निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना
निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न
पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा
भीषण दुष्काळाच्या वाळवंटात हिरवळ वाटावेत अशीही काही उदाहरणं आहेत! त्यापैकीच एक राजेंद्रसिंह राणा अर्थात् भारताचे पाणीवाले बाबा (Waterman of India)! आज ते कित्येक राज्यांमधल्या दुष्काळाशी लढताना दिसतात. राजस्थानातल्या कित्येक गावांमध्ये जोहड आणि जलस्रोतांना पुनरुज्जीवित केल्यानंतर आज ते देशभर फिरतात आणि लोकांना पाणी साठवण्याचा मंत्र देतात. अनेक सरकारी योजनांनाही ते मार्गदर्शन करतात. त्यांचं नाव द गार्डियनच्या अशा ५० लोकांच्या यादीमध्ये आहे जे पृथ्वीला वाचवू शकतात.
ह्या पाणीवाल्या बाबांची भेट झाली नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरमध्ये. देगलूरमध्ये विश्व परिवार नावाच्या एका संघटनेच्या 'दुष्काळ निवारण परिषदेमध्ये' जाणं झालं. तिथे पहिल्यांदाच ह्या अवलियाची भेट झाली. त्यांचं भाषण ऐकणं हा एक अनुभव होता. त्यांना ऐकणं वेगळं वाटलं. दूरचा प्रवास करून ते आले, त्यांची ट्रेन सहा तास लेट होती आणि ट्रेनमधून उतरून त्यांनी दोन तासांचा प्रवास केला. लोक खूप वेळेपासून वाट बघत होते, म्हणून ते रेस्ट हाऊसवर न जाता सरळ कार्यक्रमाच्या जागी आले आणि एकदम अनौपचारिक पद्धतीने त्यांनी भाषण केलं. भाषणापेक्षाही तो एक थेट संवाद होता. त्यांना ऐकताना असं वाटलं की, हा माणूस आपल्या ओळखीचा जवळचा डॉक्टर आहे आणि आपल्या रोगावर तो अचूक इलाज करू शकतो.
आधी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करणा-या विश्व परिवाराची ओळख करूया. विश्व परिवार कित्येक वर्षांपासून नांदेडच्या गावांमध्ये कार्यरत असलेली संघटना आहे. त्याचे संयोजक श्री कैलास येसगे माझे प्रिय मित्र! अनेक वर्षांपासून विश्व परिवार (औपचारिक संस्था नाही, अनौपचारिक संघटन) अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहे. दर वर्षी व्याख्यानमाला, स्पर्धा, आरोग्य शिबिर, सरकारी योजनांचे लाभ घेण्यामध्ये लोकांना मदत करणे आणि गेल्या काही वर्षांमध्ये पाणीप्रश्नावर अनेक गावांमधील कार्य ही परिवाराच्या कामाची उदाहरणं. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर व उदगीरच्या गावांमधल्या तरुणांची ही सकारात्मक आणि सृजनात्मक काम करणारी संघटना आहे. तिचं काम आज शेकडो गावांपर्यंत पोहचलं आहे.
त्याची चुणूक देगलूरमध्ये पोहचतानाच आली. देगलूरमध्ये पत्ता विचारला तेव्हा एका सहप्रवाशाने लगेच विचारलं, परिषदेला आलास का! तोसुद्धा कैलासचाच मित्र आहे. एका मोठ्या मैदानात सभेचं आयोजन होतं. बघता बघता हजारो शेतकरी आले. बसण्याची जागा संपून गेली तरी लोक येत राहिले. आमदार व खासदारही आले; कलेक्टर आणि अन्य अधिकारीही आले. काही शेतक-यांनी आपलं मत मांडलं. पण सगळे वाट पाहात आहेत पाणीवाल्या बाबांची. ते आले तसे लोक आनंदित झाले. इतक्या वेळ वाट पाहणं सार्थक झालं. एक गोष्ट नक्कीच खटकली की जो माणूस अजिबात आराम न करता प्रवासातून सरळ इथे येतोय, त्यांचा किती वेळ आपण सगळ्यांच्या सत्कारामध्ये वाया घालवतोय. असो.
