वायुसेनेतील आठवणी – भाग २ कॉपल पांडे गायब झाला होता!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
15 May 2025 - 2:14 am

वायुसेनेतील आठवणी – भाग २
कॉपल जी.एस. पांडे

कॉपल पांडे गायब झाला होता!

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोचल्यावर मी लगेच शोध घेतला की पांडेचं काय झालं? स्टाफने सांगितलं,
"सर, काल खूप गोंधळ झाला. एक कॉर्पोरल विमानात चोरून बसायचा प्रयत्न करत होता, त्याला एअर फोर्स पोलिसांनी पकडलं. त्याला खाली उतरवलं आणि विमान १५ मिनिटं लेट झालं. नाव माहित नाही, पण तो कदाचित गार्डरूममध्ये असेल." आवाज ताठ आणि रूक्ष होता.
गार्डरूमचे वॉरंट ऑफिसर जेव्हा माझ्या स्टाफने संपर्क केला, तेव्हा त्याने सांगितलं,
"आत्ता ड्युटी घेतली आहे. लवकरच कळवतो."
पांडे कुठे आहे याचा काहीच पत्ता लागत नव्हता. मी माझ्या स्टाफला सांगितलं की त्याच्या ऑफिस अटेंडन्सची माहिती घ्या. एक एअरमनला त्याच्या बिलेटमध्ये पाठवलं की सामान तपासा. दोन्हीकडून रिपोर्ट आला - पांडे गायब!
तेवढ्यावरच तो विषय ठेवून मी माझ्या ऑफिसच्या कामात आणि रेस्क्यू एअरक्राफ्टचं पर्यवेक्षण यामध्ये बिझी झालो. दिवस गेले. आठवडे गेले.
आणि एक दिवस पांडे माझ्या ऑफिसच्या दरवाजात उभा!
थोडा आश्चर्य आणि चिडून मी विचारलं,
"कुठे होतास एवढे दिवस?"
तो म्हणाला,
"सर, सॉरी. मी तुमच्याशी संपर्क ठेवू शकलो नाही आणि तुम्हाला फालतू काळजीत टाकलं. आज ड्युटीला रिपोर्ट करून लगेच आलोय, कारण माझ्या भावना तुम्हीच समजू शकता."
माझ्या ऑफिसमध्ये डेस्कवर फायलींचा ढीग, फोन वाजत होते, मी मीटिंग्समध्ये अडकलेलो होतो. मी म्हणालो,
"आत्ता नाही, दुसऱ्या दिवशी ये."
पण माझ्या मनातून त्याचा विचार काही जात नव्हता. काय झालं असेल त्याचं? गेला का भुजला? एअरफोर्सने कठोर शिक्षा केली का? त्याचं मिशन सफल झालं का? हे सगळे विचार सतत येत होते.
तेवढ्यात पुन्हा आवाज आला, परिचित आवाज – स्टाफच्या बाजूच्या दारातून:
"सर, कॅन आय मिट यू अ‍ॅट युवर रेसिडेन्स?"
मीही वाटलं हा चांगला विचार आहे. मी परवानगी दिली. तो रात्री ८ वाजता माझ्या ९१/बी क्वार्टरवर आला. एक मित्र त्याला बाईकवर आणला. कुटुंबाला ओळख करून दिली. मुलं फार खुश नव्हती की बाबा एअरमनला भेटत आहेत! पत्नी अलकाने चहाचा ट्रे पाठवला.
चहा गार झाला कारण पांडेने बोलायला सुरुवात केली:
