भगवद गीतेतील ११४ वा श्लोक; श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे महात्म्य

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
14 Nov 2014 - 11:20 pm

आमच्या पाल्याच्या शाळेत अलिकडे परि़क्षेचे का कशाचे फॉर्म भरून घेताना विद्यार्थ्यांनी आपले वय वर्षे बरोबर काऊंट करावेत म्हणून एक छान शक्कल लढवली, भगवद गीतेचा श्लोकांमधील ११४ वा श्लोक कसा जादुई आहे पहा, ११४ मधून तुम्ही तुमच्या जन्मवर्षाची शेवटचे दोन आकडे मायनस केले की तुमचे वय वर्षे अचूक कॅल्क्यूलेट करता येतात. हा भगवद गीतेचा प्रसार केलेल्या वर्गातील विद्यार्थी, इ.स. २००० पुर्वीच जन्मलेले असणार होते. बर्‍याच विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपली आपल्या आई वडलांची मित्र मैत्रिणींची वय वर्षे मोजून पाहिली आणि चकीत झाली. घरी येऊनही फॉर्मूला वापरून पाहीला मलाही भगवद गीता श्लोक क्रमांकातील ११४वा श्लोक कसा जादुई आहे हे सांगितले. अर्थातच हा जादुई आकडा लहान बहीणीने स्वतःच्या वयावर मोजून पाहीला आणि भगवदगीतेच्या ११४व्या श्लोकाची गाडी अडली की, २००३ चा जन्म असल्याने ११४ - ०३ = १११ हा आकडा काय भावंडांच्या गणितात बसेना :) त्या क्षणीक श्रद्धेतील अंधश्रद्धा आपसूक गळून पडली !

व्यवस्थीत शिक्षण दिलेले मनुष्य स्वभावही इरॅशनल गोष्टी कसे चटकन स्विकारतात याचे नवल वाटते. मला सहसा गोष्टी तर्कपुर्ण पद्धतीने मांडण्याची स्विकारण्याची सवय आहे, पण असंख्य वेळा चुकीचे तर्क स्विकारून लोक वेगळेच निर्णय घेताना पाहून आश्चर्य व्हावयास होते. अशात एका मिपा धाग्यावर कस्टमरला पैसे कसे मागावेत, या बद्दल अल्पसा विषय निघाल्याचे आठवत असेल. एकदा, 'एका कस्टमरला पुरवलेली पण खरेच मॅन्यूअलमध्ये प्रॉमीस केल्या प्रमाणे न चालणार्‍या वस्तुचे पैसे कसेही करून कस्टमरकडून आणायचे आहेत', अशी जबाबदारी माझ्यावर आलेली आणि त्यापुर्वी न चालणार्‍या वस्तुचे पैसे कस्टमर कडून घेऊन येण्याचा कोणताही पुर्वानुभव गाठीशी नव्हता. तत्पुर्वीच्या दोनचार आठवडे काम केलेल्या एका सेल अँड रन कंपनीच्या मॅनेजरने त्याच्या जॉबसाठी मला पटवलेले, प्रॉडक्टला क्वालिटी नसली तरी विकण्याचे (उल्लुबनावींगचे) आणि त्याची ट्रेनिंग देण्याचे कसब खासकरून ऑब्जेक्शन हँडलींगचे मस्तच होते, अगदी इररॅशनल रिझन्स कस्टमर कसा अ‍ॅक्सेप्ट करतो हे कळेनासेच होते. माझ्या सुदैवाने कंपनीसाठी ऑर्डर आणली तरी पेमेंट ड्यू होण्याच्या आत चांगल्या वस्तु आणि सेवा देणार्‍या नावजलेल्या ब्रँडचा जॉब मिळाला, त्यामुळे नसत्या उल्लूबनाविंग मधून कायमचा आणि लौकर सुटलो तरी वरचा प्रसंग दिड एक वर्षाने उद्भवलाच, आणि बॉसलाच कसे ? असा प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता कारण त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडेही असणार नाही हे माहित होते. अर्थातच मी माझ्या जुन्या स्मार्ट बॉसचा संपर्क क्रमांक फिरवून झाली गोष्ट सांगीतली, आणि तोडगा विचारला, पण त्याला कस्टमरचे नाव गाव ओळख काही सांगीतले नव्हते. त्याने एक कानमंत्र सांगितला; वस्तु न चालणार्‍या कस्टमरकडे मी पेमेंट मागतोय तो वस्तु अपेक्षेप्रमाणे काम करत नाही म्हणून सांगतोय; त्याला आता ठरलेले इरॅशनल उत्तर मी देणार आणि तो चेक काढून देतो, गंमतच आहे. प्रत्य़क्षात चेक हातात आल्यावर, बॉस सुद्धा तोंडात बोट घालतो. सारच गजबं. (हे सर्वच कस्टमर सोबत शक्य होईल अस नाही. पण बॉसच्या अपवादात्मक शब्दा खातर कंपनीचे बाकीच्या एंप्लॉयीजची सॅलरी वेळेवर निघण्यासाठी काही वेळा तडजोडही करावी लागते हे करताना समतोल आणि तारतम्य हवे, आणि व्यवसायिक मुल्य नावाचीही काही श्रद्धा ठेवण्याची गोष्ट असते ते सर्व बाळगूनच पुढे जाणे गरजेचे)

