छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२०

सुषमा स्वराजांना श्रद्धांजली

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
6 Aug 2019 - 11:29 pm

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजांच्या दुख्खद निधनाची बातमी येते आहे.

सुषमा स्वराजांना श्रद्धांजली

__/\-__

राजकारण

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

6 Aug 2019 - 11:35 pm | स्वाती दिनेश

आजच्या कलम ३७० रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर ही बातमी ही आयरनी !
सुषमा स्वराज ना भावपूर्ण श्रध्दांजली!
स्वाती

जालिम लोशन's picture

6 Aug 2019 - 11:40 pm | जालिम लोशन

ह्या पेक्षा वाईट काही बातमी काही असुच शकत नाही.

सुषमा स्वराज यांना भावपुर्ण श्रध्दाजंली.

राघव's picture

6 Aug 2019 - 11:49 pm | राघव

अरे नाही यार.. हे नाही बरोबर.. जस्ट टू बॅड.. :-(

__/\__

बाप्पू's picture

6 Aug 2019 - 11:52 pm | बाप्पू

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री, सुषमा स्वराज यांचे निधन.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांनी ज्या पद्धतीने देशासाठी काम केले ते खरंच कौतुकास्पद होते. परराष्ट्र मंत्री या नात्याने ज्या आपुलकीने आणि जबाबदारीने त्यांनी भारतातील आणि भारताबाहेरील नागरिकांची काळजी घेतली, ते पाहून खरंच मन भारावून जायचे. आपल्या एका ट्विट ला देखील मिळणारा प्रतिसाद पाहून परदेशातील भारतीयांना आपण भारतीय असल्याचा गर्व व्हायचा. आंतरराष्ट्रीय राजकारणात गरज पडल्यास कणखर आणि सडेतोड भूमिका घेऊन भारताची ताकद जगाला दाखवून दिली.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2019 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे

श्रीमती सुषमा स्वराज या, सर्वसामान्य नागरिकाची मनःपूर्वक दखल घेणार्‍या आणि त्याच्यासाठी कळकळीने काम करणार्‍या (जे परराष्ट्रमंत्र्याचे एक कळीचे कर्तव्य असते), भारताच्या प्रथम परराष्ट्रमंत्री होत्या असे म्हणता येईल.

त्यांचे भारतिय राजकारणातले योगदान नेहमीच लक्षात राहील.

सुषमा स्वराज यांना भावपुर्ण श्रध्दाजंली.

जॉनविक्क's picture

7 Aug 2019 - 12:13 am | जॉनविक्क

श्रीमती सुषमा स्वराज या, सर्वसामान्य नागरिकांची मनःपूर्वक दखल घेणार्‍या आणि त्याच्यासाठी कळकळीने काम करणार्‍या (जे परराष्ट्रमंत्र्याचे एक कळीचे कर्तव्य असते), भारताच्या प्रथम परराष्ट्रमंत्री होत्या असे म्हणता येईल.

एकदम खरंय.

त्यांचे असे जाणे खरोखर क्लेशकारक आहे. :(

नाखु's picture

7 Aug 2019 - 12:22 am | नाखु

आणि तितकेच ऋजू व्यक्तिमत्त्व.भाषेवर प्रभुत्व,विषयाचे संपूर्ण ज्ञान तरीही ठाम मत अगदी सुस्पष्ट आवाजात भाषण.

विरोधकांनी आक्रस्ताळीपणे किंवा आकसापोटी गलिच्छ आरोप केला तर आणि तरच आवाजात थोडा वरचा स्वर.
पण परत भाषण मूळ लयीत.

देवाचे आभार.
कारण सुषमाजी इस्पितळात असताना रागा भेटायला गेले नाहीत.अन्यथा तेथेही पर्रिकरांना दिला तसा मानसिक क्लेष दिला असता,आणि युवराजांच्या बाळलीला काॉंगी बुजूर्ग डोळेझाक करून गप्प बसले असतेच.मिपावर निषेध तर दूरची गोष्ट.