राजेंद्रसिंहांनी अनेक गोष्टी सांगितल्या. हळु हळु दुष्काळाचा कोड ब्रेक होत गेला. त्यांनी सांगितलं की, अनेक वेळा पावसाळ्यात आपण बघतो की, खूप ढग आलेले असतात. पण पाऊस पडत नाही. पाणी न देताच ते निघून जातात. त्याचं कारण ढगांखाली झाडं नसणं हे आहे. जिथे हिरवा पट्टा असेल, तिथे ढग खाली येऊन पाणी देतात. जर आपण वृक्षांचं आवरण जमिनीवर लावलं तर असे ढग पाणी दिल्याशिवाय जाणार नाहीत. त्यांनी हेसुद्धा सांगितलं की, आपण अशी पिकं घ्यायला पाहिजेत जी इथल्या हवेला व वातावरणाला योग्य असतील. पण अनेकदा आपण चुकीची पिकंच घेतो. जल संधारणाचा एकच मार्ग आहे- पाणी वाचवत राहणे- जसं जमेल तसं पाणी थांबवा; त्याला पळू देऊ नका. त्यासाठी त्यांनी अनेक फॉर्म्युले सांगितले. जिल्ह्यातलं पाणी जिल्ह्याच्या बाहेर जायला नको. प्रत्येक ठिकाणी ते अडवायला पाहिजे. आणि असं अडवायचं की, सूर्यालाही पाण्याची चोरी करता येऊ नये! त्यामुळे वॉटर हार्वेस्टिंग, छोटे बांध, सीसीटी (कंटिन्युअस कोंटूर ट्रेंच) इत्यादी करायचे. जे पाणी पळतंय, त्याला संथ करायचं. छोट्या नद्यांची स्वच्छता करायची. त्यांनी सांगितलेला आणखी एक फॉर्म्युला म्हणजे नांदेड जिल्ह्यातल्या युवकांना नांदेडच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. तेव्हाच ही सगळी कामं होतील. हे लगेच पटलं.
सौजन्य: कैलास यसगे (viswapariwar@gmail.com)
पाण्याच्या संधारणाची अनेक कामं महाराष्ट्रात झालीही आहेत. शिरपूर पॅटर्न असेल किंवा जलयुक्त शिवार योजना आणि इतरही आहेत. संपूर्ण देशातील ४०% धरणं एकट्या महाराष्ट्रात आहेत. तरीही हा दुष्काळ! त्याचं कारण एकच आहे की हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण करायला इच्छाशक्ती पाहिजे. जेव्हा कधी आपण आजारी पडतो, तेव्हा आपल्याला आजारी आहोत हे कळतं कारण आपल्याला आरोग्यही माहिती असतं. जर आपल्याला आरोग्य माहितीच नसतं तर रोग हा रोग वाटलाच नसता. आज आपण बघतोय की हा दुष्काळ आहे, कारण संपन्नता म्हणजे काय, हेसुद्धा आपल्याला माहिती आहे. फक्त आपण त्याच्याशी जोडू शकत नाही आहोत. ही फक्त एक प्रकारची डिस्कनेक्टिव्हिटी आहे. हे दूर करणं कठिण आहे, पण अशक्य नाही. त्यासाठी तीव्र इच्छा असलेले लोक हवेत. जिद्द हवी, उत्साह हवा. राजेंद्रसिंहांनी जसं राजस्थानामध्ये केलं. पाण्याच्या पारंपारिक जोहड व्यवस्थेला पुन: कार्यरत केलं. काळाच्या ओघात त्यामध्ये आलेले दोष दूर केले. हजारो गावांपर्यंत हे काम नेलं. हे काम करण्यासाठी एक मोठं जनसंघटन उभं केलं. छोट्या छोट्या कामांद्वारे लोकांना समोर नेलं. अनेकदा छोट्या कामांमधूनच मोठ्या कार्याचा पाया घातला जातो. गांधीजींनी जे काम केलं, त्याचा पायाही असाच तयार झाला होता. गांधीजींच्या कामाचं सूत्र हेच होतं की, करायला सोपे असलेले कार्यक्रम लोकांना द्यायचे. जसं एक दिवसाचा सत्याग्रह, एका छोट्या कृतीद्वारे सरकारविरोधात असंतोष जाहीर करणे इत्यादी. त्यामुळेच लोकांचा उत्साह वाढतो व ते सहभाग घेतात. आणि हेच योग्य आहे, कारण महान अशा कामाची अपेक्षा व्यापक समुदायाकडून ठेवता येत नाही. सगळे जण क्रांतीकारक होऊन फासावर जाऊ शकत नाहीत. पण प्रत्येक जण छोटं- मोठं काम तर करूच शकतो/ शकते.
