नवर्‍याचे नवविधवेस पत्र

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in जनातलं, मनातलं
10 Feb 2016 - 12:24 pm

तुझं पत्र मिळालं, कसं कुठे ते विचारु नको... सांगतो सावकाश.

मी गेलो आणि त्याचा तुला आनंद झाला हे ऐकून माझ्या काळजाला चिरा पडतील असं का वाटलं तुला? त्या आधीच पाडल्यात, माझ्या लाडक्या दारूने. रात्री माझा काही उपयोग नव्हता म्हणालीस का..? आता सर्व स्पष्टच करतो. तुझ्याजवळ आलं की तू सतराशेसाठ कारणं द्यायचीस, आज काय तर एकादशी, मग काय चतुर्थी, कधी अंगारकी, मंगळवार, शिवरात्र, अगदी काहीच कारण सापडलं नाही तर तुझं डोकं तरी दुखायचं. आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात. तू फक्त डोक्यात जायचीस...

आईबाबांना मी आधीच कळवलं होतं मला मुलगी पाहिजे ती पिणारीच, मला सोबत करणारी, मला सांभाळून घेणारी. पण त्यांनी तुला आणली. तुला कळलं काय, 'त्यांनी आणली'. मला कुणी विचारलेच नाही. आणली तीही अशी की सदानकदा बक बक बक, तोंडाचा पट्टा चोविस तास. आता घरीच बाटली घेउन बसलो नसतो तर डो़कं राहिलं असतं का माझं जाग्यावर...?

मुलं मला नाय तुला घाबरायची. तु ज्यालात्याला वस वस ओरडायचीस. पोलिसात जाऊन खोट्यानाट्या कंप्लेंट टाकायचीस. कायदाही बायकांच्या बाजुने. बिचार्‍या त्या बोक्या इन्स्पेक्टराला स्वतःची बायको मांजर बनवून पदराखाली ठेवते, तो इथे येऊन वाघासारखा ओरडला फक्त त्याच्या वर ह्या स्त्रीधार्जिण्या कायद्याची सक्ती होती म्हणून. नाही तर मला तो एकट्यात म्हणाला होता, 'मायला ह्या सार्‍या बायांना एकदा हवालात मध्ये बंद करुन कुलूप लावुन चावी किन्गफिशरच्या बाटलीत टाकून बाटली बंद करुन समुद्रात फेकून द्यायची जाम इच्छा होते.'

तुला सांगायचो, दारू चांगली असते पण स्वतःपुढे तू दुसर्‍या कोण्या स्त्रीला चांगली म्हणवून घेशीलच कशी.

कधी कधी सोडायची हुक्की यायची. जेव्हा तू लाडालाडाने माझ्याशी बोलायची, खट्याळपणे हसून मजकडे पहायचीस, एखादी धुंद रात्र मला भेट द्यायचीस. पण सकाळी कळायचं कैकयीसारखा कसला तरी वर तू वसूल करून घ्यायचीस. मी परत सुरु करायचो 'हल्ली वाईफमधे काही मजा येत नाही’ असे म्हणून. तुला काय ऐकू यायचं... ?

अदितीचं सांगू नकोस गं, माझं शिक्षण तिच्या लग्नात द्याव्या लागणार्‍या हुंड्यापायी आणि लग्नखर्चापायी बुडालं, त्याची भरपाई करतेय ती. चांगला आय आय एम मधे शिकलो असतो. हार्वर्डला गेलो असतो पण आमच्या आइ-बापाला बडेजाव करायची हौस. सगळे पैसे लग्नात उडवले. आता तिला टोचून टोचून बोलतायत. ते बोलणं ऐकावं लागु नये म्हणून तिने त्यांची रवानगी तिकडे केली ज्या बिल्डरची जाहिरात तू तुझ्या पत्रातून करते आहेस.

मुलांची काळजी घेणे तुझ्याच्याने होणार नव्हतेच. तुझा तो पिंडच नव्हता. आधाराशिवाय उभी राहणे तुला जमणारेच नव्हते. तसे असते तर माझ्या दारू पिण्याच्या त्रासाचा एवढा इश्यु करण्याऐवजी आधीच गेली असतीस की स्वत:च्या पायावर उभी राहायला...

तुला वाटतं, तुला चांगला नवरा मिळाला. मला तर त्या बाब्याची काळजी वाटून र्‍हायलीये. तुझ्या सारख्या बायकोशी संसार करण्याची चूक तो दुसर्‍यांदा करतोय. परत अशी चूक करायला तो शिल्लक राहणार नाही. नव्याचे नऊ दिवस, नंतर कळेलच. तुझं लक्ष प्रशस्त फ्लॅट कडे आहे हे माझ्या ध्यानात आलं, त्याच्या नाही का येणार...?

तुम्ही दोघं बसताय प्यायला सोबत. मी ही असतोच तुमच्या बाजुला बसलेला. ओल्ड मॉन्कचे घुटके घेत... एकदा त्याच्याकडे, एकदा तुझ्याकडे बघत... हळु हळु त्याच्या ग्लासातली वाढवतो दारु. तू बघ आता काय होते ते.

मुलं तुला विचारतील, "आई, तू ह्या नव्या बाबांनाही का दारूची इतकी सवय लावली, ह्यापेक्षा आधीचे बाबा बरे होते."

त्यावर तू त्यांना सांगशील, ‘बाळांनो, हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करतेय. तुमचे पहिले बाबा गेले ते माझ्यामुळेच, आता हेही बाबा गेले तरच हे घर आणि संपत्ती आपल्याला मिळेल...."

तू हे पत्र लिहित असतांनाच तुझ्या मागे उभा राहून वाचत होतो. तू लग्नास उभी राहीली तेव्हा अंतरपाटाच्या जागीच मी होतो. बेडरूममधे तुम्हा दोघांच्यामधे मीच झोपलेलो.