"सर, मला त्या वेळी खाली उतरवलं गेलं. पण कॅप्टनने मला डोळा मारत हळूच सांगितलं, 'फेला, इथेच रहा, पुढच्या वेळी घेईन.' त्या रात्री मी तुमच्या ऑफिसच्या मागे थांबलो. पहाटे तेच विमान परत आलं. क्रू आले तेव्हा मी लगेच गेलो, सॅल्यूट केलं. त्याने विचारलं, 'अजूनही इथेच आहेस?' त्याने मला कॉकपिटमध्ये बसायला सांगितलं आणि म्हणाला, 'लेट्स होप यु डोन्ट गेट कॉट धिस टाइम!'
पांडे पुढे म्हणाला,
"विमान थोडं वर गेल्यावर कॅप्टनने विचारलं, 'व्हॉट्स इन युवर ओव्हरकोट?' मी लाजत बटण उघडलं आणि वॉटर बॉटल दिली. त्याने विचारलं, 'किती आहेत?' मी दाखवलं - अजून सात बाटल्या कोटमध्ये शिवून ठेवल्या होत्या! त्याला विश्वासच बसला नाही. मी म्हणालो, 'सर, कधी कोणाला तहान लागेल सांगता येत नाही म्हणून सगळं तयार ठेवलं.' तो हसला आणि म्हणाला, 'वेरी क्लूफुल ऑफ यू!'"
"ओक सरांनी तुझ्याबद्दल सांगितलं होतं," कॅप्टन म्हणाला, " ते म्हणाले, 'इतकं सगळं शेकडो टन मदतीचं साहित्य नेणे व्यर्थ असेल जर हा एकटा जीव भुजला पोचला नाही तर!' "त्यामुळेच तो कॅप्टन माझ्याशी इतका चांगला वागला!
आता त्याचा मित्र सतत काहीतरी धरून बसला होता. मी विचारलं,
"काय आहे हे?"
तो म्हणाला,
"सर, पांडेने ३०० फोटो काढलेत! हा त्याचा अल्बम आहे."
आणि कथा सुरु झाली...कॉपल पांडेने सांगायला सुरुवात केली, त्याच्या खास शैलीत...
"सर, लुक इन धिस स्नॅप – अ‍ॅट सम रिमोट व्हिलेज प्लेस, नेम आय डोन्ट नो. फुल हाउसेस कोलॅप्स्ड. द रेस्क्यू टीम हॅड नॉट इव्हन रीच्ड. द बॉडीज वर कवर्ड विथ फ्लाईज. आय मॅनेज्ड टू कॉल वन पर्सन हू केम इन सर्च ऑफ हिज रिलेटिव्ह्स. बोथ ऑफ अस रिकव्हर्ड अ कपल ऑफ लाइव्स स्टिल स्ट्रगलिंग टू सर्व्हायव्ह."
(“सर, या फोटोमध्ये बघा – कुठल्याशा दूर गावातली जागा आहे. सगळी घरं कोसळलेली. मदत पोहोचलेली नव्हती. मृतदेहांवर माशा बसलेल्या. मी एका व्यक्तीला बोलावलं – तो त्याच्या नातेवाइकांना शोधत होता. आम्ही दोघांनी मिळून अजून जिवंत असलेल्या दोन लोकांना बाहेर काढलं.”)
(दुसरा फोटो दाखवत)
"सर, हिअर आय लॉस्ट माय पर्स! आय वेंट टू बाय फूड फॉर समवन ऑन द रोडसाइड. द पर्स वॉज लेफ्ट ऑन द अपोजिट साइड ऑफ हिज ठेला. मी वॉज गोइंग बॅक, बट इट वॉज गॉन!"
(“सर, इथे माझं पाकीट हरवलं. मी रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका माणसासाठी खाणं घ्यायला गेलो. तेव्हा पाकीट त्याच्या गाड्याच्या दुसऱ्या बाजूला राहिलं. परत आलो, तोपर्यंत गायबच झालं!”)
"अलॉन्ग विथ मनी, आय लॉस्ट माय आयडेंटिटी कार्ड टू! फॉर दॅट आय हॅड टू अंडरगो कोर्ट ऑफ इन्क्वायरी!"
(“पैशांसोबतच माझं आयकार्डही गेलं. त्यामुळे मला चौकशीला सामोरं जावं लागलं.”)
