नवर्याचे नवविधवेस पत्र
तुझं पत्र मिळालं, कसं कुठे ते विचारु नको... सांगतो सावकाश.
मी गेलो आणि त्याचा तुला आनंद झाला हे ऐकून माझ्या काळजाला चिरा पडतील असं का वाटलं तुला? त्या आधीच पाडल्यात, माझ्या लाडक्या दारूने. रात्री माझा काही उपयोग नव्हता म्हणालीस का..? आता सर्व स्पष्टच करतो. तुझ्याजवळ आलं की तू सतराशेसाठ कारणं द्यायचीस, आज काय तर एकादशी, मग काय चतुर्थी, कधी अंगारकी, मंगळवार, शिवरात्र, अगदी काहीच कारण सापडलं नाही तर तुझं डोकं तरी दुखायचं. आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात. तू फक्त डोक्यात जायचीस...