विज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत ?

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
1 Jul 2018 - 10:53 pm

हा प्रामुख्याने एकेश्वरवादी 'श्रद्धावंत' आणि आस्तीकांसाठीचा प्रश्न आहे. विज्ञान हा शब्द आधूनिक कालिन सायन्स याच अर्थाने वापरला आहे. श्रद्धावंतांसमोर विज्ञानाच्या बाबतीत हा प्रश्न या पुर्वी कुणी ऊपस्थीत केला आहे का, किंवा उहापोह केला आहे का माहित नाही.

(ज्यांना धागालेख न वाचता शीर्षकावरुन सरळ चर्चा सहभाग घ्यायचा आहे त्यांनी तसे करण्यास हरकत नाही.)

पण अशा धर्तीवरचे जरा वेगळे प्रश्न ग्रीक तत्वज्ञांनी ऊपस्थीत केले होते. त्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या विकासाच्या सुरवातीच्या काळात ईश्वरादेश (उदा बायबल) सनातन म्हणजे ईश्वरा प्रमाणेच अनादी आहेत की एकेश्वर निर्मीत असा प्रश्न उपस्थीत केला गेला. अशाच प्रश्नाची चर्चा कुराणच्या बाबतीत ईस्लामीक ईतिहासात दिसते.

कुराण किंवा ईश्वरादेश अनादी सनातन आहेत म्हटले काय किंवा एकेश्वर निर्मीत काय फरक पडतो ? शेवटी जे आहे तेच कुराण वापरायचे आहेत तर ? पण हा विषय ईस्लामच्या ईतिहासात नवव्या शतकात ईतपत ऐरणीवर आला की ज्यांचे मत कुराण किंवा ईश्वरादेश अनादी सनातन आहेत असे होते त्यांची मिनहा (इन्व्किझीशन) म्हणजे धर्मन्यायिक चौकशी करुन तुरुंगवास दिले गेले.

कुणि कुणाला आणि काय शिक्षा केली ? ईस्वीसन ८२७ मध्ये तत्कालीन (अबासीद) खलिफा -धार्मीक राजप्रमुख- याने 'कुराण ईश्वर निर्मीत आहे' हे तत्व स्विकारुन हे तत्व न मानणार्‍यांना शिक्षा केल्या. दुसर्‍या गटाचे (आणि आजही सुन्नी तत्वज्ञानाच्या बहुतेक प्रमुख विचारधारा) मत कुराणमधील ईश्वरादेश सनातन म्हणजे इश्वर आहे तेव्हा पासूनचे अनादी सनातन आहेत. आपल्याकडे हिंदूधर्मिय परंपरावादी आपल्या धर्म परंपरांना सनातन -अनादी म्हणतात तसेच काहीसे. हिंदू धर्मीय परंपरागत धर्माला सनातन म्हणताना अलिखीत परंपरां रुढींचा ही सनातनतेत समावेश होत असावा (चुभूदेघे) . ईस्लामच्या बाबतीत या गटाचे मत कुराण ईश्वरादेश अनादी असल्याचे आहे/ होते. अनादी आहे म्हणण्याचा एक मह्त्वाचा फायदा / उद्देश्य / निहीत-अर्थ कोणतीही परंपरा/ संकेत/ नियम चालत आला आहे तसाच पुढेही चालवावा. नियमांमध्ये अंतर्गत अथवा बाह्य इनकंसिस्टंसी आल्या तर दुर्लक्षीत करता येतात. राजसत्ता न चालवणार्‍यांना परंपरावाद रेटल्याने बिघडत नाही त्यांचे हित्संबंध शाबुत रहाणार असतात. इनकंसिस्टंसीजना राजसत्तेस तोंड द्यावे लागते तेव्हा नियमात बदल करण्याची व्यावहारीक गरज निर्माण होते. अनादी-सनातनवादी सहज बदल करु देत नाहीत. तत्कालीन खलिफासमोर परंपरावाद्यांना निरस्तकरण्यासाठी कुराण ईश्वर निर्मित आहे की अनादी हा वाद सहज साहाय्यभूत होऊन आला. कुराण ईश्वर निर्मीत आहे म्हटले कि तयार होण्याची वेळ असली पाहीजे आणि कुराण त्या वेळेसाठी योवेळेसाठी, नंतरच्या वेळेसाठी रि इंटरप्रीट करता येईल हे खलिफाला हवे होते आणि परंपरावाद्यांना नको होते. केवळ ईशवरच अनादी असू शकते ईतर काहीच नाही जे लोक कुराण ईश्वरासोबतचे अनादी आहे म्हणतात ते ईश्वराचा शब्द ईश्वरास स्पर्धात्मक ठरवून ईश्वरी शक्ती एका पेक्षा अधिक असल्याचे भासवून , ईश्वर एकच असल्याचा कुराणचा नियम मोडतात असा सिद्धांत मांडून परंपरावाद्यांना खलिफाने आत केले. अर्थात काळाच्या ओघात परंपरावाद्याम्चे प्राबल्य पुन्हा वाढले आणि कुराण अनादी नाही म्हणणार्‍यांना त्यांनी मोडीत काढले. आणि शरीयामध्ये बदल करता येत नसल्याचे लावून धरले.