विनम श्रद्धांजली.

पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

जोनाथन हार्कर's picture

7 Aug 2019 - 1:47 pm | जोनाथन हार्कर

विषय काय तुम्ही लिहिताय काय, इथे रागा कुठून घुसडलात?

नाखु's picture

7 Aug 2019 - 5:52 pm | नाखु

महाशय

आपलेच आदरणीय रागा यांनी पर्रिकर यांना आजारपणात इस्पितळात भेट घेतली नवहती काय? त्याचे पुढे भांडवल केले नव्हते काय?
आणि सुषमा स्वराज सुद्धा दीर्घकालीन उपचारांसाठी इस्पितळात दाखल नव्हत्या काय?
आपले चार महिन्यांत मिळालेले (नवीन नावाने) सदस्यत्व फक्त येथेच प्रतिसादाकरीता राखून ठेवले आहे काय?
बाकी डू आय डी मस्त घेतला आहे हो सल्लागार महाशय.

मिपावर मालकाशी ओळख आहे असा बिलकुल टेंभा मिरवण्याची हौस नसलेला सामान्य मिपाकर नाखु

mayu4u's picture

7 Aug 2019 - 10:01 pm | mayu4u

सुषमा जी ना भावपूर्ण श्रद्धांजली!

अभ्या..'s picture

7 Aug 2019 - 8:19 am | अभ्या..

अरेरे फारच वाईट बातमी,
धडाडीच्या आणि प्रचंड सुसंस्कृत राजकारणी. खरेतर राजकारणी म्हणवतच नाही. त्यांच्या ऋजु आणि शालीन व्यक्तिमत्वाने त्या घरातीलच, आपल्या रक्ताच्या नात्यातल्याच कुणीतरी वाटत राहिल्या. चुकून जरी त्यांना भेटायची वेळ आली तर दडपण वाटणार नाही अशाच. भाजपाच्या शिरपेचात असलेल्या मानाच्या तुऱ्याचे स्थान होते त्यांचे. सुशिक्षित, सुसंस्कारित, अस्सल भारतीय महिला राजकारणी कसे असावे याचे उदाहरणच होत्या.
त्यांना , त्यांच्या कर्तुत्वाला आणि सर्व संपन्न आयुष्याला आदरांजली.

वामन देशमुख's picture

7 Aug 2019 - 9:18 am | वामन देशमुख

याहून वेगळे शब्द नाहीत...

अरेरे फारच वाईट बातमी,
धडाडीच्या आणि प्रचंड सुसंस्कृत राजकारणी. खरेतर राजकारणी म्हणवतच नाही. त्यांच्या ऋजु आणि शालीन व्यक्तिमत्वाने त्या घरातीलच, आपल्या रक्ताच्या नात्यातल्याच कुणीतरी वाटत राहिल्या. चुकून जरी त्यांना भेटायची वेळ आली तर दडपण वाटणार नाही अशाच. भाजपाच्या शिरपेचात असलेल्या मानाच्या तुऱ्याचे स्थान होते त्यांचे. सुशिक्षित, सुसंस्कारित, अस्सल भारतीय महिला राजकारणी कसे असावे याचे उदाहरणच होत्या.
त्यांना , त्यांच्या कर्तुत्वाला आणि सर्व संपन्न आयुष्याला आदरांजली.

खूपच चांगल्याप्रकारे मांडलेत. साधारण याच भावना आहेत.. स्वराज या एका पिढीच्या रोल मॉडेल होत्या. त्यांना श्रद्धांजली.

अवांतर - वेळात वेळ काढून 370 आणि स्वराजजी यांच्यासाठी बॅनर लावावे ही विनंती.