बघितलं तर बदलासाठी रॉकेट सायंसची काहीच गरज नसते. सगळ्यांनी मिळून एक पाऊल उचललंं तरी मोठा टप्पा गाठता येतो. डॉ. अभय बंगांचं एक सूत्र आठवतं. त्यांनी जेव्हा बालमृत्युवर काम करायला सुरू केलं, तेव्हा त्यांच्या संशोधनात त्यांना बालमृत्युची १८ कारणं आढळली. पण सगळ्याच कारणांच्या परिस्थितीत सुधारणा करणं खूप अवघड होतं. मग अनुभवाने त्यांंना कळालं की, अठरामधल्या तीन- चार कारणांवरही काम करून बालमृत्युचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुख्य अशा तीन- चार घटकांवर काम केलं आणि काही वर्षांनी बालमृत्युचं प्रमाण कमी झालं. तसंच ह्या दुष्काळाचं ही असेल बहुतेक. कारणं अनेक आहेत आणि जास्त तर आपल्या नियंत्रणाबाहेरची आहेत. पण काही कारणं तरी आपल्या नियंत्रणात आहेत. त्यावर थोडं काम सगळ्यांनी केलं तरी परिस्थिती नक्कीच बदलेल.
पुढचा भाग: निसर्ग, पर्यावरण आणि आपण ६: फॉरेस्ट मॅन: जादेव पायेंग
माझे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
21 May 2016 - 7:44 pm | _मनश्री_
लेख आवडला.......
21 May 2016 - 11:57 pm | एस
राजेंद्र सिंह यांनी नक्की कसे कार्य केलेय त्यासंबंधी जास्त माहिती यायला हवी होती. लेखमाला थोडीशी गोलगोल व्हायला लागलीये असे मला व्यक्तिशः वाटले. प्रश्नांना थेटपणे भिडत नाहीये. वरवरच स्पर्श करून पुढे सरकतेय असे जाणवले.
पुभाप्र.
22 May 2016 - 7:43 am | अंतरा आनंद
खरय. त्यामुळे पुढचा लेख वाचून प्रतिक्रिया देऊया असं म्हणत वाचतेय. छान सविस्तर लिहा ना. नुसते मुद्दे ही चालतील पण नुसतच विषयाला भोज्जा केल्यासारखं नको.
नावं ठेवत नाहीय लेख म्हणून चांगलाच आहे. पण अजून महितीपर आणि स्पष्ट झालं तरच लिहीण्याच्या मागील हेतू साध्य होईल म्हणून ही प्रामाणिक सूचना.
22 May 2016 - 11:05 am | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! तुमच्या विचारांचं स्वागत आहे. पण मी हे लेख त्या कामांविषयी असे लिहित नाहीय. पर्यावरण हा मुख्य विषय आहे. त्या संदर्भात त्या कामांचं मला झालेलं आकलन मी समोर आणतोय. माझ्या नजरेतून. त्याला धरून इतरही अनेक बाबी मांडतोय. त्या विषयांबद्दल शास्त्रशुद्ध माहिती हवी असेल तर ती इंटरनेटवर उपलब्ध आहेच. पण मी असं थिअरीटिकल न लिहिता जे अनुभवलं; जे त्याविषयी वाटतं त्यानुसार लिहितोय. :)
28 May 2016 - 12:41 pm | पैसा
श्री राणा यांच्याबद्दल अजून शोध घ्यावा लागेल. पण अनेकजणांना यांचे असे काही काम आहे हेच माहीत नसते. त्यांच्यासाठी सुरुवात स्वागतार्हच.
