राजकारण

मोदी २०१९ - निर्विवाद! बर्‍याच अंशी अपेक्षित!

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
24 May 2019 - 2:20 pm

जवळपास दीड महिन्यापासून मी मोदी लाट अजूनही आहे हे सांगत होतो. २९-एप्रिल-२०१९ रोजी मी या वेबसाईटच्या एका धाग्यावर सांगीतले होते की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आणि एनडीएला बहुमत मिळणार. मी बर्याच लोकांशी बोललो होतो - रिक्शा ड्रायव्हर, कॅब ड्रायव्हर, सामान्य माणसं, मध्यमवर्गीय, सुशिक्षित, निम्नमध्यमवर्गीय, आणि बरेच. स्वच्छपणे लोकांची पसंती मोदींना दिसत होती. मला आपल्या राजकीय निरीक्षकांचे आश्चर्य वाटते. बहुधा त्यांनी लोकांच्या मनाचा कानोसा घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. बेरोजगारी हा मुद्दा कधीच नव्हता. या मुद्द्यावरून कुठलेच सरकार यशस्वी किंवा अपयशी ठरत नाही.

राजकारणविचार

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in जनातलं, मनातलं
19 May 2019 - 8:03 pm

श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.

धर्मइतिहाससाहित्यिकराजकारणप्रकटनविचारप्रतिसादलेखमत

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
29 Apr 2019 - 4:20 am

एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर
आशाळभूत नजरेने.
किती बाहेर ?
मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर..
ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे...
समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे,
हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ...
देतील का ते मला सिंहासन मिळवून ???

पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे.
चुस्त, मस्त, व्यस्त ....
चतुर, धाडसी, जबरदस्त ...
नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत.

आता मला वाटते भितीइशाराकालगंगाकाहीच्या काही कविताचाटूगिरीजिलबीबालसाहित्यहट्टकरुणसंस्कृतीइतिहासबालकथाबालगीतविडंबनविनोदसमाजजीवनमानकालवणव्यक्तिचित्रणराजकारणमौजमजा

मोदी[च] का?

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
24 Dec 2018 - 4:06 pm

डिस्क्लेमरः
या विषयावरील अनेक धाग्यांमधे हात धुऊन घेण्याची अजिबात ईच्छा नाही. सहज वाटलं म्हणून लिहिलंय. :-)
=====================

बर्‍याच दिवसांपासून या चर्चा पाहतोय, धागे पाहतोय.. मोठं कौतुक वाटतंय.. मोदींचं!!

लोक किती जागरूक झालेत नाही? माझ्यासारख्या, न्यूज पाहण्याचा / वाचण्याचा जाम कंटाळा असलेल्या माणसाला, मागच्या ४-५ वर्षात किती उत्सुकता असते आता.. पुढे काय याची! नाही, पुर्वी अगदीच नव्हती असं नाही.. पण हे सगळं असंच चालणार.. कुणी काssssही बदल करू शकणार नाही असं अगदी मनावर ठाम बिंबलं होतं!

समाजराजकारणमौजमजाविचार

EVM

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
20 Dec 2018 - 3:42 pm

(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात. तसेच लेखात कसलीही त्रुटी अथवा चूक झाल्यास ती केवळ आणि केवळ लेखकाची कमतरता आहे.)

समाजराजकारणशिक्षणमाहितीसंदर्भ

अच्छे चाचा कच्चे चाचा

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
14 Nov 2018 - 5:53 pm

"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

धोरणमांडणीइतिहासअर्थव्यवहारराजकारणविचारलेखमत

रफाल - भाग ३

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
23 Oct 2018 - 9:14 am
ह्या आधीचे https://www.misalpav.com/node/43446 https://www.misalpav.com/node/43450 भाग ३ - संरक्षण खरेदी प्रक्रियेबद्दल थोडेसे आद्याक्षरांच्या शब्द समूहांची यादी AoN - ऍक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी. ASR - एअर स्टाफ रीक्वायरमेंट्स. CAG - कंपट्रोलर ऑडिटर जनरल. CCS - कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. DAC - डिफेन्स एक्विझीशन कौन्सिल. DCS - डायरेक्ट कमर्शियल सेल्स. DIPP - डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी ऍड प्रोमोशन. DPP - डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर. DPSU - डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकींग. FET - फील्ड / फ्लाईट इव्हॅल्यूएशन ट्रायल्स. FMS - फॉरेन मिलिटरी सेल्स.
समाजराजकारणविचारलेख

रफाल - भाग २

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
17 Oct 2018 - 9:10 am

ह्या आधीचे

रफाल भाग १

भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः

प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का.

समाजराजकारणविचारलेखबातमीअनुभवमतसंदर्भ