"सर, धिस वन हॅज सम बॅकग्राउंड… आय वॉज अब्यूस्ड! दे सेड, 'लुक धिस फेलो – ही मस्ट हॅव ईटन द एड!' बट आय टोल्ड देम, ‘सर, आय हॅड लॉस्ट माय पर्स… नथिंग टू ईट सिन्न्स लास्ट नाईट.’"
(“सर, माझ्यावर आरोप केले गेले – ‘हा माणूसच मदतीचं सामान खाल्लंय!’ मी हात जोडून सांगितलं – माझं पाकीट हरवलंय, मी कालपासून उपाशी आहे.”)
"बट दे वेअर काइंड – दे टूक मी टु देर टेंट्स, गेव्ह मी मिल्क, वॉटर, बिस्किट्स!"
(“ते लोक दयाळू निघाले. त्यांनी मला दुध, पाणी, बिस्किटं दिली.”)
"आय टूक यंग लॅड्स फॉर रेस्क्यू. देअर, वन कॅमल वॉज वाउंडेड अँड ट्रायिंग टु स्टँड. विथ प्लॅंक्स, ही मूव्ह्ड अ लिटल. देन वी पुट वॉटर इन हिज माउथ. ही ड्रँक अ फ्यू सिप्स अँड डाइड!"
(“मी काही तरुणांना सोबत घेऊन मदतीसाठी गेलो. तिथे एक उंट जखमी अवस्थेत उभा राहायचा प्रयत्न करत होता. आम्ही प्लॅंकच्या मदतीने हलवला आणि त्याला पाणी दिलं. दोन घोट प्याला… आणि मृत्यू आला.”)
"सर, देअर आय विटनेस्ड हाऊ डेथ टेक्स प्लेस."
(“सर, तिथे मी मृत्यूचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.”)
"बाय लक, मेनी वुमेन वेअर सेफ – दे वेअर आउट फॉर सम वर्क… स्कूल बिल्डिंग्स कोलॅप्स्ड, बट चिल्ड्रन वेअर इन ग्राउंड फॉर फ्लॅग होईस्टिंग – अँड दे वेअर सेफ!"
(“बऱ्याच स्त्रिया वाचल्या कारण त्या बाहेर कामासाठी गेल्या होत्या. शाळा कोसळल्या, पण मुलं २६ जानेवारीसाठी मैदानावर जमलेली होती, म्हणून वाचली.”)
मी विचारलं:
"यू सिम टू बी अ गुड फोटोग्राफर?"
"यस सर! बट आय हॅड टू सेल माय कॉस्टली कॅमेरा."
(“हो सर… पण मला माझा महागडा कॅमेरा विकावा लागला, त्याच पैशात परत आलो.”)
"दिस मिशन मेड मी टोटली ब्रोक. अँड ऑन टॉप, आय हॅड टू फेस डिसिप्लिनरी अ‍ॅक्शन!"
"बट सर, आय ऍम सॅटिस्फाइड. आय वॉन्टेड टु रीच पीपल. अँड आय डिड – थँक्स टु इंडियन एअर फोर्स!"
(“सर, मी पूर्ण समाधानी आहे. मला लोकांपर्यंत पोचायचं होतं… आणि मी ते केलं. इंडियन एअर फोर्स मुळे शक्य झालं.”)
"सर, लेट मी टेल यू द आयरनी ऑफ फेट…"
(सर नशीबाचा खेळ पहा)
"आफ्टर द एअरक्राफ्ट लँडेड अ‍ॅट भुज, आय गॉट डाउन विथ द कॅप्टन. आई वॉज इन द क्रू रूम. हॅड स्नॅक्स अँड केम बॅक."
(भुज विमानतळावर विमान उतरल्यानंतर मी कॅप्टनसोबत खाली उतरलो. त्यांच्या क्रू रूममध्ये गेलो. थोडं खाल्लं आणि परत विमानाकडे आलो.)
"बट देअर वॉज टोटल कमोशन! पीपल शाउटिंग अँड मिक्सिंग द एड मटेरियल. नो अकाउंटिंग, नो ऑर्डर!"
