प्रिय मिपाकरांनो,
कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दिनांक २२-११-२०१५ रोजी, टिळक-स्मारक-मंदिर,टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे, इथे ओरिगामी कट्टा आयोजीत केला आहे.
वेळ सकाळी ११-३० ते दुपारी ४-१५.
काही अपरिहार्य कारणामुळे मी येवू शकत नाही.
प्रथे प्रमाणे, पुण्यातल्या कट्ट्याबाबत ३-३ धागे काढावे, असे वाटत नसल्याने, वेळ, तारीख आणि ठिकाण सांगीतलेले आहेच.
प्रतिक्रिया
14 Nov 2015 - 5:33 pm | खेडूत
छान. येणार.
१. लहान मुलांना येता येईल का? किती वयापासूनच्या?
२. टिळक स्मारकला आहे म्हणजे मिपापुरता मर्यादित नसेल असे वाटते.
३. येताना साहित्य काय आणावे लागेल?
४. अन्य परिचितांना सांगावे काय? तसे असल्यास प्रवेश शुल्क किती असेल?
सध्या इतकेच प्रश्न पडलेत!
14 Nov 2015 - 6:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपा कट्टे अलिखित (व अनधिकृत) नियमावली :
१. दुव्यात स्पष्ट लिहिले असल्याशिवाय वयाची अट नसते.
२. सभासदांच्या कुटुंबियांचे व सहृदांचे स्वागत असते.
३. दुव्यात स्पष्ट लिहिले नसल्यास, बरोबर काय आणि कोणाला आणायचे हे कट्ट्याला येणार्याने स्वतः ठरवायचे असते. फक्त त्याने कट्ट्याचा औचित्यभंग व बेरंग होऊ नये येवढी खबरदारी घेतली तरी पुरे असते.
४. दुव्यात स्पष्ट लिहिले नसल्यास, कट्ट्याचा खर्च तुतूमामी (तुझे तू माझे मी) किंवा कट्टेकर्यांमध्ये समान प्रमाणात विभागून केला जातो.
जास्तच शिरेस लिवलं काय ? बेधडक या कट्ट्याला, शिरेसगिरी पार पळून जाईल. :)
14 Nov 2015 - 6:28 pm | मुक्त विहारि
+१
कट्टा करण्यासाठी, ओरीगामी फेस्टिवल, तर फक्त बहाणा आहे.
एक बार कट्टा करो.
फिर बार-बार कट्टे करो.
(एकमेकांशी कट्टी-कट्टी करण्यापेक्षा, कट्टे केलेले काय वाइट?)
14 Nov 2015 - 6:28 pm | यशोधरा
सुट्टी असली तर नक्की येणार.
14 Nov 2015 - 6:38 pm | मुक्त विहारि
काही-काही गोष्टी अजिबात टाळू नयेत......
उदा.
१. रामदासां बरोबर फोर्ट विभागात फिरणे.
२. प्रचेतस बरोबर लेणी बघणे.
३. कंजूसां बरोबर काटकसरी प्रवास करणे.
आणि
४. भटक्या खेडवालां बरोबर ट्रेक करणे.
15 Nov 2015 - 12:31 pm | यशोधरा
मुवि, टाळत नाहीये, सुट्टी असेल तर जाईनच :)
14 Nov 2015 - 7:31 pm | बोका-ए-आझम
डोंबिवलीत आणि तोही नंदी पॅलेसला कट्टा करणे.
14 Nov 2015 - 8:35 pm | सुधांशुनूलकर
‘ओरिगामी मित्र’ या संस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे येथे १९-२०-२१-२२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये रोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळात ओरिगामी प्रदर्शन आयोजित केलं आहे. संस्थेच्या आम्ही सभासदांनी साकारलेल्या ओरि-कलाकृती प्रदर्शनात बघता येतील. हे प्रदर्शन सर्वांंसाठी खुलं आहे. प्रदर्शनासाठी नाममात्र शुल्क असण्याची शक्यता आहे. प्रदर्शनासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. आपल्या मित्रांना, नातेवाइकांना या प्रदर्शनाची जरूर माहिती द्या.
तर मंडळी, या प्रदर्शनानिमित्त रविवारी, २२ तारखेला एक मिपा कट्टा होणार आहे.
मी मुंबईहून डेक्कन एक्स्प्रेसने येणार आहे. ११ वाजता पुण्याला पोहोचेन. आपण १२ वाजता टिळक स्मारक मंदिरच्या प्रवेशद्वारापाशी भेटू. सर्व मिपाकरांना मी प्रदर्शन दाखवीन. ज्या मिपाकरांना फक्त प्रदर्शन बघायचं असेल, (नंतर जेवायला यायचं नसेल) ते यानंतर आपापल्या कामाला जाऊ शकतात. ज्या मिपाकरांना प्रदर्शन बघायचं नसेल, पण कट्ट्याला (भेटायला आणि जेवायला) यायचं असेल, त्यांनी साधारण एक-दीड वाजता (प्रचेतस, नाद खुळा या) पुणेकर मिपाकरांशी संपर्क साधा. नंतर पुणेकर मिपाकर नेतील तिथे भोजन करायचं, आणि नंतर ते ठरवतील तो कार्यक्रम. मी संध्या. ५.५५च्या इंटरसिटीने मुंबईला परतेन.
