देव पाहिलेला माणूस

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
23 Mar 2014 - 2:50 pm

किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला
स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला
मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला
माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला

काय देवा आज इकडे कुठे? मी देवाला विचारले
त्यावर त्याने नुसतेच डोके इकडून तिकडे झटकले
त्याच्या मौना कडे दुर्लक्ष करत मी दोन्ही हात जोडले
आशिर्वाद म्ह्णून त्याने फक्त त्याचे दोन्ही कान हलवले

शेजारीच उभा मालक देवाचा, समोर गवताचा भारा घेउन
मी पण एक पेंढी घेतली, त्याला दोन रुपये देउन
देवाला म्हणालो कृपा करा, पामरावर द्यावे लक्ष अजून
देवचे मग आशिर्वाद घेतले, त्याची शेपटी डोक्यावरुन फिरवून

म्हणालो देवाचे ताजे तिर्थ हवे,बाटलीतले शिळे नको आहे
मालक म्हणाले थोड थांबावे लागेल, तिर्थाची वेळ झालीच आहे
जास्त दक्षीणा देतो पण लवकर, मी म्हणालो, मला जरा घाई आहे
तसे असेलतर ठीक आहे, मालक म्हणाले, माझा सोटा तिकडेच आहे

पाठीवर दोन रट्टे बसताच देवाने ताजे तिर्थ दिले
थोडेसे डोक्याला लावत मी थोडेसे प्राशन केले
बिसलरीच्या बाटलीत, मी उरलेले तिर्थ भरुन घेतले
घरी आणून तुळशी पत्राने, ते घर भर शिंपडले

बायको म्हणाली परिक्षा आहे मुलाची, मला बाई काळजी वाटते
मी म्हणालो विभूती लाव बाबांची, उगा चिंता करत बसते,
"मुक्या प्राण्यांवर दया करा", मुलाच्या पुस्तकात वाक्य होते
घोकुन घोकुन पाठ करा, असे लिहिले की शाळा जास्त मार्क देते

- पैजारबुवा -

अभय-लेखनकाणकोणकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगोवाचौरागढनागद्वारभूछत्रीमराठीचे श्लोकमार्गदर्शनवाङ्मयशेतीसांत्वनामांडणीवावरप्रेमकाव्यबालगीतशुद्धलेखनसाहित्यिकजीवनमानऔषधोपचारभूगोलनोकरीविज्ञानक्रीडागुंतवणूकज्योतिषकृष्णमुर्तीराजकारणमौजमजारेखाटन

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

23 Mar 2014 - 4:03 pm | आयुर्हित

कॉलिंग मनेका गांधी
तो पर्यंत ANIMAL WELFARE BOARD OF INDIA ला कळवावे,जेणेकरून मालकाला The Prevention of Cruelty to Animals Act,1960 च्या कायद्यानुसार शासकीय कारवाई होऊ शकते.