विज्ञान

देव पाहिलेला माणूस

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
23 Mar 2014 - 2:50 pm

किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला
स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला
मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला
माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला

काय देवा आज इकडे कुठे? मी देवाला विचारले
त्यावर त्याने नुसतेच डोके इकडून तिकडे झटकले
त्याच्या मौना कडे दुर्लक्ष करत मी दोन्ही हात जोडले
आशिर्वाद म्ह्णून त्याने फक्त त्याचे दोन्ही कान हलवले

अभय-लेखनकाणकोणकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगोवाचौरागढनागद्वारभूछत्रीमराठीचे श्लोकमार्गदर्शनवाङ्मयशेतीसांत्वनामांडणीवावरप्रेमकाव्यबालगीतशुद्धलेखनसाहित्यिकजीवनमानऔषधोपचारभूगोलनोकरीविज्ञानक्रीडागुंतवणूकज्योतिषकृष्णमुर्तीराजकारणमौजमजारेखाटन

विज्ञानाच्या चष्म्यातून जाती

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
21 Mar 2014 - 10:35 am

तुमचे पूर्वज किती ?

स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे . आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे .

विज्ञानविचार

जीवनगाणे - ६

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
9 Mar 2014 - 7:00 am

जीवनगाणे - १ जीवनगाणे - १
जीवनगाणे - २ जीवनगाणे - २
जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ३
जीवनगाणे - ४ जीवनगाणे - ४
जीवनगाणे - ५ जीवनगाणे - ५

विज्ञानमाहिती

बौद्धिक कृष्णविवर

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
1 Mar 2014 - 2:39 pm

बौद्धिक कृष्णविवर:

लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते.

बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४]

संस्कृतीसमाजतंत्रविज्ञानविचारसमीक्षावादप्रतिभा

६१७४

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
24 Feb 2014 - 1:55 pm

त्या दिवशी ‘Our Scientists’ हे पुस्तक वाचत होते. नॅशनल बुक ट्रस्टचं १९८६ मधलं प्रकाशन आहे ते. ब-याच काळापासून मागं पडलेलं पुस्तक आहे; म्हणून त्या दिवशी जरा नेटाने वाचत होते. ‘नेटाने’ कारण पुस्तकाची शैली. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची त्यातली ओळख इतकी संक्षिप्त आहे; की कंटाळा यायला लागला मला (म्हणून हे पुस्तक दरवेळी मागे पडत गेलंय माझ्यासाठी!) हे पुस्तक शाळकरी मुलांसाठी आहे हे तर मला आणखी विशेष वाटलं; कारण या पुस्तकात मुलं रमतील असं काहीच नाही दिसलं मला.

एका लेखात ‘स्थिरांक’ आढळला. काय आहे हा स्थिरांक?

विज्ञानविरंगुळा

जीवनगाणे - ४

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
21 Feb 2014 - 5:27 pm

जीवनगाणे - १ जीवनगाणे - १
जीवनगाणे - २ जीवनगाणे - २
जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ३

मॉरीस ह्यूज फ्रेडरीक विल्कीन्स

विज्ञानमाहिती

तंत्रज्ञानाची 'उपयोगशील' रचना: आधुनिक जगाची गरज

कल्पक's picture
कल्पक in जनातलं, मनातलं
18 Feb 2014 - 12:42 pm

तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर हवी ती माहिती पटकन मिळत नाही आहे का? मोबाईल फोनमध्ये विविध गोष्टी वापरताना गोंधळ होतो आहे का? एखादी कार्यप्रणाली (Software) वापरणं कठीण वाटतंय का? इंटरनेटद्वारे बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत का? एटीएम मशीन वापरताना अडचणी येत आहेत का? या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची "उपयोगशीलता" (Usability) वापरणाऱ्यांसाठी (Users) योग्य नाही किवा ह्या उत्पादनांची रचना (Design) व्यवस्थित नाही. कोणतेही उत्पादन केवळ आधुनिक आणि सुंदर असून चालत नाही तर ते लोकांना वापरण्यासाठी सोयीचे, उपयुक्त असावे लागते.

कलाविज्ञानलेख