या कट्ट्यानिमित्त पुणेकर मिपाकरांशी भेट होईल. तेव्हा भेटूच..
14 Nov 2015 - 8:33 pm | अभ्या..
सुधांशूदादा येणार असतील तर मी येण्याचा प्रयत्न करीन. फिक्स नै.
आद्द्या भेटेल तो बोनस.
14 Nov 2015 - 8:41 pm | खेडूत
नक्कीच भेटूया...!
14 Nov 2015 - 8:28 pm | प्रचेतस
मी येतोच आहे.
मुंबैवरुन येणारे नूलकर काका एकटेच असतील तर त्यांना शिवाजीनगर स्टेशनवरून घेऊन टिळक स्मारकला पोहोचेन. पुढचं तिथे ठरेल तसं.
14 Nov 2015 - 8:38 pm | सुधांशुनूलकर
आदल्या दिवशी तुमच्याशी संपर्क साधून नक्की करू या.
14 Nov 2015 - 8:41 pm | प्रचेतस
चालेल.
15 Nov 2015 - 2:57 pm | पिंगू
माझं काही नक्की नाहीये. आलो तर सर्वांना थेट टिळक स्मारक मंदिरातच भेटेन.
16 Nov 2015 - 9:46 am | नाखु
आल्यास बरे होईल (आले तब्येतीला चांगले असते). चतुर्भूज पिंगूत नक्की काय बदल झाला हे कळू शकेल.
पिंगू भेटीच्या प्रतीक्षेत नाखु
याच सहीत पिंगूच्या जागी अद्या आणि अभ्या.. यांनी सोत्ताचे नाव टाकून वाचणे
20 Nov 2015 - 3:27 pm | प्रचेतस
कोण कोण येतंय?
20 Nov 2015 - 4:40 pm | सूड
मी!!
20 Nov 2015 - 4:30 pm | नाखु
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2015 - 03:15 AM IST
Tags: 3d tajmahal, wonderfold 2015 exhibition, pune
पुणे - सहा हजार कागदेंच्या युनिटपासून बनविलेले भव्य "लोटस टेंपल‘ प्रदर्शनस्थळी प्रवेश करताच क्षणी लक्ष वेधून घेते. पंधरा वर्षांच्या लहानग्याने बनविले "थ्रीडी ताजमहाल‘ अन् "ऑपेरा हाऊस‘ जणू तुमच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचा आभास निर्माण करतात. प्राण्यांपासून रणगाड्यांपर्यंत विविध प्रकारच्या "ओरिगामी‘ कलाकृती "वंडरफोल्ड 2015‘ प्रदर्शनात मांडल्या आहेत.
ओरिगामी मित्र संस्थेतर्फे ओरिगामी कलाकृतींचे प्रदर्शन गुरुवारपासून खुले झाले असून, टिळक स्मारक मंदिर येथे ते रविवारपर्यंत (ता. 22) सकाळी 10 ते रात्री 8 वेळेत रसिकांना पाहण्यासाठी खुले असणार आहे. न कापता, न चिटकवता कागदांपासून तयार केलेले हत्ती, कोल्हा, कांगारू, वाघ, सिंह असे विविध प्राणी, पक्षी, फुले आणि मानवी कलाकृती येथे ठेवल्या आहेत. नृत्य करणारी मुले-मुली, पियानो-गिटार वाजविणारे वादक आणि विविध वाद्य वाजविणाऱ्या बॅंडच्या आकर्षक कलाकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. अशा सुमारे तीनशे कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी बनविलेल्या ओरिगामी कलाकृती हे प्रदर्शनाचे आकर्षण आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्या आणि ओरिगामीमध्ये रस असणाऱ्या कलाप्रेमींना सायंकाळी पाच ते सात वेळेत अवचट प्रात्यक्षिक करून दाखविणार आहेत, असे संस्थेचे विश्वास देवल यांनी सांगितले आहे. मानस जोशी या पंधरा वर्षाच्या मुलाने तीन ते सात हजार युनिटपासून बनविलेल्या गणपती बाप्पा, सुवर्ण मंदिर, ट्विन टॉवर्स अशा विविध प्रतिकृती मांडल्या आहेत. फुलांची झाडे, कावासाकी रोझेस व्रेथ, मोटरसायकल, वेगवेगळे पॉट, गाड्या, जहाज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक यांच्यावरील कलाकृती येथे पाहायला मिळतील.
ओरिगामी म्हणजे काय?
ओरिगामी ही मूळची जपानी कला आहे. एका चौरस कागदास फक्त घड्या घालून कलाकृती तयार केल्या जातात. या कलाकृती बनविताना कागद कापत किंवा चिटकवत नाहीत. युनिट ओरिगामी ह एक प्रकार प्रदर्शनात ठेवला आहे. यात कागदाच्या घड्या घालून युनिट तयार करतात आणि सर्व युनिट एकमेकांस जोडून कलाकृती केल्या जातात.