ईस्लाम बाहेरच्यांना त्यांचा हा तात्विक विवाद त्यांनी पडद्याच्या मागे सरकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे फारसा माहित नसला तरी लॉजीकली अजूनही प्रॉब्लेमॅटीक असलेला प्रश्न आहे. कारण आजच्या काळात कुणालाही विचारले तर कुराण मधील काही आदेश सरळ सरळ प्रेषित कालीन आहेत त्यांना अनादी कसे म्हणता येईल आणि म्हटले तरी एकेश्वराच्या स्वतःच्या अनादीत्वासोबतचे कसे म्हणता येईल ? असो. ह्या वादाची ओळख मुख्य चर्चा विषयाचा अंदाजा येण्यास साहाय्य व्हावे म्हणून. सोबतच पुस्तकपुजेच्या एका अंधश्रद्धेच्या जोपासनेचा अंदाज आला असेल. या धागा लेखात मला या वादाचे सर्व पैलू कव्हर करता आलेले नाहीत, जिज्ञासूंनी गूगलल्यास अधिक माहिती Is Quran created or uncreated ? असा गूगल सर्च देऊन मिळावी. ईंग्रजी विकिपीडिया लेखातून या वादाच्या सर्व बाजू येत नसल्यातरी अंशीक ओळख होऊ शकते.

तर, या धागा लेख चर्चेचा विषय आहे, विज्ञान (विज्ञान तत्वे) सनातन-अनादी आहेत कि एकेश्वर निर्मीत ? अनादी आहेत असा अर्थ केला तर एकेश्वराला , विज्ञान (विज्ञान तत्वे) स्पर्धा करत को-एक्झीस्ट करते म्हणजे एकेश्वरवादाला अप्रत्येक्ष छेद जातो. किंवा दुसर्‍या बाजूस विज्ञान तत्वे एकेश्वर निर्मीत आहेत आणि ईश्वर विज्ञानतत्वे बदलू शकतो याचे समर्थन करावे लागते.

या वादात कदाचित अनेकेश्वरवाद्यांना अधिक फ्लेक्झीबीलीटी मिळते. विज्ञानतत्वे एकेश्वराला स्पर्धाकरत कोएक्झीस्ट करतात म्हटले तरी त्यांच्या खिशातले काही जात नाही ते पत्येक विज्ञानतत्वाला ईश्वरी दर्जा देऊ शकतात.

विज्ञान वादी नास्तिक त्यांना विज्ञानतत्वे अनादी असतात हि भूमिका कदाचित लावून धरावी लागेल का ?

तुम्ही कोणत्या पक्षात आहात ? तुम्हाला काय वाटते ?

* मी या लेखात वापरलेल्या ईंग्रजी शब्दांना मराठी शब्द सुचवण्यास हरकत नाही (ह्या लेखा पुरतेच, अन्यथा सहसा माझी हरकत असते हे वे सा न ल.)
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी चर्चा सहभागासाठी आभार.

