औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४: अबू बकर मुहम्मद इब्न झकारिय्या अल राझी
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ https://www.misalpav.com/node/42703
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक २ https://www.misalpav.com/node/42705
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३ https://www.misalpav.com/node/42744
जसे क्लॉडीअस गॅलेनला टाळता येत नाही तसेच अल राझीला देखील टाळता येत नाही एवढे त्याचे कार्य महान आहे. अल राझी हे एक पर्शियन विचारवंत, गणिती, वैद्य, रसायनशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि वैद्यकीय इतिहासातले महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. विविध क्षेत्रात त्याने चिरस्थायी असे विचार देऊन महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.