सोडा नसला तरी चालेल ,
पण संध्याकाळी एक चपटी असावी !
एकही चुनाडबी नसली तर चालेल ,
पण खिशात एक तंबाखूची पुडी असावी !
लॉलीपॉप- तंदूरीची सर कोणालाच नाही ,
पण चखण्यात एक चकली तरी असावी !
हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली ,
पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी !
क्रेट संपवायला गँग आहेच ,
पण शेवटी मारायला एक चिल्ड असावीच !
पाण्याशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण किक बसायला एक ऑन द रॉक असावी'च्च' !!!
-पिणार
____________________________________________
प्रतिक्रिया
3 Apr 2014 - 2:18 pm | आदूबाळ
मी खरं तर "अश्लील अश्लील!!" असं लिहायला (पयला) आलो होतो...
3 Apr 2014 - 2:33 pm | प्रसाद गोडबोले
=))
(संपादित होणार हे माहीत असल्याने सविस्तर प्रतिसाद देणे टाळत आहे ;) )
3 Apr 2014 - 2:42 pm | आत्मशून्य
.
3 Apr 2014 - 2:44 pm | सूड
एका आध्यात्मिक अभ्यासकाचे अधःपतन असा लेख पाडावा का विचार करतोय. ;)
3 Apr 2014 - 2:58 pm | प्यारे१
मोठे व्हा!
3 Apr 2014 - 3:47 pm | llपुण्याचे पेशवेll
मोडकांच्या आठवणीने सेंटी झालो. मोठे व्हा हा मोडकांचा परवलीचा शब्द.
3 Apr 2014 - 3:53 pm | बॅटमॅन
पहिले अध:पतन??? =))
3 Apr 2014 - 4:08 pm | सूड
>>पहिले अध:पतन
बोल्लो असतो, जाऊ दे. प्रतिसादाला पंख लागायचे. ;)
3 Apr 2014 - 4:13 pm | प्यारे१
रॉक बॉटम गाठल्यानं अधःपात होण्याचा 'स्कोप' शिल्लक नाहीये.
धन्यवाद.
3 Apr 2014 - 3:03 pm | धन्या
तिकडे तुमच्यासाठी विमान पाठवावे का यावर चर्चा चालू असताना तुम्हाला अशी अवदसा का बरे सुचली असावी? ;)
3 Apr 2014 - 3:06 pm | प्यारे१
धन्याला घेतल्याशिवाय जायचं नाही असं ठरवून व्हिसा एक्स्टेन्शन मागवलंय. ;)
3 Apr 2014 - 3:08 pm | धन्या
तुमच्या आत्मविश्वासाला दाद दयायला हवी.
3 Apr 2014 - 3:41 pm | प्रमोद देर्देकर
तुम्ही शेवटचे "येणार " असं लिहलंय ते आमंत्रण समजुन आमच्याही चार ओळी.
एकच काय दोन असु दे | आम्ही येणार याची खात्री असावी |
वारुणीशी संगत आमची, आम्ही मेल्या वरच सुटावी.|
3 Apr 2014 - 3:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
प्यार्या... तु ना... माठ आहेस.... असो.
3 Apr 2014 - 4:34 pm | स्पंदना
छान प्रयत्न.
हे अगदी पटले:
हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली ,
पण हे नाही कळले:
पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी !
पु.ले.शु.
3 Apr 2014 - 4:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
=))
3 Apr 2014 - 4:35 pm | स्पंदना
एक विचारू?
आता कस होणार?
3 Apr 2014 - 4:37 pm | प्यारे१
टेन्शन इल्ले.
काय होईल कसं होईल? -जसं व्हायचं तसं होईल!
3 Apr 2014 - 5:35 pm | यसवायजी
हे कायाय?? :D
3 Apr 2014 - 5:49 pm | भावना कल्लोळ
उदयोन्मुख कवीना नामोहरम करण्याचे कुटील डाव आहेत हे …. जे विडंबन रूपाने सादर केले आहे. अश्या वागणुकीमुळेच चिनार आणि जीवनभौ सारख्या लेखकांना मिपा हरवून बसणार आहे.
6 May 2017 - 8:04 am | एकुलता एक डॉन
खरंय