आला आला जिलबीवाला आला आला
जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला
साधी जिलबी मावा जिलबी पण आहे
पंजाबी की राजस्थानी देऊ बोला
चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू
पण भेसळमालाची देऊ खाण्याला
आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी
नाहीतर करता तुम्ही झिंगालाला
जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी
स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला
- स्वामी संकेतानंद जलेबीवाले
प्रतिक्रिया
23 Nov 2015 - 11:51 am | पगला गजोधर
वेड्याच्या बायकोने, केल्या होत्या जिलेब्या,
तिकडून आला वेडा, त्याने डोकावून पाहिले,
रिंगा रिंगा म्हणून त्याने खेळायला घेतलें,
श्रीकांदा कमळकांदा असं कसं झालं,
आसं कसं झालं माझ्या नशिबी आलं …
23 Nov 2015 - 12:14 pm | नीलमोहर
किती दिवसांनी ऐकलं हे गाणं..
भोंडल्यातील आवडत्या गाण्यांपैकी आहे हे,
पण ते श्री कांता, कमल कांता असंय ना ?
23 Nov 2015 - 12:16 pm | पगला गजोधर
श्री कांता, कमल कांता असंय
टायपो..
23 Nov 2015 - 3:14 pm | स्वामी संकेतानंद
हे माहीत नव्हते.
भन्नाट आहे!!
23 Nov 2015 - 8:12 pm | कैलासवासी सोन्याबापु
स्वामीजी भुलाबाई चे गाणे म्हणतेत न बे आपल्याइकळे!
23 Nov 2015 - 11:51 am | खटासि खट
मठ्ठ्याशिवाय जिलेबी विकत नाही आपण. मान्य असेल तर २ किलो घ्या.
23 Nov 2015 - 11:58 am | अत्रुप्त आत्मा
हही हही हही !
स्वामिज्जि की महान रचनाएँ
23 Nov 2015 - 12:34 pm | विशाल कुलकर्णी
आलास का तू पण ...
23 Nov 2015 - 1:52 pm | स्वामी संकेतानंद
अर्रर्र
आमची प्रेरणा 'विकु मांत्रिक' हे लिहायचे विसरलोच बघ!
23 Nov 2015 - 2:04 pm | मांत्रिक
विकु मांत्रिक म्हणजे काय भौ!
23 Nov 2015 - 2:13 pm | स्वामी संकेतानंद
ते वरिजनल मांत्रिक हायति
23 Nov 2015 - 2:52 pm | विशाल कुलकर्णी
जानादेव स्वामीजी, नया (मांत्रिक) है वह...
(मांत्रिकभौ, हलके घ्या हो )
23 Nov 2015 - 12:36 pm | पैसा
झिंगालाला हु =))
23 Nov 2015 - 6:13 pm | पियुशा
गेला गेला जिल्बिवाला ऐसा बदल करावा ऎसे सूचवते ;)
23 Nov 2015 - 7:57 pm | बाबा योगिराज
मले मावा वाली जिबली....
23 Nov 2015 - 8:13 pm | कैलासवासी सोन्याबापु
तू बी आला का भुसनळ्या स्वाम्या !
*डोळे झाकलेले माकड़ स्माइली*