तसा सारासार विवेक प्रत्येक व्यक्तीकडे सहसा आपसूक असतो, हा मुद्दा विकिपीडियावर मी हिरहिरीने अनेकवेळा मांडलेला आहे. पण मानव स्वाभाविकरित्या भावनेच्या आधारे नव्हे विवेकाने काम करणारा प्राणी असता तर मानवाला सध्याची प्रगतीची पातळी गाठण्यास मध्ये हजारो वर्षांचा कालावधी गेला असता का ? या प्रश्नाचे माझ्या स्वतःकडे उत्तर नसते.

पूर वादळ अशी संकटाची स्थिती अपेक्षीत असेल तर शासकीय यंत्रणा 'सतर्क' रहा असा शब्द वापरतात, यात तर्क म्हणजे विवेकाची बाळगण्याची आठवण का द्यावी लागते ? पण मुख्य मुद्दा माणसाला प्रत्येकवेळी विवेकी दृष्टीकोनांची गरज असते का ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून, जर मला माझे निर्णय भावनेच्याच आधारावरच करावयाचे असतील, तर तर्क आणि विवेकाची किती आणि का गरज असावी ?

सध्या सत्यनारायण कथे बद्दल चर्चा चालू आहे, अधून मधून असे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर धागे चर्चा निघतच असतात (पुढेही निघतील). थेअरी ऑफ प्रोबॅबिलिटी आहे, एखादी गोष्ट ५० % वेळा होईल ५० % वेळा होणार नाही, याची तशी सर्वसाधारण पणे सर्वांनाच कल्पना असते. तरी सुद्धा एखादी गोष्ट व्हावी अशी मनातून खूप इच्छा आहे, मग एखादी विशीष्ट प्रार्थना, विशीष्ट पुजा, विशीष्ट सुपरस्टीशन अमलात आणले जाते, आणि बघता बघता हातात घवघवीत यश येते. या गोष्टींकडे आपण फक्त सुपरस्टीशन अंधश्रद्धा याच दृष्टिने पहात असतो. पुण्यातील भरत नाट्य मंदीरात एकदा शेजवलकरांचे व्यवस्थापन विषयक व्याख्यान ऐकत होतो, सर्व व्यवस्थापनाची तत्वांचा उहापोह करत करत सरते शेवटी शेजवलकरांनी साईबाबांच्या एका मंत्राची वेगळ्या कारणाने आठवण केली आणि तो मंत्र म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. जगातील व्यवहार बहुतांशी व्यक्ती व्यक्तीतल्या विश्वासावर अवलंबून असतात, व्यवहारात शंकेच प्रमाण जेवणातल्या चिमूटभर मीठा एवढच असावयास लागत ते चुकलं की मोठे घोटाळे होतात. श्रद्धा ही विश्वासावर अवलंबून असते. श्रद्धा तुमच्या विश्वासाची, उमेदीची, उत्साहाची साथीदार असते. मला वाटते अनेक वेळा यश हे तुम्ही केलेल्या प्रार्थना, पुजे पेक्षा, सुपरस्टीशनपेक्षा तुमच्या उत्साहाने केलेल्या मेहनतीची, उमेदीची, आणि विश्वासाने स्विकारलेल्या जोखीमींचीही फलश्रूती असते. विश्वासाने एखादी व्यावसायीक अथवा एखाद्या निर्णयातील जोखीम स्विकारताना चिमुटभर मीठा एवढी शंका आवश्यक आहेच. पण जोखीम व्यवस्थीत लक्षात घेऊन निर्णय घेतल्या नंतर श्रद्धेने टाकलेले पाऊल तुमचा विश्वास वृद्धींगत करण्यास सहाय्यभूत होते. उत्साह देण्यास सहाय्यभूत होते. द्विधा मनस्थीतीतून बाहेर पडण्यास सहाय्यकारी होते. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात, श्रद्धेने दिलेल्या उत्साहाच्या भरात या मर्यादांकडे लक्ष चटकन जात नाही म्हणून मंत्राचा दुसरा भाग सबुरी म्हणजेच संयम हा आहे.