धर्मइतिहाससमाजविज्ञान

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

2 Jul 2018 - 1:54 am | गामा पैलवान

माहितगार,

या लेखात तुम्ही सनातन म्हणजे अनादि असा काहीसा अर्थ घेतल्याचं जाणवतंय. प्रत्यक्षात सनातन म्हणजे नित्यनूतन असा अर्थ आहे. म्हणून हिंदू धर्माचं अधिकृत नाव सनातन धर्म आहे.

आपला देहसुद्धा दर क्षणाक्षणाला नूतनीकृत होत असतो. त्यामुळे देहदेखील सनातनच आहे. जेव्हा तो सनातन रहात नाही तेव्हा त्याला प्रेत म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

2 Jul 2018 - 8:14 am | माहितगार

.....प्रत्यक्षात सनातन म्हणजे नित्यनूतन असा अर्थ आहे. ....

व्यकीशः परंपरवादी असूनही सनातन शब्दास ....प्रत्यक्षात सनातन म्हणजे नित्यनूतन असा अर्थ आहे. .... असा कालसुसंगत नित्यनूतन अर्थ देण्यासाठी आपले मनःपुर्वक आभार :)

आता पुस्तक डॉट ऑर्गवरील अद्याप नूतनीकरण होण्याच्या बाकी व्याख्या बघू या

शब्द का अर्थ
सनातन : वि० [सं०] [भाव० सनातनता] १. जो आदि अथवा बहुत प्राचीन काल से बराबर चला आ रहा हो। जिसके आदि का समय ज्ञात न हो। जो परंपरानुसार आचार-विचार आदि पर निष्ठा रखता हो। परंपरानिष्ट (आर्थोडाक्स) २. सदा बना रहनेवाला। नित्य। शाश्वत। ३. निश्चल। स्थिर। ४. अनादि और अनंत। पुं० [वि० सनातनी] १. अत्यन्त प्राचीन काल। २. बहुत दिनों से चला आया हुआ व्यवहार क्रम या परम्परा। (विशेषतः धार्मिक आचार, विश्वास आदि के संबंध में) ३. वह जिसे श्राद्ध आदि में भोजन कराना आवश्यक हो। ४. ब्रह्मा। ५. विष्णु। ६. शिव।
समानार्थी शब्द- उपलब्ध नहीं
सनातन-धर्म : पुं० [सं० मध्यम० स० कर्म० स० वा] १. ऐसा धर्म जो अनादि अथवा बहुत प्राचीन काल से चला आ रहा हो। २. वर्तमान हिंदू धर्म जिसके संबंध में उसके अनुयायियों का विश्वास है कि यह अनादि काल से चला आ रहा है। इसके मुख्य अंग है-बहुत से देवी-देवताओं की उपासना, मूर्ति-पूजा, तीर्थ-यात्रा, श्राद्ध, तर्पण आदि।

गामा पैलवान's picture

2 Jul 2018 - 12:42 pm | गामा पैलवान

माहितगार,

शब्दकोशीय व्याख्येने पुरेसं आकलन होत नाही. इथला दुसरा परिच्छेद अधिक प्रकाश पाडते : https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4...

त्यानुसार सनातन धर्मात सर्व उपास्य देवता समान व एकमेकांच्या भक्त मानल्या आहेत. सांप्रदायिक वैर नाहीसे व्हावे म्हणून काही विद्वानांनी विशेष प्रयत्न केले. याचं फलित म्हणून आज दिसतो तो सर्वसमावेशक सनातन धर्म उत्पन्न झाला.

जससा काळ बदलेल त्याप्रमाणे एकेक उपास्य देवतेस महत्त्व येत जाईल. मात्र तरीही सर्व देवता आंतरिक दृष्ट्या समान असल्याने वैदिक एकसत्यवचन सुद्धा अबाधित राहील. अशी ती योजना आहे. म्हणूनंच सनातन म्हणजे काळानुसार बदलणारा धर्म ( = नित्यनूतन ) होय.

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jul 2018 - 11:48 am | प्रकाश घाटपांडे

प्रत्यक्षात सनातन म्हणजे नित्यनूतन असा अर्थ आहे. म्हणून हिंदू धर्माचं अधिकृत नाव सनातन धर्म आहे.

