विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?
आमच्या मनात अनेक विचार येत असतात ( हे कशाचे लक्षण असावे ?)
इथे येऊन शंका विचारून ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही मिपावर आलो. पण इथे आल्यानंतर आम्हालाही वाटू लागले आहे की आम्हाला सुद्धा चार लोकांनी विद्वान म्हणावे. संतुलित प्रतिसाद देणारा सेन्सीबल आयडी अशी आमची ओळख व्हावी असे आम्हालाही वाटू लागले आहे. त्यासाठी अनेक शंका विचारण्याचे धागे ( दारू पिण्यास सुरूवात कशी करावी, जुगारात यशस्वी कसे व्हावे, बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे, अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे इ. इ. ) पेंडिंग ठेवून हा विषय प्राधान्याने घ्यावा असे योजले.