तमराज किल्विष's picture

7 Aug 2019 - 8:43 am | तमराज किल्विष

. त्यांच्या ऋजु आणि शालीन व्यक्तिमत्वाने त्या घरातीलच, आपल्या रक्ताच्या नात्यातल्याच कुणीतरी वाटत राहिल्या.
>> हे शंभर टक्के खरं आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली. _/\_

राघव's picture

7 Aug 2019 - 8:48 am | राघव

अगदी असंच म्हणतो.. खूप खूप वाईट बातमी.. :-(

महासंग्राम's picture

7 Aug 2019 - 9:35 am | महासंग्राम

abc
आम्ही हे गमावलंय !

प्रचेतस's picture

7 Aug 2019 - 9:43 am | प्रचेतस

विनम्र आदरांजली.

धर्मराजमुटके's picture

7 Aug 2019 - 10:03 am | धर्मराजमुटके

काल रात्रीच व्हॉटसअप वर बातमी आली. नेहमीप्रमाणे फेक न्युज असेल म्हणून दुर्लक्ष केले आणी वर्तमानपत्र बघीतली पण तेथे फक्त हॉस्पीटल मधे आहेत एवढीच बातमी होती. पण दुर्दैवाने नको त्या बातम्या खर्‍या ठरतात. वाजपेयींनंतर आत्मियता वाटाव्या अशा त्या राजकारणी होत्या. शक्यतो राजकारणी, सिनेमा क्षेत्रातील माणसांबद्द्ल मला फारशी उत्सुकता आणि आत्मियता वाटत नाही पण काही ठराविक अपवाद आहेत.
मोदींच्या दुसर्‍या टर्म मधे त्यांनी निवडणूक लढविली नाही हे चांगलेच झाले. निदान त्या निमित्ताने त्यांना अखेरच्या काही दिवसांत कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळाला.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

Nitin Palkar's picture

7 Aug 2019 - 10:08 am | Nitin Palkar
Nitin Palkar's picture

7 Aug 2019 - 10:10 am | Nitin Palkar

सुषमा स्वराज - ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्नेहल भाव असे. ज्यांच्या वाणीत ओज तर जिव्हेवर सरस्वती विराजत होती. प्रकांड पंडित, संस्कृत पारंगत, कुशल राजनीतिज्ञ सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मित्रहो's picture

7 Aug 2019 - 10:16 am | मित्रहो

अतिशय दुःखदायक बातमी.

नि३सोलपुरकर's picture

7 Aug 2019 - 10:29 am | नि३सोलपुरकर

विनम श्रद्धांजली __/\_

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Aug 2019 - 10:46 am | ज्ञानोबाचे पैजार

आजारी होत्या हे माहित होते पण इतक्या तडकाफडकी त्या जगाचा निरोप घेतील असे वाटले नव्हते.
भावपूर्ण श्रध्दांजली.

शुभावि's picture

7 Aug 2019 - 11:02 am | शुभावि

राजकारणी आई कशी असावी याचे एक मुर्तीमन्त उदाहरण म्हणजे श्रीमती सुषमा स्वराज.
भारतीय राजकारणातला आणखी एक हीरा निखळला __/\__

श्वेता२४'s picture

7 Aug 2019 - 11:23 am | श्वेता२४

वाजपेयीजींप्रमाणेच आदरणीय असलेल्या , पंडीता, उत्तम संसदपटू, वक्त्या, कणखर, कार्यक्षम, सुसंस्कृत, अशी कितीतरी विशेषणे बहाल करुन कौतुक केले तरी कमीच पडावे अशा त्या नेत्या होत्या. मला व्यक्तिश: त्यांच्याबद्दल आदरयुक्त प्रेम वाटायचे. कोणीतरी जवळचे गेल्याचे दु:ख होत आहे.

प्रसाद_१९८२'s picture

7 Aug 2019 - 1:14 pm | प्रसाद_१९८२

RIP

जोनाथन हार्कर's picture

7 Aug 2019 - 1:49 pm | जोनाथन हार्कर

पंतप्रधानपदाची योग्यता असलेल्या सुषमाजींना भावपूर्ण श्रद्धांजली.

हस्तर's picture

7 Aug 2019 - 2:36 pm | हस्तर

गड आला पण सिंह गेला

रविकिरण फडके's picture

7 Aug 2019 - 10:13 pm | रविकिरण फडके

'सुषमा स्वराजांना श्रद्धांजली'?

