरायची गाडलेले कबुलीजबाब
फुल्या शिवलेले डोळे
फुल्या शिवलेले ओठ
कधी हसत कधी रडत
विचारायची नुसत्या खुणांनी
'कशी दिसते ह्या नवीन टाक्यांत?'
लांबसडक बोटे, न्याहाळायची ती
कधी शापा सारखी कधी श्वापदा सारखी
बिलगायची अशी की नक्षत्र भारले आभाळ व्हायचे शरीर
आणि कधी हिंस्रतेने करायची शिकार
धारदार, रासवटतेने झालेला छिन्नविछिन्न देह
शिवत बसायची तासंतास
तिने पाळलेली बेवारशी विरह-गाणी
पाहायचो घुटमळताना तिच्या आसपास...