45 डिग्री सेल्सियसचा कडक उन्हाळा. फुल स्पीडच्या फॅनखालीपण घाम फुटण्याची दाट शक्यता. कॅम्पूटरवर ऑटोकॅड उघडून मशीन डिझाईन करण्यात गुतून गेलेलं एक नवीन जॉईनींग. अन पलिकडच्या टेबलावर बसलेला एक जुना बोका.
"'मघधीरा' हाय कारं तुज्याकडं?" समोरच्या टेबलावर रिकामं बसलेलं एक बेळगावी सॅम्पल. हा बोक्याचा नातेवाईक. हा रिसेपनिस्ट कम प्यून कम हेल्पर कम ऑपरेटर असा ऑल इन वन बळी.
बोका एक तुच्छ कटाक्ष त्याचाकडे टाकतो. अन पुन्हा कामात गडून जातो.
शेडवर बसलेला कावळा क्वॉक करतो
"सर, हे गिअर इथे कसे टाकायचे ?" नवीन जॉईनींगला अचानक पडलेला प्रश्न.
बोका उठतो अन दोन चार कमांड टाकून सरळ गिअरच बनवून देतो. नवीन जॉईनींगला हे कसं केलं घंटा कळत नाय. मात्र बोका लै मोठं घबाड हाती लागल्याच्या आनंदात जागेवर बसतो अन songs.pk वरून "डिजेवाले बाबू मेरा.." डाऊनलोडायला घेतो.
घड्याळात वाजतात चार. टिंग टॉन्ग.
एव्हाना नवीन जॉईनींग कंटाळतं. दोन दिवसांच काम दोन महिने झालं तरी संपलेलं नसतं. आता अर्धेकच्चे काम थेट मोठ्या साहेबाला दाखवून मार्गदर्शन मिळविण्याच्या उदात्त हेतूने काचेचा दरवाजा उघडतं.
18 डिग्री सेल्सियसवर साहेब एसीत झोपलेला. चैनीखैनीचं हिरवं पाकिट मधोमध टेबलावर. साहेब अधूनमधून घोरत पण होता.
"सर, धीस इज माय डिजाइन, आय वांट योर सजेशन इफ एनी " ल्यापटॉप पुढ्यात ठेऊन नवीन जॉईनींग मागे सरकतं.
साहेब जरा चुळबूळ करतो. मग उठून खिडकी उघडत तोंडातली खैनी बाहेर फेकतो. बिस्लरीच्या दोनचार चुळा भरून पुन्हा जागेवर ऐसपैस.
मग ल्यापटॉपकडे बघतो अन एखादं भूत बघितल्यासारखं बघतच राहतो. मग डोकं चोळत बाहेर जातो अन "आयघालीच्या, तुजं जरापण लक्ष नाय कामावर, बघ ह्येनं काय करून ठिवलंय " म्हणत थेट बोक्यावर चढतो. बाहेर बरीच चढाचढी होते. त्यातून बेळगावी सॅम्पलपण सुटत नाय.
साहेब आत येतो. आपलं नवीन जॉईनींग जरा बावचळलेलं. हात बांधून खाली मान घालून एसीत थंडगार.
साहेब खुर्चीवर ऐसपैस बसतो. थोडा विचार करून त्याला म्हणतो,
" बाहेर सेक्सी वेबसाईट कोणकोण बघतं? मला नावं सांग त्यांची" एखांद गुपित विचाराव असा साहेबांचा सूर.
"आयशप्पत न्हाय सर, मी कधीच बघत न्हाय" नवीन जॉईनींगला न्हाय मनलं तरी थोडा धक्काच बसतो.
"हुशाराय रे तू, पण तुजं टॅलंट हित वाया घालवू नगू"
नवीन जॉईनींग नुसतं मुंडी हालवून बाहेर येतं. बोकोबा फिस्सकन सुटत असलेलं हसू दाबून ठेवतो. बेळगावी सॅम्पल खाली रॉड उचलण्यात गर्क.
अन संध्याकाळी नवीन जॉईनींग 'सुटलो बुवा' म्हणत प्लेसमेंट ऑफिसमध्ये.
प्रतिक्रिया
18 May 2016 - 11:11 pm | राघवेंद्र
मस्त लिहीले आहे.
18 May 2016 - 11:18 pm | रातराणी
हम्म :)
18 May 2016 - 11:22 pm | चांदणे संदीप
जव्हेरभौ... वेल्ल्कम्म बॅक्क!
मायला... जोरातच हाये रगडा! बोका अन बेळगावी सॅंपल लै आवाल्डे!
Sandy
18 May 2016 - 11:30 pm | बोका-ए-आझम
Hmmmmm!
19 May 2016 - 1:59 pm | जव्हेरगंज
वरचा बोका वेगळा आहे बरे ;)
19 May 2016 - 11:01 am | गणामास्तर
लै किस्से आठवले एकदम.
19 May 2016 - 11:06 am | अभ्या..
जव्हेरभौ, नाराज केलं ह्या टायमाला. :(
19 May 2016 - 1:58 pm | जव्हेरगंज
असू शकते !
विषयच नाय घावला चांगला :(
19 May 2016 - 3:25 pm | वपाडाव
म्हणजे फुलवलं नाही चाण्गलं...
कथाबीज होतंच की...
19 May 2016 - 11:22 am | सौंदाळा
भोसरीच्या वर्कशॉप्स मधे नेहमी आढळणारी घटना
मस्त लिवलय
19 May 2016 - 2:01 pm | जव्हेरगंज
धन्यवाद मंडळी,
फाटक-तुटकं काय घावल ते लिवलंय!
उनाचं लय डोकं चालत न्हाय ;)
असो!
19 May 2016 - 3:29 pm | अजया
:)
आवडलं ब्वा हे पन
19 May 2016 - 4:33 pm | सिरुसेरि
छान कथा . अशा ठिकाणची उदासिनता छान मांडली आहे .
19 May 2016 - 4:42 pm | स्पा
अतिशय अप्रतिम
जी ए, दळवी नंतर जव्हेर साहेबांचाच नंबर लागायला हवा
19 May 2016 - 4:54 pm | जव्हेरगंज
19 May 2016 - 5:48 pm | टवाळ कार्टा
हा चूकून गुर्जींचा प्रतिसाद वाट्ला