सनातन याचा हा अर्थ आहे कि अन्वयार्थ? अपौरुषेय अपरिवर्तनीय असे काहीसे तो धर्माचा सनातन अर्थ आपण व्यवहारात वापरतो.

बहुधा अन्वयार्थ , खालील वाक्य बघा

'नित्य नूतन इति सनातन' अर्थात् जो प्राचीनतम होकर भी प्रति क्षण नया है, वही सनातन है संदर्भ

वाक्यातली गुगली लक्षात आली का ? अशी गोष्ट जीला आम्ही काळामुळे जुनी होते असे मानत नाही, म्हणून नित्यासाठी म्हणजे नेहमीसाठी नूतनच आहे. आता नूतनच आहे तर अजून काही नवीन परीवर्तन मागण्याचे कारण आणि संधी रहात नाही.

म्हणजे नित्य परिवर्तन होणारे या अर्थाची जागा प्रत्यक्षात परिवर्तनाची गरज नसलेल्या अर्थाने भरली की झाले हि परंपरावादी छद्म युक्ती आहे जी परिवर्तनास नाकारु इच्छिते, विद्येची जागा अविद्येने विज्ञानाची जागा अविज्ञानाने घेण्याची याच्यापेक्षा चांगली क्लृप्ती असू शकत नाही. म्हणूनच ईश्वर निर्मित किंवा पौरुषेय पैकी एक स्विकारण्यापेक्षा अनादी किंवा नेहमी नवेच रहातेवर खपवले की झाले. मानवी बुद्धीतून काय काय भन्नाट कल्पना निघतात, कमाल वाटते एकेकदा.

तळटीप : काका कालेलकरांनी सनातन शब्दाची पुरोगामी मांडणी पण केलेली दिसते. 'गती, प्रगती, परिवर्तन, अनुभव , सुधार, प्रयोग, संस्करण ये सब सनातन धर्म के मूल तत्व है . ईस लिए सनातन धर्म नित्य नूतन रहता है. आता काका कालेलकरांच्या अशी व्याख्या करणार्‍या पुस्तकाचेच नाव 'युगानुकूल हिंदू जीवनदृष्टी' असे आहे. काका कालेलकरांप्रमाणे युगानूकुल परिवर्तन मान्य असलेले नित्य नूतन , आदरणीय गा.पै जींना मान्य असल्याचे त्यांनी सुस्पष्ट केले तर काही वाद नाही . आम्ही अशा परिवर्तनाचे अभिनंदन करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. गा.पै. आणि हिंदू परंपरावादी नित्य नव्या परिवर्तनास तयार आहेत का ? हा महत्वाचा प्रश्न आहे.

कपिलमुनी's picture

2 Jul 2018 - 1:29 pm | कपिलमुनी

कन्टाळा आलाय तुम्हाला मेन बोर्ड वर बघून ! २-४ दिवस उसन्त घेत जा आणि देत जा

माहितगार's picture

2 Jul 2018 - 1:41 pm | माहितगार

ईतरांनीही लिहावे म्हणजे मेनबोर्डच्या आपोआप खालच्या क्रमांकाला जाते.

आपणास ईतर आमच्या नव्या जिलब्यांचा कंटाळा आला असल्यामुळे, आमच्या हम्मामा काव्य संग्रहातून ही जुनी चविष्ठ जिलेबी वाचनार्थ सप्रेम भेट.

वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा
खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा...

निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा
सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा..

टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे
जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा..

दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी
हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे
ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे...

हम्माऽऽऽ ...

* आपल्या मनमोकळ्या प्रतिसादांसाठी अनेक आभार

ओशो म्हणतो ते किती बरोबर आहे . मी तुम्हाला चंद्र दाखवतो आहे तर तुम्ही म्हणताय त्या कडे निर्देश करणारे बोट वाकडे आहे.