श्रद्धेने केलेल्या कर्मकांडाच्या उपचारात दुसर्‍या हितचिंतकांच्या उपस्थितीचे दोन फायदे होतात एक तुमच्या मनातील महत्वाच्या क्षणी विश्वास देणार्‍यांची उपस्थिती असते, दुसरा उपयोग नेटवर्कींग साठी थोडा फार उपयोग होतो अर्थात तो तुम्ही कसा करून घेता यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे मांगल्य, उत्साह, उमेद आणि विश्वास यांच्या संवर्धनासाठी आणि संयम आणि मर्यादांच्या कल्पने सहीत श्रद्धा असते तो पर्यंत ती उपकारक ठरू शकते. पण अपेक्षीत अनपेक्षीत संकटे टाळण्यासाठी स्वतःची तर्कबुद्धी मात्र शाबूत राहवयास हवी, संकट येताना अथवा संधी दवडल्या जाताना आपल्या श्रद्धाच आपल्या मार्गातील जोखड बनणार नाहीत, हे लक्षात घ्यावयास हवे. तर्कबुद्धी शाबूत ठेवण्यासाठी, आपले चुकलेले परखडपणे निदर्शनास आणू शकेल अशा व्यक्ती अथवा आपले निंदक यांचेही म्हणणे मनमोकळेपणाने ऐकुन घेण्याची सवय हवी. मग वय मोजण्यासाठी ११४ क्रमांकाची ट्रीक लक्षात रहात नसेल तर भगवदगीतेच्या बायबलच्या अथवा कुराण अथवा अजुन कोणत्या ग्रंथाच्या पुजेच्या नावाने लक्षात ठेवण्यास हरकत नाही परंतु एरवी ११४ क्रमांकाने वय मोजले जाण्याचा आणि धर्मग्रंथांचा संबंध असू शकत नाही, हा २०१५ मध्ये बहुधा ११५ क्रमांक घेऊन मोजणी करावी लागेल, हेही वेळेत लक्षात यावयास हवे म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा घोटाळ टळण्यास मदत होऊ शकेल.

संस्कृतीधर्मविज्ञानज्योतिषविचारअनुभवमत

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2014 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

कल्पनेला खाद्य पुरवणारी ही असली गणितं..लोकं मांडतच असतात..आजच चे.पु.आणि व्हॉट्सप वर तेंडुलकर्/सेहेवाग्/रोहित शर्मा यांनी मारलेल्या डबल सेंचुरीजच्या मॅच मधे..त्या तिह्नी मॅच आपण १५३ रनांच्या फरकानी जिंकलो..अशी पोस्ट फिरताना पाहिली!

माहितगार's picture

14 Nov 2014 - 11:28 pm | माहितगार

हम्म... अर्थात या ११४ क्रमांकात सरळ सरळ गणित होते, शिक्षक/शिक्षीका महोदय जे कुणी असतील त्यांनी विद्यार्थ्यांची सहज म्हणून फिरकी घेतली असेल भाबड्या विद्यार्थ्यांनी लगेच शंका न विचारणे खरेतर त्या गुरुजनांना स्वतःसच आतून खुपले असण्याची शक्यता अधीक वाटते.