(पण तिथे पूर्ण गोंधळ माजलेला होता! लोक एकमेकांवर ओरडत होते, मदतीचं साहित्य एकमेकांत मिसळलं जात होतं. कुठलाही हिशोब नव्हता, ना काही शिस्त!)
"आय कुड नॉट स्टे क्वायेट. आय शाउटेड – 'नो वन टु टच द मटेरियल विथआउट माय परमिशन! आय अ‍ॅम फ्रॉम एअर फोर्स! आय विल सुपरवाइज! नो कोऑपरेशन, आय कॉल एअर फोर्स पोलिस!' "
(मला राहवेना. “मी जोरात ओरडलो — कोणीही मदतीच्या साहित्याला माझ्या परवानगी शिवाय हात लावायचा नाही! मी एअर फोर्सचा आहे. माझ्या देखरेखीत वाटपाचे काम होईल. नाही मानलं तर आमच्या पोलिसांना बोलावतो.”)
"माय युनिफॉर्म अँड कमांडिंग वॉइस इंप्रेस्ड देम. सीनियर्स केम अँड सेड – 'लीड द डिस्ट्रिब्युशन.' आय टोल्ड – ‘आई ऍम नॉट बास, आय अ‍ॅम युअर टीम.’ "
(“माझा पोशाख आणि शब्दांतील ठामपणा पाहून काहीजण पुढे आले. मी म्हटलं – मी साहेब म्हणून नाही, तुमच्यातला एक म्हणून काम करतोय.”)
"भुज स्टेशनच्या एअरमननी मला मेसमध्ये बोलावलं. लंच दिला. ओल्ड फ्रेंड भेटला. आय टोल्ड – गिव्ह मी अ बाईक. ही गेव्ह मी कीज ऑफ हिज फ्रेंड्स बाईक – ही वॉज ऑन टीडी."
(मी त्याला सांगितलं – मला एक बाईक दे. त्याने लगेच त्याच्या एका मित्राची बाईक दिली, जो टेम्पररी ड्युटीवर (TD) गेला होता.)
"बाय द इव्हनिंग, डिग्निटरीज वॉज देअर. दे सेड – 'सिंस ही टुक चार्ज, डिस्ट्रिब्युशन इज स्मूद.' दे शेकेड माय हँड. सून, आय वॉज इन फ्रंट ऑफ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर!"
(संध्याकाळपर्यंत वरिष्ठ अधिकारी आले. त्यांनी सांगितलं – ‘ज्यावेळी याने जबाबदारी घेतली तेव्हापासून वाटप सुरळीत चाललं आहे.’ त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं. आणि पाहता पाहता, मी जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसलो होतो!)
"ही सेड – 'ग्लॅड टू सी एअर फोर्स रेप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम पुणे!' "
(“कलेक्टर म्हणाले – पुण्याहून प्रतिनिधी आलेला बघून आनंद झाला!”)
"आय वॉज अ लायन – बट अ फ्यू अवर्स अगो, आय वॉज हायडिंग टु गेट इन द एअरक्राफ्ट!"
(काही तासांपूर्वी मी विमानात चोरून बसायचा प्रयत्न करत होतो… आणि आता मी जणू सिंहासारखा उभा आहे!)
"माय ड्रेस वॉज शॅबी. माय कॅप – नो ब्रॅसो. बट माय चेस्ट – प्राउड!"
(माझा गणवेश मळका होता, टोपीवर ब्रॅसोचा चमकही नव्हता. पण छाती मात्र गर्वाने भरून आली होती!)
"नेक्स्ट डे, लॉजिस्टिक एअरमन केम. ज्युनिअर वॉरंट ऑफिसर टुक चार्ज. आय वॉज फ्री!"
(दुसऱ्या दिवशी लॉजिस्टिक विभागाचे एअरमन आले. ज्युनिअर वॉरंट ऑफिसरने जबाबदारी स्वीकारली. आणि मी मोकळा झालो!)
