दोन वेडे -३
तो वेडा ब्रेड कापत होता.
"हॅलो,मि.वेड विल्सन." मार्क म्हणाला.
वेडा फक्त त्याकडे बघत होता.
"१३ वर्षापूर्वी वाचलो मी. टॉमऐवजी तू मला मारायला हवं होतंस"
वेडने क्षणात त्याच्याकडे चाकू फेकला.
मार्कने तो शिताफीने चुकवला.
"१०२२ लोकांच्या म्रुत्यूनंतर अजून एक जीव घेण्यास तू कमी करणार नाहीस. पण हॉल एकच जागा नाहीये, जिथे लॉझ बनत होतं!
बारा वर्षांपूर्वी तू एका आजाराने मरायला टेकला होता. त्या आजारातुन बरं होण्यासाठी तुला एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं.तेथून तुला एका डॉक्टरने बाहेर फरार होण्यास मदत केली."
मार्कला आता दम लागला होता.
"पाणी मिळेल?"