भगवद गीतेचा श्लोकांमधील ११४ वा श्लोक कसा जादुई आहे पहा, ११४ मधून तुम्ही तुमच्या जन्मवर्षाची शेवटचे दोन आकडे मायनस केले की तुमचे वय वर्षे अचूक कॅल्क्यूलेट करता येतात.

ह्यात लॉजिक गंडलंय असं वाटत नाही का हो ? म्हणजे असे की भगवद गीतेचा ११४ वा श्लोक का जादूई? एखाद्या पुस्तकाची ११४ वी ओळ अथवा बायबलचे ११४ पान देखील चालेल की ?
संबंध ११४ या संख्येचा असताना भगवद गीतेला जोडण्याचा संबंध समजला नाही.. इथे कोणी फसूच कसा शकेल हे नाही कळाले? मुलांना सांगणार्‍याला हे समजले नसेल तर अवघडच आहे.

माहितगार's picture

14 Nov 2014 - 11:46 pm | माहितगार

पाल्याच्या वयात मी स्वतः असताना शिक्षक गणितात चुकलाकी माझी शंका तयार असे, इतर कुणी कसे फिरवले या पेक्षा आमचे पाल्य फिरले कार्यकारण न तपासता सहज विश्वास ठेऊन बसले, याचेच याचेच अत्यंत वाईट वाटले पण प्रसंग जसा झाला तो असा झाला, बरे आमच्या पाल्याने कधी भगवद गीता ना पाहिली ना वाचली, शेवटी या निमीत्ताने आमच्या पाल्याचे आपसूक शिक्षण झाले ते बरेच झाले. असो

आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीने काही गोष्टी प्रथा/पायंडा पाडल्या आहेत, ज्यांचा मनोतज्ञांना अजून खुलासा व्हायचा आहे. अमेरिकेने/ओबामांनी मेंदूच्या कार्यपद्धती शोधून काढण्यासाठी $१००मिलीयंस राखून ठेवलं आहेत.

पेराल ते उगवेल या नात्याने कोणतीही श्रद्धा हि अंधश्रद्धा नसते हे ज्या दिवशी जगासमोर येईल तो सुदिन ठरावा.

माहितगार's picture

15 Nov 2014 - 11:04 am | माहितगार

पेराल ते उगवेल या नात्याने कोणतीही श्रद्धा हि अंधश्रद्धा नसते....

काय म्हणायच आहे ते नीटस समजल नाही. कुठल्या जुन्या चर्चांमध्ये सहभाग घेतला असल्यास पुन्हा न टंकता जुन्या धागा प्रतिसादाचा दुवा दिला तरी चालेल. मुद्दा नवा असल्यास अधिक समजून घेऊ इच्छितो.

अमेरिकेने/ओबामांनी मेंदूच्या कार्यपद्धती शोधून काढण्यासाठी $१००मिलीयंस राखून ठेवलं आहेत.

यातनं काय सुचवू इच्छित आहात ते तेवढ लक्षात आल नाही.

आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीने काही गोष्टी प्रथा/पायंडा पाडल्या आहेत, ज्यांचा मनोतज्ञांना अजून खुलासा व्हायचा आहे.

हम्म.....

आयुर्हित's picture

15 Nov 2014 - 4:14 pm | आयुर्हित

हा प्रतिसाद आपल्या या वाक्यासाठी आहे.

सध्या सत्यनारायण कथे बद्दल चर्चा चालू आहे, अधून मधून असे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर धागे चर्चा निघतच असतात (पुढेही निघतील). थेअरी ऑफ प्रोबॅबिलिटी आहे, एखादी गोष्ट ५० % वेळा होईल ५० % वेळा होणार नाही, याची तशी सर्वसाधारण पणे सर्वांनाच कल्पना असते. तरी सुद्धा एखादी गोष्ट व्हावी अशी मनातून खूप इच्छा आहे, मग एखादी विशीष्ट प्रार्थना, विशीष्ट पुजा, विशीष्ट सुपरस्टीशन अमलात आणले जाते, आणि बघता बघता हातात घवघवीत यश येते. या गोष्टींकडे आपण फक्त सुपरस्टीशन अंधश्रद्धा याच दृष्टिने पहात असतो.