Jayant Naik's picture

3 Jul 2018 - 2:44 pm | Jayant Naik

या जगात काही अपौरुषेय आहे का ? किवा सारेच अपौरुषेय . जर एखादा ग्रंथ कुणी मनुष्याने लिहिला नाही म्हणून तो अपौरुषेय असे बरेच जण समजतात पण माझ्या मते ते बरोबर नाही . आकाशवाणी झाली किवा परमेश्वराने काही मानवी अवताराला आज्ञा दिल्या त्या कुठल्यातरी शरीराच्या माध्यमातूनच आपल्या पर्यंत पोचतात. असे समजायला हवे कि मनुष्याच्या शरीराचा फक्त मध्यम म्हणून उपयोग करून ज्ञान आपल्या पर्यंत आले त्यात त्या मध्यम म्हणून वापरल्या गेलेल्या शरीराचा काहीच हातभार नसेल तर ते ज्ञान अपौरुषेय . म्हणजे समजणे त्याचे नाही ... त्याला कसे समजले तर परमेश्वराकडून .... मात्र भाषा त्याची कारण त्याच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना समजावे म्हणून. . मेहेर बाबांनी शांततेच्या माध्यमातून ज्ञान संक्रमण करायचा प्रयत्न केला ....काही गुरु शक्ती पात या माध्यमातून ज्ञान संक्रमण करतात . म्हणजे ज्ञान कुठे तरी असतेच ..फक्त त्याचे संक्रमण शरीराच्या माध्यमातून जर होत असेल तर ते ज्ञान अपौरुषेय होय.

गामा पैलवान's picture

3 Jul 2018 - 5:54 pm | गामा पैलवान

माहितगार,

गा.पै. आणि हिंदू परंपरावादी नित्य नव्या परिवर्तनास तयार आहेत का ? हा महत्वाचा प्रश्न आहे.

हो. मी तयार आहे.

बाकी, धर्मास नित्यनूतन म्हणवतांना फक्त गुगली शब्दांचे बुडबुडे उडवायचे नसतात. तर त्या नूतनत्वाची नित्याने अनुभूती घ्यायची असते. त्यासाठी साधना असावी/करावी लागते. हिंदू धर्माची चिकित्सा करण्यापूर्वी प्रत्येकाने आपापली साधना तपासून पहावी.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

3 Jul 2018 - 9:29 pm | माहितगार

...हिंदू धर्माची चिकित्सा करण्यापूर्वी प्रत्येकाने आपापली साधना तपासून पहावी...

:) जरुर, काका कालेलकर रविम्द्रनाथ टागोर पसायदान विवेकानंद असे मार्गदर्शन असल्यानंतर ते अवघड जाऊ नये .

तर त्या नूतनत्वाची नित्याने अनुभूती घ्यायची असते.

आदर पुर्वक प्रणाम __/\__

...हो. मी तयार आहे.

हिंदूत्वाची ही प्लस बाजू वाटते , तत्तत्वज्ञानाचा आंतर्भूत उदारता सबळ आहे की परंपरावादी अनुयायी सुद्धा परिवर्तनास तयार होतात . आणि इथेच एकेश्वरवाद्यांपासून सकारात्मक फारकत होते.

मनमोकळ्या चर्चेसाठी अनेक आभार

अर्थात धागालेखाचे मुख्य उद्देश्य विज्ञान विषयक प्रश्न विचारला आहे त्या बाबत चर्चा पुढे जावी असे वाटते. ईतर काही धर्मांंच्या ग्रंथपुजेमागील कर्मठतेचे आधार या निमीत्ताने अप्रत्यक्षपणे तपासले जाऊ शकतील अशी आशा आहे.

गामा पैलवान's picture

4 Jul 2018 - 3:01 am | गामा पैलवान

माहितगार,

एक गंमत सांगतो. त्याचं काये की धर्माची चिकित्सा सतत करावी लागतेच. पण त्यात कोणी साधक कमी पडला तरी चालून जातं. कारण की धर्म ही श्रद्धेची बाब आहे. जिकडे चिकित्सा कमी पडते, तिथे श्रद्धेने काम चालवता येतं. शिवाय धर्म ही साधकाची खाजगी बाब असते. खाजगीत थोडं इथेतिथे झालेलं खपून जातं.

