घोस्टहंटर-१
www.misalpav.com/node/34123
घोस्टहंटर-२
www.misalpav.com/node/34140
घोस्टहंटर-३
www.misalpav.com/node/34145
घोस्टहंटर-४
www.misalpav.com/node/34161
घोस्टहंटर-५
www.misalpav.com/node/34185
घोस्टहंटरच्या निमित्ताने!
www.misalpav.com/node/34200
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १
www.misalpav.com/node/34204
'मॉन्टेग्रो!'
घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर!
-------------------
स्लीपी होलोव!
शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे!
मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला!
एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती.
"माफ करा महाशय, मात्र स्लीपी होलोवमध्ये घोड़ा अलाऊड नाही."
त्याने घोड़ा वेशीवर बांधला.
आणि आपली हत्यारे घेत तो चालू लागला.
गावात अत्यंत कमी घरे होती.प्रत्येक घरासमोर भरपूर मोकळी जागा होती. घराला कुंपण होते.
गाव नेहमीच धुक्यात हरवलेले असे!
मात्र त्या व्यक्तीने एकाही घराकडे लक्ष दिले नाही.
तो सरळ नदीच्या दिशेने चालू लागला!
नदीकाठी एक अत्यंत जुनाट झाड होते.हे झाड अत्यंत उंच नसले तरीही झाडाचा बुंधा अत्यंत जाड होता.
त्याने झाडाच्या बुंद्यावर तीनदा टकटक केले!
आणि तो बुंधा उघडला!
-------------------
झाडाचा बुंधा उघडल्यावर रो खाली उतरला!
अत्यंत विस्तीर्ण व लाम्ब्लचक भुयारात तो आला होता.
अनेक पांढऱ्या आकृत्या इकडून तिकडे फिरत होत्या!
सोल केव्ह!!!!!!
एक बुटका त्याच्याजवळ आला!
"जर अनोळखी माणसाला भेटायचे असेल तर तीन रफा. ओळखीच्या माणसाला भेटायचे असेल तर तीस रफा.प्रसिद्ध माणसाला भेटायचे असेल तर मात्र त्याच्या प्रसिद्धिप्रमाणे आकार पडेल.प्रसिद्ध माणूस ओळखीचा असला तरीही तो प्रसिद्ध म्हणूनच गणला जाईल!तो बुटका म्हणाला."
"प्रसिद्ध माणूस," तो म्हणाला!
"नाव सांगा."
'मॉन्टेग्रो!'
'१०,००० रफा'
हा सर्वात जास्त आकार होता!
त्याने १०,००० रफा दिले आणि तो पुढे चालू लागला!
डावीकडे एक मोठी विहीर होती.
पाण्याने गच्च भरलेली!
रोने विहिरीत डोकावून पाहिले.
मात्र विहीरीत वेगळ्याच व्यक्तीचे प्रतिबिंब होते!
मॉँटेग्रो!!!!!!!!
-------------------
"हॅलो डॅडी!"
"हॅलो रो, सोल केव्ह मध्ये येण्याची तुला गरज पडणं म्हणजे जरा विचित्रच आहे."
"डॅडी एक विचित्र केस आहे."
"कोणती?"
रोने सविस्तरपणे केसविषयी माहिती दिली.
मॉन्टेग्रोने सुस्कारा सोडला.
"मी तुला ही केस हातात कधीच घेऊ दिली नसती."
"पण का डॅडी?"
"कारण हा साधासुधा घोस्ट नसून राक्षस आहे!!"
"काय?"
"हो, हे नाणे त्याचीच निशाणी! रो तु आता सरळ घोस्टहंटर सोसायटीत जा.तिथे माझी पर्सनल लायब्ररी आहे, तिसऱ्या कपाटात सर्वात खालच्या खणात पाचवे पुस्तके!"
"थँक्स डॅडी!"
"अजून काही?"
रोे थोड्यावेळ स्तब्ध झाला.
आणि त्याने अत्यंत जड़ आवाजात सांगितले,
"कॅथरिन आपल्याला सोडून गेली!"
मॉन्टेग्रोे हसला!
"ती तुला सोडून गेली,मात्र आता ती माझ्याजवळ सुरक्षित आहे!''
मॉँटेग्रोने दीर्घ श्वास घेतला.
"मुलाला सांभाळ, म्रुत्यूवर प्रेम करणार आहे तो!"
-------------------
मॉन्टेग्रोच्या घोस्टहंटर सोसायटीतील पर्सनल लायब्ररीमध्ये रो बसला होता!
एक अत्यंत जुनाट पुस्तक त्याच्यासमोर होते!
तुली मक्केराने लिहिलेले.
'सिम्बॉल'!
पान क्र.११८७.
त्यावर चित्र होते.
पायरेटच्या नाण्याचे!
रोने पुस्तक उघडले.
'खली महमूद'!!!!
'पाइरेट ऑफ़ द अरेबिया'!!!!
-------------------
१७४३ साल!
एक अरब अत्यंत चिंतेत घरी बसला होता!
तीन लाख मोहरा!
कशा चुकवायच्या?
अरे सिंदबादचा वंशज मी, आणि आज मला खाण्याची चोरी?
नाही!!!!!
त्याने विचार केला.
आणि आपल्या उंटावर बसून तो तडक निघाला!
--------------------
समुद्र!!!
अरबी लोकांच्या सुरस्य गोष्टींचा उगमदाता!
खलीफांच्या, अलिफ लैला, अलाद्दीन,अलीबाबाच्या!
अठरा दिवसाच्या सलग प्रवासाने तो दमला होता.
मात्र त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली होती.
त्याने एक होडी भाड्याने घेतली आणि तो वल्हवत निघाला.
समुद्रात अगदी मध्यावर तो आला होता.अत्यंत दमलेला. तीन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसलेला!
त्याच्यासमोर आता तीन सुळके उभे होते.
आणि त्याने मंत्र पुटपुटला!
जसाजसा तो मंत्र पुटपुटत होता, तसा समुद्र खवळत होता!
आणि समुद्रातून तो वर येत होता!
समुद्र राक्षस!!!!!!
'क्रेकन'!!!!!!!!!
प्रतिक्रिया
28 Dec 2015 - 11:27 am | नन्दादीप
रोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..
28 Dec 2015 - 12:24 pm | DEADPOOL
THANKS NANDADIP!
Actually I want to end that part at kraken entry,so it will be more interesting