"विथ फ्युल टँक फुल, आय स्टार्टेड. नो मॅप. "स्ट्रे डॉग्स यूज्ड टू रन आफ्टर माय बाईक लाईक मॅड. दे सिम्ड टु बी अफेक्टेड बाय नेचर’स रॉथ!"
(“वाटेत भटकंती कुत्रे माझ्या बाईकच्या मागे वेड्यासारखी धावत होती. त्यांच्यावरही निसर्गाच्या कोपाचा परिणाम जाणवत होता!”)
"समहाऊ मॅनेजिंग टु कीप बॅलन्स,
आय थॉट ऑफ युवर वर्ड्स – ‘कॉपल पांडे, यू आर वेस्टिंग टाइम. व्हॉट आर यू डूइंग हिअर? यू शुड बी देअर व्हेअर दे नीड यू द मोस्ट.’"
(“बाईक सांभाळत असतानाच तुमचे शब्द आठवले – ‘कॉपल पांडे, तू इथे वेळ का घालवतो आहेस. तुला तिथं पाहिजे जिथं लोकांना तुझी सर्वात जास्त गरज आहे.’”)
"माय फ्रेंड हॅड टू कम इन सर्च ऑफ मी टु टेक बॅक टु भुज फ्रॉम द सॅंडी पझल."
(“ वाळवंटात रस्ता हरवला होता. अखेरीस माझ्या मित्राला शोध घ्यावा लागला आणि तो मला पुन्हा भुजला घेऊन गेला.”)
"नाईट विल नॉट बी इनफ फॉर टेलिंग द स्टोरी बिहाइंड धिस स्नॅप्स."
(“या सगळ्या फोटोमागच्या कहाण्या सांगायला एक रात्र पुरणार नाही!”)
"सर, यू शुड बी गेटिंग लेट फॉर नाईट. मे आय टेक युवर लीव्ह?"
(“सर, आता तुम्हाला उशीर होईल… मी निघू का?”)
"बिफोर दॅट आय हॅव समथिंग फॉर यू..."
(“त्याआधी काहीतरी तुमच्यासाठी आहे.”)
(असे म्हणत त्याने खिशात हात घातला आणि एक मातीचा तुकड्यासारखं काहीतरी बाहेर काढलं.)
"सर, टु बी ऑनेस्ट विथ यू – आय हॅव पिक्ड इट फ्रॉम सम ब्रोकन अँड एम्प्टी होम."
(“सर, खरं सांगायचं तर हा शोभेचा पीस मी एका उद्ध्वस्त आणि ओसाड घरातून उचलला आहे.”)
"बट वन्स इट मस्ट हॅव बीन फुल ऑफ जॉय अँड विगर."
(मला वाटले की“कधीतरी तो मानाने आणि चैतन्याने भरलेल्या सुखवस्तू घरात असणार.”)
"आय वॉण्ट टु कीप धिस इन युवर पझेशन – अ‍ॅज अ रिमेंब्रन्स ऑफ इंस्पिरेशन."
(“आपल्या प्रेरणेची आठवण म्हणून मी तो तुमच्याकडे ठेवू इच्छितो.”)
"अ‍ॅज इफ दॅट पीस इज टेलिंग मी – ‘आय अ‍ॅम नॉट डेस्टाइन्ड टु बी इन आयसोलेशन विथ मिसरी अँड पॉवर्टी. आय बिलॉन्ग टु अ प्लेस ऑफ पीस अँड प्रॉस्परिटी.’"
(मी तो हाताळत असताना वाटले “जणू तो शोभिवंत पीस मला सांगतो आहे – मी दुःख व दारिद्र्याने वेढलेल्या वास्तूत राहण्यासाठी बनलेलो नाही… मी समृद्ध आणि सुखी घरात राहण्यासाठी घडवला गेलो आहे.”)
"इट वॉज केप्ट ऑन माय ऑफिस टेबल टिल आय वॉज इन चार्ज…"
(“नंतर तो , मी माझ्या ऑफिस टेबलावर ठेवला होता”)
(कॉपल पांडे पुन्हा एकदा मदतीसाठी परत आला!) "नाऊ व्हॉट?" मी त्याला विचारलं — चेहऱ्यावर स्पष्ट प्रश्नचिन्ह घेऊन!
Continued…
(क्रमशः…)