मात्र विज्ञानात खाजगीपणा शून्य असतो. त्यामुळे विज्ञानवाद्यांची खरी गोची होते. कारण की बऱ्याचशा विज्ञानवाद्यांना विज्ञान कशाशी खातात तेच मुळातून ठाऊक नसतं.

असे आकलनशून्य विज्ञानवादी विज्ञानावरच्या विश्वासासाठी इतरांवर अवलंबून असतात. धार्मिक पण साधना नसलेले लोकं जसे श्रद्धेच्या बाबतीत परावलंबी होतात व कुण्यातरी बुवाबापूच्या मागे लागतात. अगदी तस्सेच आकलनशून्य विज्ञानवादी वैज्ञानिक विश्वासांच्या बाबतीत परावलंबी असतात. पण यांना आपल्या विज्ञानवादाची इतकी धुंदी चढलेली असते की यांना आधुनिक विज्ञानातले कूटप्रश्न काय आहेत हेही माहित नसतं. धुंदीचा अंमल इतका जबरदस्त असतो की विज्ञानालाही मर्यादा आहेत याचा विसर पडलेला असतो.

वाट चुकलेला सश्रद्ध आणि अज्ञानापायी भरकटलेला विज्ञानवादी दोघेही सारखेच आहेत.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

4 Jul 2018 - 6:42 am | माहितगार

गा.पै. आपली टिका ठिक, ; 'विज्ञान अनादी आहे, कि ईश्वर निर्मीत ? ' या प्रश्नाचे आपले नेमके ऊत्तर काय आहे:?

गामा पैलवान's picture

4 Jul 2018 - 12:20 pm | गामा पैलवान

माहितगार,

आत्मन जसा स्वयंभू आहे तसंच ज्ञान स्वयंभू आहे. म्हणून विज्ञानही स्वयंभू आहे.

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

3 Jul 2018 - 10:39 pm | चौथा कोनाडा

रिमझिम पाऊस पडे सारखा...
या चालीवर.

*डॉ. संजय उपाध्ये - :
*टिप टिप मेसेज*

टिप टिप मेसेज गळे सारखा
बोटे फिरती मागे पुढे
वेळचवेळ सर्वांकडे गं बाई
गेले शहाणे कुणीकडे?

सूर्य उगवता पहिला उठतो
GM म्हणतो कुणीतरी
कुणी पाठवी गुच्छ अचानक
हाय हाय करतो कुणीतरी
कुणी स्वत:च्या गच्चीमधल्या
विविध फुलांचे पाडी सडे
वेळचवेळ सर्वांकडे गं बाई
गेले शहाणे कुणीकडे?

कुणी पाठवी लांबलांब एक
लेख कुणाचा? शहाण्याचा
ज्ञान स्वत:चे दाखविण्याचा
मी छंद ओळखे बहाण्याचा
कुणी टोमणे मारून बघतो
ग्रुपमधला मग कुणी चिडे
वेळचवेळ सर्वांकडे गं बाई
गेले शहाणे कुणीकडे?

कुणी पाठवी कवितेला नि
कुणी धाडतो व्हिडीओला
क्लिप पाहता चावट, कोणी
मिचकावे काणा डोळा
कवी पहिल्याची कविता फिरता
कवी दुसरा मग मनी कुढे
वेळचवेळ सर्वांकडे गं बाई
गेले शहाणे कुणीकडे?

इतुके सारे रोज वाचुनी
वेड लागते कधी कधी
घ्यावे सगळे मोबाइल्स, वाटे
फेकून द्यावेत नदी मधी
पत्नी म्हणते नको हो तुमचे
मग
कोण वाचणार काव्य गडे

टिप टिप मेसेज गळती सारखे
बोटे फिरती मागे पुढे
वेळचवेळ सर्वांकडे गं बाई
गेले शहाणे कुणीकडे?

डॉ . संजय उपाध्ये

माहितगार's picture

4 Jul 2018 - 6:45 am | माहितगार

गल्ली चुकली:? कि भात शिजला का चे काही वेगळे ऊत्तर आहे ?