विज्ञानकथा आहेत का कुठे?
मराठी माणसाने विज्ञान क्षेत्रात एक ठसा उमटवला आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले वैज्ञानिक हि मराठी परंपरा.विज्ञानकथा हा प्रांत मराठीला तसा चांगलाच परिचयाचा आहे. इथे देखील आपला ठसा हा बऱ्यापैकी ठळक म्हणावा असाच. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके यांनी विज्ञान लेखनाला चांगले दिवस आणले. पण हि परंपरा कुठेतरी थिजली आहे असे वाटते. मराठी साहित्यातील हा रंग फिकट होतो आहे असे नाही का वाटत? दिवाळी अंकातदेखील अगदी मोजकच म्हणता येतील इतक लिखाण पण दिसत नाही. काय कारण असावीत या परिस्थितीला?