व्यक्तिचित्रणविचार

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

30 May 2025 - 11:21 am | सौंदाळा

विदारक परीस्थिती होती खरच,
सुरुवातीला पांडेवर कारवाई झाली वाटले तेव्हा वाचूनच दु:ख झाले. लालफितीच्या कारभारामुळे अपघात, एखाद्याची खुलेआम मुजोरी असले प्रकार घडत असून लोक अजूनही मदत करायला पुढे होत नाहीत.
मला आठवतय आमच्या कॉलनीतील गुजराती लोकांनी पुढाकार घेऊन भूकंपग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी ३ टेंपो फिरवले होते.
एकात कपडे, एकात खाण्यासाठी टिकाऊ, कोरडे पदार्थ, कच्चा माल (डाळी, पीठ वगैरे) आणि एकामधे औषधे. लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला होता आणि तेव्हा स्थानिक वर्तमानपत्रात पण याबद्दल बातमी आली होती. या सर्व आठवणी या लेखामुळे जाग्या झाल्या.

सुक्या's picture

31 May 2025 - 2:37 am | सुक्या

छान !!
एक (उगाचच आलेली) शंका : भारतीय वायुसेनेत किंवा थल वा नौसेनेत संभाषणाची भाषा इंग्रजी असते का? की इंग्रजीला प्राधान्य द्यावे लागते?

शशिकांत ओक's picture

31 May 2025 - 7:25 am | शशिकांत ओक

लेखी भाषा इंग्रजी, परेड ग्राउंड वरील आज्ञा हिंदी. तेज चल...दाहिने मुड वगैरे.
एकमेकांशी बोलताना सध्या जास्त करून उत्तर प्रदेश बिहारी हिंदी.

कारण पुढील भागात येईल.