28 May 2016 - 7:42 pm | स्वामी संकेतानंद
राजेन्द्र सिंगजींना भेटलो आहे, बोललो आहे, प्रश्न विचारले आहेत. ती मुलाखत मी मागे फेसबुकवर टाकली होती. हिंदीत आहे. मराठी तर्जुमा करावा लागेल.सध्या हिंदीतच वाचा. :D
आज श्री. राजेन्द्र सिंहजी से हुई चर्चा के कुछ प्रमुख मुद्दे। एक दो मुद्दे छोड़कर बाकी सब में मैं सहमत था।
1.
प्र. :- नदी जोड़ो का विरोध अधिक मुखर हो कर क्यों नहीं किया जा रहा है? " - दिल्ली का एक युवा कार्यकर्ता
उत्तर :- नदी जोड़ो परियोजना दरअसल देश तोड़ो परियोजना है। अगर छोटामोटा डायवर्सन है या जिस में एक ही कंटूर में कम खर्चे में पानी मोड़ा जाएगा जैसे गंगा का पानी हिंडौन में छोड़ा गया तो ठीक है, लेकिन बड़ी बड़ी परियोजनाएँ तो अंततः नुकसानदेह ही है। "
"नरेंद्र मोदी बुलेट ट्रेन है। बहुत तेज़ी से चल रहें हैं। लेकिन रफ़्तार जितनी ज़्यादा हो एक्सीडेंट की संभावनाएँ भी उतनी ही बढ़ जाती है। गंगा स्वच्छ होगी लोगों के द्वारा ही, सरकार फिर चाहे कितना ही पैसा लगा लें। मैंने तो मोदी जी को बोला है, बस उन्होंने सुनने के लिए अपनी रफ़्तार धीमी करने की ज़रूरत है। "
2
प्र. :- महाराष्ट्र में जलयुक्त शिवार योजना के फायदे तो दिख रहें है लेकिन अगर किसानों का गन्ने के प्रति प्यार कम ना हुआ तो क्या? - स्वामी संकेतानंद
उ :- "जलयुक्त शिवार अच्छे से कार्यान्वित हो रही है। इस के फायदे भी दिख रहे है। मैंने स्वयं ड्राफ्ट बनते समय प्रावधान किया की यह पानी गन्ने को न जाए। पारंपरिक कृषि को बढ़ावा दिया जाएगा। इस विषय में जाग्रति भी लायी जा रही है। महाराष्ट्र में बीजेपी सरकार इस क्षेत्र में तो अच्छा काम कर रही है। इस वर्ष तो उन्होंने सूखाग्रस्त क्षेत्र में गन्ने की खेती पर प्रतिबन्ध भी लगा दिया है।"
प्र. :- काम ज़रूर अच्छा हो रहा है। सरकार तो गन्ने की खेती पर प्रतिबन्ध लगा देगी, लेकिन अगले 2 3 वर्ष अच्छी वर्षा हुई तो कहीं वहीं ढाक के तीन पात ना हो जाए। क्या लोग इतनी आसानीसे अपनी आदतें बदलेंगे? - स्वामी संकेतानंद
उ :- ज़रूर बदलेंगे। या कहूँ की बदल रहें हैं। लोग धीरे धीरे खेती का ढंग बदल रहें हैं। आप उत्तर प्रदेश के गन्ना बेल्ट में जा कर देखिए। पहले वे भी संपन्न किसान थे। फिर ख़स्ताहाल हो गए। अब उन को अपनी किसानी का ढंग बदलना पड़ा। यही महाराष्ट्र में होगा।
( यहाँ पर मैं ज़्यादा सहमत नहीं हुआ। मुझे अब भी लगता है कि किसान शायद फिर से गन्ने की ओर चलें जाएँगे। हमें किसानों को नहीं यहाँ की शुगर पॉलिटिक्स को ही बदलने की ज़रूरत है। गन्ने को स्पेशल ट्रीटमेंट मिलनी बंद हो गयी तो लोग ज़्यादा तेज़ी से अन्य उत्पादों की तरफ जाएँगे। ये बात कही भी मैंने लेकिन वे मुझ से ज़्यादा आशावादी है। :D )