मी आहे, गेलो नाही. तुला माझा विसर पडू देणार नाही. चल भर नायन्टी आता.

विडंबनअर्थकारणप्रकटनशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

10 Feb 2016 - 12:31 pm | पिलीयन रायडर

नवीन फ्याड आलं मिपावरचं!

मोगा's picture

10 Feb 2016 - 12:36 pm | मोगा

मस्त

_मनश्री_'s picture

10 Feb 2016 - 12:40 pm | _मनश्री_

सध्या मिपावर'पत्र सप्ताह' चालू आहे का ?

मन१'s picture

10 Feb 2016 - 12:41 pm | मन१

अजून काही पत्रांचं पोटेन्शियल शिल्लक आहे --

  1. पोरांची मम्मीला पत्रे
  2. पोरांची पप्पाला पत्रे
  3. पोरांची सावत्र पप्पाला पत्रे
  4. दुसर्‍या नवर्‍याची पहिल्या नवर्‍याला पत्रे
  5. पहिल्या नवर्‍याची दुसर्‍या नवर्‍याला पत्रे
  6. पप्पाची पोरांना पत्रे
  7. सावत्र पप्पाची पोरांना पत्रे

पोस्टमनचं वरील सर्वांना पत्र.

चांदणे संदीप's picture

10 Feb 2016 - 12:42 pm | चांदणे संदीप

आता पत्र पत्र खेळायच सगळ्यांनी! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2016 - 12:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

ठ्ठोssssssssssss !!!

आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात. तू फक्त डोक्यात जायचीस...

तुझं लक्ष प्रशस्त फ्लॅट कडे आहे हे माझ्या ध्यानात आलं, त्याच्या नाही का येणार...?

तुम्ही दोघं बसताय प्यायला सोबत. मी ही असतोच तुमच्या बाजुला बसलेला. ओल्ड मॉन्कचे घुटके घेत... एकदा त्याच्याकडे, एकदा तुझ्याकडे बघत... हळु हळु त्याच्या ग्लासातली वाढवतो दारु. तू बघ आता काय होते ते.

शेवटचे तीन परिच्छेद तर लागोपाठ तीन षटकार !

=)) =)) =))

उगा काहितरीच's picture

10 Feb 2016 - 12:53 pm | उगा काहितरीच

वि.स. सप्ताह चालू आहे का ? ;-)

चेक आणि मेट's picture

10 Feb 2016 - 12:59 pm | चेक आणि मेट

अगदीच तर्राऽऽऽऽऽऽऽऽऽऽट हाईस कि !!!

सर्वांना जाहीर आमंत्रण!

जेपी's picture

10 Feb 2016 - 1:29 pm | जेपी

=))=))=))=))=))=))
=)))=))=))

लै भारी..

मयुरMK's picture

10 Feb 2016 - 1:29 pm | मयुरMK

चल भर नायन्टी आता. :)
खिक्क्क...

अन्नू's picture

10 Feb 2016 - 1:41 pm | अन्नू

चला आलं वाटतं पत्र नवरोबाचं
आता नवविधवा यावर काय षट्कार मारते याकडे लक्ष लागून रहिले आहे! ;)
बाईSS... पत्र लिवायला घ्याS!!

मृत्युन्जय's picture

10 Feb 2016 - 1:46 pm | मृत्युन्जय

आता मुलांची पत्रे कधी येणार? बाप ९०, आई ६० आणि मुले ३०. होउन जाउद्यात. हम दो, हमारे दो, हम चारो के २१० मिली रोजाना.

ही चेन अशीच वाढत राहिली तर दारुच्या कंपन्याच घरच्यांना पत्रे लिहायला सुरुवात करतील.

मुक्त विहारि's picture

10 Feb 2016 - 3:54 pm | मुक्त विहारि

हम दो, हमारे दो, हम चारो के २१० मिली रोजाना."

मस्त...

बॅटमॅन's picture

10 Feb 2016 - 3:55 pm | बॅटमॅन

एक खंबा दारू अब रोजाना है बचाना....

एक खंबा दारू अब रोजाना है पचाना....

बोका-ए-आझम's picture

10 Feb 2016 - 5:10 pm | बोका-ए-आझम

खंबा खंबा अखंड पिऊया
सोडा चखणा मुखे म्हणू या!

टाकायला आरसी, चखण्याला शेंगा
बारच्या पैशाची बचत भारी
सामाजिक टल्लीकरण येता दारी.

संदीप डांगे's picture

10 Feb 2016 - 5:25 pm | संदीप डांगे

आदूद्येवा... __/\__

=)) =)) =))

बोका-ए-आझम's picture

10 Feb 2016 - 5:08 pm | बोका-ए-आझम

+११११

धुरंधर's picture

10 Feb 2016 - 2:24 pm | धुरंधर

वाटच पाहत होतो......
.
चालू द्या .......
.
कुणीतरि मुलांच पण बघा....?

के.पी.'s picture

10 Feb 2016 - 3:53 pm | के.पी.

मस्तच!

मुक्त विहारि's picture

10 Feb 2016 - 3:56 pm | मुक्त विहारि

जबरदस्त..

मराठी कथालेखक's picture

10 Feb 2016 - 4:03 pm | मराठी कथालेखक

मस्त

मदनबाण's picture

10 Feb 2016 - 7:50 pm | मदनबाण

मस्त...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008

धर्मराजमुटके's picture

11 Feb 2016 - 9:58 pm | धर्मराजमुटके

बाब्बो ! कशाची कशाला टोटलच लागना झालीया. पार लास झाल्यागत वाटतयं.