लिस्बन (पोर्तुगाल) येथे आयोजित केलेल्या जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये (International Physics Olympiad उर्फ IPhO) पवन गोयल, लाय जैन, सिद्धार्थ तिवारी, भास्कर गुप्ता आणि निशांत अभंगी या पाच भारतियांच्या चमूतील प्रत्येकाने सुवर्णपदक जिंकले आहे !
चमूतील १००% सभासदांनी सुवर्णपदक पटकावणे हा भारताचा गेल्या २१ वर्षांतील विक्रम आहे. या पूर्वी एकदा पाच पैकी चार जणांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती.
भौतिकशास्त्र शिक्षणाच्या विकास व प्रगतीसाठी आयोजित केल्या जाणार्या या ऑलिंपियाडची प्रथम आवृत्ती सन १९६१ मध्ये पोलंडमध्ये आयोजित केली होती व तिच्यामध्ये पाच देशांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आजच्या घडीला या प्रतियोगितेचा आवाका, ८७ देशांतील ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी, इतका वाढला आहे.
होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशनने या चमूची ऑलिंपियाडसाठी तयारी करून घेतली होती. या चमूतील पाचपैकी चार जणांची या वर्षी IIT Bombay मध्ये शिक्षणासाठी निवड झाली आहे आणि एकजण MIT मध्ये जाण्याच्या तयारीत आहे.
भारताची मान अभिमानाने ताठ करणार्या या सुवर्णचमूच्या सर्व सभासदांना उत्तुंग भविष्यासाठी अनेकानेक शुभेछा !
प्रतिक्रिया
30 Jul 2018 - 12:30 pm | कुमार१
व अभिनंदन!
30 Jul 2018 - 12:36 pm | श्वेता२४
सर्वांचे अभिनंदन.
30 Jul 2018 - 2:08 pm | mayu4u
या पाच जणांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे पण!
एक्का काका, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBCSE) आहे ते. कृपया सम्पादित करा ही न वि.
30 Jul 2018 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद ! तशी दुरुस्ती केली आहे.
30 Jul 2018 - 10:07 pm | नाखु
अभिमान वाटतोय
आईनस्टाईन बघ रे बाबा वरून जरा
खालच्या जगातला नाखु
30 Jul 2018 - 10:21 pm | dhananjay.khadilkar
अभिनन्दन
31 Jul 2018 - 2:48 am | गामा पैलवान
डॉक्टर सुहास म्हात्रे,
बातमीबद्दल आभार. पाचही सुवर्णपदकधारकांचं अभिनंदन.
निकाल इथे आहेत : http://ipho2018.pt/content/exams
आ.न.,
-गा.पै.
31 Jul 2018 - 11:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
परिक्षेचे स्वरूप (format), प्रश्न, उत्तरे आणि निकाल इत्यादींच्या तपशीलांसाठी धन्यवाद !
31 Jul 2018 - 2:53 pm | पुंबा
चमुचे, त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शकांचे तसेच शाळांचे सहर्ष अभिनंदन..
1 Aug 2018 - 8:41 am | गवि
अभिनंदन. कौतुकास्पद.
पुढे कितीजण इथे राहतील माहीत नाही. पण मूळचे भारतीय म्हणून अभिमान राहतोच भारतीयांना.
1 Aug 2018 - 7:43 pm | सुधीर कांदळकर
अपूर्व, झळझळीत वगैरे यश. अभिनंदन. बातमीबद्दल डॉ.साहेबांना धन्यवाद.
1 Aug 2018 - 8:13 pm | प्रकाश घाटपांडे
अशा बातम्यांनी बर वाटत
7 Aug 2018 - 3:44 pm | अनिरुद्ध प
आणि बातमी प्रसारित केल्या बद्दल डॉ साहेबान्चे तसेच गा पै यान्चे आभार.