'सुषमा स्वराजना श्रद्धांजली' असे पाहिजे.

हे लिहिणे काही लोकाना अप्रस्तुत वाटेल पण कधी नव्हे एवढी आज मराठीबद्दल जागरुक राहाण्याची गरज आहे.
(आजच "पाण्याचा स्तर वाढतोच आहे" अशी बातमी ABP माझा'वर कानावर आली. तो खाली येईल यथावकाश, पण मराठीचा स्तर मात्र वेगाने खाली चाललाय, कधीच न उन्चावण्यासाठी.)

धागालेखक अथव प्रतिसाद लेखक या नात्याने तसेच व्यक्तीगत जीवनात जी काही भाषा म्हणून वाप्रतो त्यास सदर धागा लेखक तडजोड न करण्या जोगे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आधिकार समजतोच आणि आपली स्वतःची भाषा इतर कुणाच्याही बापाची जहागिर नाही हे ठणकाऊन सांगून आमच्या भाषा कौशल्यांचा अपमान करू धजणर्‍यांचा सर्वंकष उद्धार करीत अपमान अब्जावधीपटींनी स्वयमेव परतवत रहाणारे भाषा कौशल्य धागा आणि प्रतिसाद लेखक व्यक्त करतोच.

धागा लेखकाच्या तात्विक भूमिकेशी अनुरूप नसल्याने उपरोक्त प्रतिसादातील सुचवणी फाट्यावर मारण्यात आली

अभ्या..'s picture

8 Aug 2019 - 9:19 am | अभ्या..

आपल्या डबक्याला ज्ञानसागर समजून सतत अगम्य भाषेतल्या लिखाणांच्या लाटा ओतून वर अशी सार्वत्रिक फाट्यावर मारण्याची भाषा करणाऱ्यालाच शिस्तीत संपूर्णपणे फाट्यावर मारलं पाहिजे.

आमच्या भाषा कौशल्यांचा अपमान करू धजणर्‍यांचा सर्वंकष उद्धार करीत अपमान अब्जावधीपटींनी स्वयमेव परतवत रहाणारे भाषा कौशल्य धागा आणि प्रतिसाद लेखक व्यक्त करतोच.
धागा लेखकाच्या तात्विक भूमिकेशी अनुरूप नसल्याने उपरोक्त प्रतिसादातील सुचवणी फाट्यावर मारण्यात आली

प्रसाद_१९८२'s picture

8 Aug 2019 - 10:52 am | प्रसाद_१९८२

प्रतिसाद कोणी मराठीत ट्रांसलेट करेल का ?
--
आवांतराबद्दल क्षमस्व !

मिपा प्रतिसाद उपकरण अजून चालू ठेव परत फेड :)

धागालेखक अथव प्रतिसाद लेखक या नात्याने तसेच व्यक्तीगत जीवनात जी काही भाषा म्हणून वाप्रतो त्यास सदर धागा लेखक तडजोड न करण्या जोगे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आधिकार समजतोच आणि आपली स्वतःची भाषा इतर कुणाच्याही बापाची जहागिर नाही हे ठणकाऊन सांगून आमच्या भाषा कौशल्यांचा अपमान करू धजणर्‍यांचा सर्वंकष उद्धार करीत अपमान अब्जावधीपटींनी स्वयमेव परतवत रहाणारे भाषा कौशल्य धागा आणि प्रतिसाद लेखक व्यक्त करतोच.
धागा लेखकाच्या तात्विक भूमिकेशी अनुरूप नसल्याने उपरोक्त प्रतिसादातील सुचवणी फाट्यावर मारण्यात आली

सहमत आहे.
यथा बाधति बाधते।

माहितगार's picture

8 Aug 2019 - 11:38 am | माहितगार

शूरवाक्यम

यश राज's picture

8 Aug 2019 - 1:17 am | यश राज

भावपूर्ण श्रद्धांजली