प्र :- अगर हम लोगों की नदियों के लिए जो परंपरागत धार्मिक भावना रही है वो फिर से जगाएँ, तो क्या इस से हमें नदियाँ बचाने में ज़्यादा आसानी नहीं होगी? गंगा स्वच्छ रखने में लोग जुट जाएँगे। हर कोई मन लगाकर अपनी नदियाँ polluted न हो इस की कोशिश करेगा? हम तो नेचर वर्शिपर ही तो है। - अलीगढ़ क्षेत्र में काम करने वाली एक सामाजिक कार्यकर्ता बहन
उ:- अब के माहोल में धार्मिक भावना चेताना ज़्यादा मुश्किलें खड़ी कर देगा। हम सिर्फ भगवान बना के बस पूजा करते है, आदर नहीं करते। धर्म का रूप ही बदल गया है। अगर हम नेचर वर्शिपर है तो फिर से वही पुराने ढंग की नेचर वरशिप करनी होगी। जो आज के ज़माने में शायद हो नहीं पाएगा और नदियों को स्वच्छ करने के प्रयास में धार्मिक हालात और ख़राब हो जाएँगे। यहाँ धर्म ना आएँ तो ही अच्छा है। सब से बढ़िया मार्ग तो लोगों को नदियों का महत्व समझाना ही है।
प्र :- ब्रह्मपुत्र की बाढ़ को नियंत्रित करने के चक्कर में हम असम की ज़मीन की उर्वरकता ही तो नहीं ख़त्म कर देंगे? ब्रह्मपुत्र की बाढ़ तो हर वर्ष आती है और गाद बहा कर ज़मीन उपजाऊँ बनाती है। - स्वामी संकेतानंद ( यह मुद्दा मैंने तब उठाया जब उन्होंने कहा की ब्रह्मपुत्र की बाढ़ को कण्ट्रोल करने के उपाय खोजने चाहिए।(
उ :- बाढ़ और drought तो एक ही सिक्के के दो पहलु है। हमें दोनों को नियंत्रित करना चाहिए। ब्रह्मपुत्र की बाढ़ तो ज़मीन की उपजाऊँ परत बहा कर ले जा रही है। नुक्सान ही है। इस लिए बाढ़ नियंत्रण के किए हमें अरुणाचल से ही शुरुवात करनी चाहिए।
( यहाँ पर भी मैं सहमत नहीं हुआ। और अब भी नहीं हूँ। बाढ़ और सूखा एक सिक्के के दो पहलूँ अवश्य है लेकिन मेरा मानना है कि बाढ़ का पानी हमारे घर में नहीं घुसता, हम ने नदियों के फ्लड प्लेन्स में अपने घर बना लिए है। इजिप्ट ने आसवान डैम बनाया इस से बाढ़ आनी बंद हो गयी और ज़मीन की उर्वरकता में कमी आयी। डेल्टा क्षेत्र में भी मछलियाँ कम हो गयी। ब्रह्मपुत्र की बाढ़ को हमें रोकना नहीं चाहिए बल्कि हमारा व्यवस्थापन इस तरह से हो की जानमाल का कम से कम नुकसान हो। मैं ये मुद्दे उछालना चाहता था लेकिन फिर कार्यक्रम के आयोजकों ने चायपानी के बुला लिया। )
वैसे उन से बातें करने वाले हम सब युवा ही थे और उन्होंने कहा की सारे बदलाव तो आप लोगों को ही लाने है। युवाशक्ति जागृत होगी तभी इस समस्याओं से निपट पाएँगे। ( हाय राम! हर कोई आकर हमारे कंधो पर सारी ज़िम्मेदारी डाल देता है। :P :P :P )
एक कॉलेज का बंदा बोला की सर आप फेसबुक पे आइये, हमारे मार्गदर्शक बनिए। हम खूब काम करेंगे। तो वे बोले की अरे बेटा फेसबुक मेरे बस का नहीं। मैं तो मेल भी प्रिंट आउट निकाल कर पढता हूँ। :D :D :D
- स्वामी
30 May 2016 - 9:04 am | मार्गी
अरे वा! नमस्कार स्वामीजी! मस्त मुलाखत झाली तर! इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.