नमस्कार,
'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा दुसरा भाग वाचून मी भारावून गेलो. हा भाग कॉर्पल पांडे यांच्या निस्वार्थ सेवाभावाची, निर्धाराची आणि माणुसकीची एक अविस्मरणीय गाथा सादर करतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे:
भाग २: निर्धाराची पराकाष्ठा आणि माणुसकीचा विजय
दुसऱ्या भागाची सुरुवात पहिल्या भागातील 'पण तसे घडणार नव्हते!' या वाक्याच्या रहस्याने होते. कॉर्पल पांडे गायब झालेला असतो, आणि लेखक विंग कमांडर ओक त्यांची चौकशी करतात. स्टाफकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडेने विमानात 'चोरून बसायचा' प्रयत्न केला होता आणि त्याला एअर फोर्स पोलिसांनी पकडले होते. ही माहिती वाचकाला पांडे यांच्यातील उत्कट तळमळ आणि धाडस दर्शवते, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत भुजला जायचेच होते. पांडे यांचा काहीच पत्ता लागत नाही, ज्यामुळे लेखकाला काळजी वाटते.
अनेक दिवसांनंतर पांडे पुन्हा लेखकासमोर उभे राहतात, आणि इथेच कथेला खरा भावस्पर्शी टप्पा मिळतो. पांडे यांनी लेखकाच्या घरी येऊन (जिथे त्यांचे कुटुंबही असते) आपली कहाणी सांगायला सुरुवात केली, हे त्यांच्यातील आपुलकी आणि आदराचे प्रतीक आहे. त्यांनी सांगितलेली भुजपर्यंतची कहाणी थक्क करणारी आहे:
* कप्तानाची माणुसकी: विमानातून खाली उतरवल्यानंतरही कप्तानाने त्यांना 'डोळा मारत' पुढच्या वेळी घेण्याचे आश्वासन दिले. पांडेने पहाटे त्याच विमानाची वाट पाहिली आणि कप्तानाने त्यांना कॉकपिटमध्ये बसवून नेले. ही घटना कप्तानाच्या व्यावहारिकतेची आणि पांडेच्या जिद्दीची प्रशंसा करते.
* पांडेची दूरदृष्टी: विमानात जाताना ओव्हरकोटमध्ये शिवून घेतलेल्या पाण्याच्या सात बाटल्या ही पांडेच्या दूरदृष्टीची, त्यागाची आणि इतरांच्या गरजा ओळखण्याच्या क्षमतेची साक्ष देतात. 'सर, कधी कोणाला तहान लागेल सांगता येत नाही म्हणून सगळं तयार ठेवलं' हे त्यांचे वाक्य त्यांच्यातील सेवाभावी वृत्ती दर्शवते. कप्तानाने 'ओक सरांनी तुझ्याबद्दल सांगितलं होतं' असे म्हणणे, पहिल्या भागात लेखकाने कॅप्टनशी केलेल्या संवादाचे महत्त्व अधोरेखित करते.
भुजमध्ये पोहोचल्यावर पांडेने जे पाहिले, ते भीषण आणि मन हेलावून टाकणारे होते. कोसळलेली घरे, मृतदेहांवरील माशा आणि मदतीसाठी न पोहोचलेली पथके. अशा स्थितीतही, एका नातेवाईक शोधणाऱ्या व्यक्तीसोबत मिळून त्यांनी जिवंत असलेल्या दोन लोकांना वाचवले. हे त्यांच्यातील प्रत्यक्ष कृतीची आणि मदतीसाठी धैर्याने पुढे सरसावण्याची वृत्ती दर्शवते.
त्यांनी आपले पाकीट हरवल्याची आणि आयकार्ड गेल्याने चौकशीला सामोरे जावे लागल्याची घटना वाचकाला त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देते. भूकंपातील पीडितांकडूनच 'दूध, पाणी, बिस्किटं' मिळाल्याचे सांगताना, पांडे यांनी मानवतेचा एक वेगळाच पैलू समोर आणला. तिथेच त्यांनी जखमी उंटाला पाणी पाजून मृत्यूचा अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांना जीव आणि मृत्यूच्या सीमेवरील दाहक वास्तव उमगले. अनेक स्त्रिया आणि मुले वाचल्याचे सांगताना, त्यांनी निसर्गाच्या क्रोधातून वाचलेल्या नशिबाचे क्षणही सांगितले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भुज विमानतळावर मदतीचे साहित्य वाटताना सुरू असलेला गोंधळ पाहून पांडे गप्प बसले नाहीत. त्यांनी आपल्या युनिफॉर्मचा आणि आवाजाचा धाक दाखवत, 'माझ्या परवानगीशिवाय कोणीही साहित्याला हात लावणार नाही' असे ठामपणे सांगितले. 'मी साहेब म्हणून नाही, तुमच्यातला एक म्हणून काम करतोय' हे त्यांचे वाक्य त्यांच्यातील नेतृत्व क्षमता आणि निस्वार्थ भावनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा केली. 'काही तासांपूर्वी मी विमानात चोरून बसायचा प्रयत्न करत होतो… आणि आता मी जणू सिंहासारखा उभा आहे!' हे वाक्य त्यांच्यातील स्वाभिमान आणि कर्तृत्वाची उंची दर्शवते. गणवेश मळका असूनही त्यांची छाती गर्वाने भरली होती, कारण त्यांनी आपले कर्तव्य बजावले होते.
भाग शेवटी, पांडे यांनी लेखकाला भुजमधील एका उद्ध्वस्त घरातून आणलेला मातीचा एक छोटा तुकडा भेट दिला. तो तुकडा जणू काही 'मी दुःख व दारिद्र्याने वेढलेल्या वास्तूत राहण्यासाठी बनलेलो नाही… मी समृद्ध आणि सुखी घरात राहण्यासाठी घडवला गेलो आहे,' असे सांगत होता. ही भेट केवळ एक वस्तू नसून, पांडे यांच्या भावना, त्यांचे अनुभव आणि त्यांच्यातील सकारात्मकता व आशावादाचे प्रतीक आहे. 'कॉपल पांडे पुन्हा एकदा मदतीसाठी परत आला!' हे वाक्य वाचकाला पुढील भागाबद्दल उत्सुक करते, कारण 'नाऊ व्हॉट?' हा प्रश्न लेखकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.
एकूणच, दुसरा भाग कॉर्पल पांडेच्या अदम्य इच्छाशक्ती, कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि नेतृत्वाच्या गुणांना प्रभावीपणे समोर आणतो. विंग कमांडर ओक यांनी पांडेंच्या या असामान्य प्रवासाचे वर्णन इतके जिवंत केले आहे की, वाचकालाही त्यांच्यासोबत भुजच्या त्या भीषण परिस्थितीतून प्रवास केल्याचा अनुभव येतो.
पुढील भागाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. कॉर्पल पांडे आता कोणत्या नवीन 'मदतीसाठी' परत आला आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे!
आपला विद्याधर